Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तडजोड {अलक कथा}. Show all posts
Showing posts with label तडजोड {अलक कथा}. Show all posts

Wednesday, January 05, 2022

तडजोड {अलक कथा}

बोलून तुला काय उपयोग नाही.
तडजोड फक्त आणि फक्त
तिची संसारासाठी असते.
किती रे तू हट्टी मतलबी अप्पलपोटी
तिला ही मन, भावभावना, इच्छा,छंद असतात. हे सर्व तू विसरतो का 
तुझ्या सोबत माप ओलांडून आली तशी
फक्त तडजोड करती आहे.
तू मात्र तुझी व्यसन तुझा रुबाब तुझे छंद 
यात मदमस्त होऊन जगतो आहे.
तिने किती रे कष्ट करायचे कष्ट करून
तुला पैसा पुरवायचा
किती तडजोड करते ती तुला काय माहित.
तुझ्या जीवनात नंदनवन फुलवायला आली होती. 
पण तू कधी तिला समजून घेतलेच नाही.
आणि ती तडजोड करत तुझा संसार करत आहे.
बोलून तुला काय उपयोग नाही.
आता मनमोकळ व्हावं ही पण 
तिची अपेक्षा नाही. 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time