Thursday, September 30, 2021
तुझी साथ
ऐकशील का
Wednesday, September 29, 2021
प्रेम
सांजवेळी
Tuesday, September 28, 2021
बेभान क्षणी
अंगण
स्त्री मनाची व्यथा
तुला कळणार नाही.
Monday, September 27, 2021
अपराध काय
माझा काय अपराध होता.
मी एक स्त्री होते मी सुंदर होते.
देवाने बनवताना सढळ हाताने बनवले.
देवा रंग दिला, रूप दिले, उंची दिली,
छान टपोरे डोळे दिले,
नाजूक गुलाबी ओठ दिले, बुध्दी दिली,
सहनशक्ती दिली, स्वाभिमान दिला.
देवाने मला काहीच कमी केलं नव्हतं.
मी एक स्त्री असूनही
कोठेच कमी पडले नव्हते.
सुखाने जगत होते.
आनंदाचे राहत होते.
माझा कोणालाच काही त्रास नव्हता.
का मग माझ्यावर
त्या नराधमांनी वाईट नजर टाकली.
माझी अब्रु लुटून मला वेशीवर टाकले.
माझा काय अपराध होता.
आता लोकांच्या नजरा मला वेळी अवेळी बलात्कारी म्हणून सतावतात.
बलात्कारी म्हणून सतावतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अपराध
देवा काय अपराध केला होता.
म्हणून एवढी मोठी शिक्षा दिली.
गार हवेची झुळूक छान घेत होते.
सुखाच्या सावलीत उभी असताना.
मला दुःखाचा कडक उन्हात लोटून दिल.
परिस्थितीशी जुळवून जीवन जगले होते.
स्वाभिमानाने आयुष्य काढल होत.
अपराध माझे काय झाले.
माझे मलाच न कळले.
आता मला ते अवेळी सतावतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
Sunday, September 26, 2021
तुझी आठवण
अलिप्त
Saturday, September 25, 2021
प्रेमात काय गमावलं कमावलं
सखी तुझ्या प्रेमात काय मिळवल
अन् काय गमावलं?
हे गणित मांडून पाहिलं
खूप काही गमावलं
खूप काही कमावलं
त्याचा हिशोब खाली मांडतो
जमलं तर वाचून बघ.
सखी तुझ्यामुळे प्रेमात
खूप सुख मिळवलं
सखी तुझ्यामुळे प्रेमात
न्हाऊन निघालो.
सखी तुझ्यामुळे
मला टेंशन नव्हतं.
तुझ्या कडे सर्व बोलून
मोकळा मी होत होतो.
सखी तू होती तर काहीच
कमी नव्हतं.
सखी तुझ्या मुळे
खूप काही कमावलं होत.
तुला गमावल्याचा
आता पश्चात्ताप होतो ग
सखी आता तू माझ्या
सोबत पूर्वी सारखी बोलत नाही.
सखी तू पूर्वी सारखी
माझ्या सोबत भांडत नाही.
सखी तू आता माझ्या कडे
हट्ट करत नाही.
सखी तू पूर्वी सारखी
माझ्याकडे हट्टाने
भेळ आईस्क्रीम मागत नाही.
सखी तुझ्या मुळे खूप काही गमावलं.
आता हिशोब मांडून काय उपयोग
माझंच गणित कच्च होत.
सखी तू मात्र आयुष्याच्या
गणितात पास झाली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
आयुष्य
Friday, September 24, 2021
तुझा रुसवा
तुझं ते हक्काने रुसणं
माझं ते तुझ्यात गुंतणं
किती दिवस वाट पाहायची
कधी जाणार तुझा रुसवा
सांग ना सखी
तुझा रुसवा मला छळतो ग
तुझ्या मिठीत यायला धडपडतो.
रागावली की अजूनच गोड दिसते.
फुगलेले गाल लाल झालेले नाक
असं वाटतं याव आणि तुझ्या
फुगलेल्या गालाचा फुगा फोडावा.
लाल झालेल्या नाकाचा चावा घ्या.
हळूच खाली सरकत
ओठांचे मधुर रसपान करावे.
