Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, April 30, 2022

चाफ्याच नातं (चारोळी)

चाफ्याच आणि माझं पवित्र नातं...
वेडू तुला रे कोठे कळत...
चाफ्याचा सुगंध आवडतो ना तुला... 
म्हणूनच तर माझं वेड मन तिकडे वळत....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडू आपल नातं

वेडू आपल पवित्र नातं
आपण छान जपलं
विश्वास,निःस्वार्थी,निर्मळ 
आशा या अनामिक
नात्याला नाव कशाला रे हवं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अश्रू (चारोळी)

हात आणि अश्रू...
किती ना पवित्र नातं...
डोळ्यात येता पाणी....
हातच पहिले पुसायला जातं...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


शब्दांच नात

नातं आता शब्दांशी जुळले
पवित्र अशा नात्यावर 
प्रेम मनापासून करते.
आता नकोच कुठली नाती
दिखावा सगळा आणि त्या मागे
सहानुभूती आणि चर्चा
ज्याला त्याला हवा नुसता
मोठेपणा आणि त्याचा 
उदो उदो करणं
त्यापेक्षा शब्दांशी नातं 
जुळवण सोपं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


पवित्र नातं

पवित्र नातं
आकाश आणि धरतीच
मेघ आणि रवीच
शशी आणि ताऱ्याचं
एकत्र राहतात एकमेकांना 
साथ ही देतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


नातं

पवित्र आपलं नाते
तू अर्ध्यावर तोडून गेला.
तुझ्या शिवाय आता
मी एकटीच कशी राहू
सोबत तुझी नसते.
एकटीच एकांत 
विचार करत बसते.
असा काय गुन्हा केला
तुझी सोबत एवढ्या
लवकर सुटली...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, April 29, 2022

वेडू (चारोळी)

वेडू एकांत हा छळतो रे...
तुझीच आठवण करून देतो...
मन तुझ्या कडेच धाव घेते...
तुझ्याच स्वप्नाचा ठाव घेतो...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुझा एकांत

तो एकांत ती वेळ तुझं हळूच येणं
कपाळा वरील केसांच्या बट्टा ना
हळूच फुंकर घालून कपाळाच चुंबन घेणं
गालावरच्या खळीला हळूच पाहणं
हनुवटी वरील तिळाची तारीफ करून
शू शू करत माझ्या ओठांवर बोट ठेवून
एकांत भंग करण्या पासून थांबणं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


हसते ग (चारोळी)

हसते ग मी...
गर्दीत बसून...
सहानुभूती टाळते...
एकांतात रडून...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सांजवेळ (चारोळी)

रवी मावळतीला जाता...
एकांत मला खायला उठतो ग...
राणी मग ती सांजवेळ... 
माझ्यासाठी कातर वेळ ठरते ग...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


पहाटेचा एकांत

एकांत पहाटेचा रवी ची
लाल केशरी किरणं
मंद मंद गार हवा 
पक्ष्यांची गोड किलबिल
चाफ्याच्या तो मंद मंद सुगंध
घडाळ्याची नाजूक टिकटिक
झोक्यावर हळूवार घेत असलेला झोका
सोबत चहा कप वाह काय तो एकांत 
मन प्रसन्न होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻


एकांत

सख्या आता एकांतच एकांत आहे.
     कसली गडबड नाही
     कसली खळबळ नाही.
बसून एकांतात तुझेच रुप आठवते.
   संवाद तुझ्या सोबत साधते
संवाद साधता हळूच गाली हसते.
एकांताचे ते दोन क्षण तुझ्या सवे
   जगून घेते...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
     


Thursday, April 28, 2022

चाफ्याचे रहस्य (चारोळी)

वेडू तुझ्या माझ्या प्रेमाचं...
रहस्य किती जपलं आहे रे...
आपल्या प्रेमाच प्रतिक म्हणून...
चाफ्याला जवळ केलं आहे रे...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मनाचे रहस्य

मनाच्या राजवाड्यात खूप रहस्य आहेत.
काही कडू तर काही गोड रहस्य
जपून ठेवली आहेत ती आजवर
कधी तरी उफाळून वर येतात.
कधी त्रास देतात तर कधी 
मनाला गुदगुल्या करून जातात..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


राजवाडे राजकारण

राजवाडे तेथे त्यांचे राजकारण
त्या राजकारणात बरेच असतात रहस्य
ते आपल्या सारख्या सरळ साध्या माणसांना कोठे कळतात.
मग त्यातून कोणाला मारलं जातं तर कोणाला विनाकारण शिक्षा दिली जाते.
कसले ही आरोप करून त्याला बंदिस्त केलं जातं तर काही गोष्टी त्यांच्या कडून कबूल करून घेतल्या जातात. आणि त्यातून त्या व्यक्ती शाप देतात तळतळतात.आणि ते पुढे कोठे तरी त्रास दायक ठरत आणि उगीच त्या वाड्यांना दोषी ठरल जाते.
तेथील वास्तुपुरुष सांगत असतो अरे बाबांनो
जे काही केलं ते माणसानी केलं माझा काय दोष मला का शापित ठरवता. पण आपल्या पर्यंत त्यांचा आवाज येतच नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वाड्यातील रहस्य

