Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label दुःख. Show all posts
Showing posts with label दुःख. Show all posts

Thursday, January 20, 2022

दुःख

वेडू आनंदाचा एकमात्र क्षण शोधते
त्या क्षणाचा आनंद घेते.
डोळ्यात आसू लपवून हसते
डोळ्यांच्या कडा किती ही पाणावल्या
तरी ओठ मात्र हसण्यात गुंतवून ठेवते.
तुझे बोल तुझ्या सोबतचे क्षण
आठवते आणि आनंद घेते.
दुःखाचा डोंगर तर उभा आहे
तुझ्या सोबतीने दुःख लपवण्याचा 
खूप प्रयत्न करते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time