हनुवटीवरील तीळ चोखून घ्यावा.
त्रास देऊन देऊन तुला बेजार करावं.
तुझ्या रूसवा घालून तुझ्यात पूर्ण गुंतून जावं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
तुझं माझं नातं
Thursday, September 23, 2021
काकण
राणी तुझे काकणे किणकिणतात
तुझ्या त्या गोड मंजूळ
काकणाच्या किणकिणात
मी मला हरवतो ग
मी तुझ्या साठी बनवलेल्या
कवितांचे शब्दही विसरतो.
नको ग वाजवू तुझे काकण
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अबोला
दुरावा हा अबोल आहे.
भाव हा अनोखा आहे.
सखे मला तुझा दुरावा छळतो ग
तुझ अबोल अलिप्त राहण
आता मला सहन होत नाही ग
का ग हा अबोला का ग हा दुरावा
अपराध माझा असा काय झाला.
बोल ना सखे किती भावना ना त्रास देशील.
मी तुझ्या प्रेमात वेडा आहे ग
मी फक्त तुझाच आहे.
तुझ्या आठवणीत जगतोय आहे ग
सोड तो अबोला दूर कर दुरावा
एकदा येऊन भेट.बघ माझी अवस्था.
का ग हा अबोला का ग हा दुरावा
भाव हा अनोखा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
वासना
Wednesday, September 22, 2021
चिंब पावसात भिजताना
अवेळी पाऊस येतो
आडोसा शोधता शोधता
तारांबळ उडते.
तेवढ्या वेळात पाऊस
चिंब भिजवून जातो.
वेडू तू ही असाच अचानक येतो.
माझी तारांबळ उडते.
तू मात्र आडोसा शोधण्यासाठी
नजर इकडे तिकडे बघतोस.
आडोसा मिळताच आवेगाने
मिठीत घेऊन प्रेमाची बरसात करून
चिंब भिजवून टाकतो.
मुक्तछंद कव्या
मेघा...✍️✍️
तारुण्यातल प्रेम
पहिलं प्रेम ही एक शाळेत जाणारी दहावीच्या विद्यार्थ्यांनीची कथा आहे.
असं ही ते वय हे अल्लड तारुण्याची सुंदर सुरवात भिन्न लिंगी व्यक्ती बद्दलच आकर्षण अस हे वय ती मुलींच्या शाळेत जात असते. ती ज्या ठिकाणी राहते.
तेथेच घराच्या कोपरावर एक बाई घरगुती खानावळ चालवत असते.
तीची शाळेची वेळ व त्याच वेळेत एक हडसम तरूण तेथे रोज जेवणासाठी त्या खानावळीत येत असतो.
त्याचा येण्याचा रस्ता हा तिच्या घरा वरुन असतो अशीच एकदा त्याची नजरानजर होते व रोजच हे सकाळी शाळेत जाताना व रात्री त्याच्या जेवण्याच्या वेळेत चालू होते.
एक शब्द ही न बोलता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.
त्याला ही तिला पाहिल्या शिवाय चैन पडत नसते व तिला ही त्याला पाहिल्या शिवाय चैन पडत नसते.
असे हे तिच्या आयुष्यातील पहिले प्रेम कधी ही न विसरणार त्यात तिच्या घरचे तिचं लग्न ठरवतात.
तिची प्रेमा बद्दल घरी सांगायची हिम्मत नसते.
त्यामुळे ती घरच्यांनी ठरवलेल्या मुलांशी लग्न करून मोकळी होते.
तिच पहिलं प्रेम मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून तो कोपरा बंदिस्त करते व त्याच्या सोबत सुखाने संसार करते पहिलं प्रेम माणुस विसरू शकत नाही हे खरं आहे .
मुक्तछंद कव्या
मेघा...✍️✍️
प्रश्न
राणी आता तुझ्या प्रश्नाचं
उत्तर नाही देता येणार
तू निघून गेली तशी
वेळपण निघून गेली.
आपण कधी भेटलोच तर
पुन्हा नव्याने मित्र म्हणून भेटू
जुन्या जखमेची खपली
काढायला नको.
तुझे माझे प्रश्न
निरुत्तरच राहू दे.
मेघा...✍️✍️
तारूण्य
मी तारुण्याच्या उंबरठ्यावरये
ऊन ठेपले होतेघ
राच्या अंगणात उभी होते
तेथेच झाली तुझ्या माझ्या नजरेची भेट
मुक्तछंद कव्या
मेघा...✍️✍️
Monday, September 20, 2021
अवेळी पाऊस येतो
अवेळी पाऊस येतो.आडोसा हवा असतो.आडोसा नसेल तरभिजून चिंब करतो.तसाच तू अवेळी येतो.आडोसा पाहून ओठांचाताबा येतो.ओठात ओठ भिजूनचिंब करतो.मुक्तछंद कव्या मेघा...✍️✍️
Saturday, September 18, 2021
कळलंच नाही
कळलंच नाही...
सांजवेळी
सांजवेळी
Friday, September 17, 2021
सांजवेळ
सांजवेळ
तू मी आणि सांजवेळ
तो रवीचा सुंदर संधिप्रकाश
ते चंद्राचं हळूच डोकावत वर येणे.
पाखरांची घरट्याकडे
परतण्याची लगबग
तुझी माझी हि आपल्या घरट्याकडे
लवकर जाण्याची धडपड
आपल्या पिल्लूच वाट पाहत बसणे
अशी सुंदर सांजवेळ
मेघा...✍️✍️
तिचं हसणं
तिचं हसणं...
दुःखात ही हसत हसत जगते ती ही स्त्री
डोळ्यात आसू आले तरी हसते ती ही स्त्री
हसता हसता रडते ती ही स्त्री
रडत रडत हसते ती ही स्त्री
शब्दाविना हसते ती ही स्त्री
शब्द झेलून हसते ती ही स्त्री
अशी ही स्त्री हसण्याची
कला घेऊन जन्माला येते ती ही स्त्री
आणि हसत हसतच मरते ती ही स्त्री
मेघा...✍️
कॉफी आणि आठवण
काँफी आणि आठवण
तुझ्या कॉफी सोबतच्याआठवणी सर्व आलबेल आहे.साठवणीनीची खळबळ आहे.कॉफीचा मग हाती घेता.आठवणीने खळबळ उडते.त्या आठवणी नेखळबळ माजली किकॉफीचा मग निवळतो. मेघा...✍️✍️
जगण्यासाठी हरावे
जगण्यासाठी हरावे...
तू कितीदा अपमान केला तरीपुन्हा तुझ्याच दारात यावे.
कितीदा पुन्हा ते घडावे.
कितीदा लाचारपणे जगावे.
आई वडील म्हणून काही
किंमत दे रे.
जन्म देऊन मोठे करताना
काय सोसलं तुला माहित नाही.
म्हातारपणी त्यांची अशी
अवहेलना करू नकोस.
कितीदा तुम्ही बोलला
तरी पुन्हा पुन्हा तुमच्याच कडे यावे.
या वयात म्हातारपणी कष्ट कामे
होत नाही रे म्हणून त्यांचा अपमान करू नकोस.
कितीदा जगण्यासाठी हरावे.
कितीदा जगण्यासाठी हरावे.
मेघा...✍️✍️
Monday, September 13, 2021
चांदण्या रात्री या बेभान क्षणी
Title
वनवास (चारोळी)
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
All time
-
संध्याकाळची आॅफिस सुटण्याची वेळ व अचानक पाऊस सुरू झाला तिला घरी जायची घाई कारण तिची छकुली घरी वाट पाहत होती. सकाळी चांगलं ऊन पडलं होतं त्याम...
-
सांजवेळी तुला कधी कळलेच नाही. माझी प्रेमाची भाषा तू कधी समजून घेतलच नाही. आता आठवणीत किती रमायचे सांजवेळी किती तळमळायचे तूच सांग आता कसे जगा...
-
काँफी आणि आठवण तुझ्या कॉफी सोबतच्या आठवणी सर्व आलबेल आहे. साठवणीनीची खळबळ आहे. कॉफीचा मग हाती घेता. आठवणीने खळबळ...