पुण्यात आहे शनिवार वाडा तेथे होती पेशवाई त्या पेशवाईत मोठे पेशवे त्यानंतर 
त्यांची परंपरा चालू झाली.
राघोबा पेशवेना हवे होते पेशवेपद त्या वेळी होते नानासाहेब पेशवे त्यांचा कट करून त्यांना काढण्यासाठी एक पत्र लिहिले गेले.
त्या पत्रात धरावे होते तेथे आनंदीबाई नी  
ध चा मा करून मारावे असा बदल केला.व नानासाहेब पेशवे ना मारण्यात आले तेव्हा नानासाहेब पेशवे ओरडत होते काका मला वाचवा काका मला वाचवा.पण त्यांना कोणीही वाचवू शकले नाही त्यांतच त्यांचा मृत्यू झाला.अजूनही शनिवार वाड्यात काका मला वाचवा असा नानासाहेब पेशवे चा आवाज येतो म्हणतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Wednesday, April 27, 2022

चाफ्याच्या सुगंध

सकाळी सकाळी स्वप्न मज पडले.
माझ्या अंगणी चाफ्याची बाग फुलली
चाफ्याच्या सुगंध सर्वत्र दरवळतो आहे.
फुललेल्या चाफ्याचा तो वर्षाव
तू माझ्या अंगावर करतो आहे.
मला तू त्या चाफ्याच्या फुलांच्या
सुगंधात दरवळून टाकतो आहे.
ओंजळ फुलांची भरभरून
माझ्यावर बरसात करतो आहे.
केसांत माझ्या वेणी चाफ्याची 
माळतो आहे.जाग आली तरी
सुवास चाफ्याच्या दरवळतो आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


पहाटेचे स्वप्न (चारोळी)

पहाटेच्या स्वप्नात येशील का...
प्रेमाचे रंग भरशील का??
विस्कटलेल्या या जीवनात...
सुखाचे चांदणे देशील का??
मेघा..✍🏻✍🏻©️®️


सजणा

स्वप्नात सजणा येशील का
चित्रांत रंग ही भरशील का?
भरशील का?
सजणा ये ना रे स्वप्नात
सत्यात नाही येऊ शकत
मला माहिती आहे..
स्वप्नात तरी ये ना
माझ्या चित्रात रंग भर ना..
ओसाड या जीवनात
थोडासा शिडकावा कर ना...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सकाळचे स्वप्न

सकाळचे स्वप्न पूर्ण होतात. खरं आहे का?
आज सकाळी तर तू स्वप्नी आली होती.
गोड गोड गप्पा माझ्या सोबत करत होती.
चुंबनाचा वर्षाव करत होती. प्रेमाने माझ्याकडे पाहत होती. असं वाटतं होतं मी जणू स्वर्ग सुख अनुभवतो.
आणि पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने जाग आली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सकाळचे स्वप्न

रोजच सकाळच्या स्वप्नात
  वेडू तू येतोस.
सत्यात कधी तरी ये रे..
मनाची तगमग थांबव..
घटकाभर निवांत बस..
गप्पाची मैफिल रंगव..
चहाचा स्वाद सोबतीने घेऊ..
सुखदुःखाची देवाण घेवाण करू..
वेडू एकदा तरी भेट...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, April 26, 2022

वेडू माझं शहर

वेडू ये ना रे परत माझ्या शहरात
त्या माझ्या पेठेतील वाड्यात
नजरेचा खेळ पुन्हा खेळायला.
गालातल्या गालात पुन्हा हसायला.
निवांत जरा भेटून बोलायला.
जुन्या आठवणींना उजाळा द्यायला.
पुन्हा एकदा ते दिवस जगायला.
तुझ्या प्रेमात पुन्हा एकदा पडायला.
वेडू ये ना रे पुन्हा माझ्या शहरात..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


कोल्हापूर शहर

गोष्ट माझ्या शहराची कोल्हापूरची अंबाबाईच मंदिर, रंकाळा तलाव, कोल्हापूरी
चप्पल साठी प्रसिद्ध अस शहर 
कोल्हापूरचा प्रसिद्ध गुळ,तांबडा पांढरा रस्सा खासियत ती कोल्हापूरची ते खाण्यास येतात बरीच मंडळी गंगावेशीत मिळत ताज दुध,दही,लोणी,ताक,
शाहू महाराज यांच ते शहर 
राजवाडा आहे अजून जपून ठेवलेला.
मराठी पिक्चरची फिल्म नगरी शांत निवांत
असं कोल्हापूर शहर... 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


गोष्ट माझ्या पुण्याची

माझं शहर पुणे तेथे काय उणे
असे माझे पुणे शहर विद्येचे ते तर माहेर घर
येथे येतात शिक्षण घेतात.काम धंदा शोधून
चार पैसे ही मिळवतात.आणि त्याच पुणेकरांना टोमणे मारतात.
अशी तर परिस्थिती आहे. पुणेकर त्यांतच
पेठे नुसार विभागणी करतात.
सदाशिव पेठ एक चार झोपते.
चितळे ची बाकरवडी आणि चितळेच श्रीखंड खातात.वरण भात त्यांना प्रिय
अशी नावे ठेवून जातात.
पुणे किल्ले सिंहगड आहे तर मोठं मोठी धरणे आहेत. पानशेत धरण फुटल्या नंतर ही पुणे पुन्हा ताठ मानेने उभे राहिले.
पेशवे चा शनिवार वाडा आहे.लाल महल सारस बागेतील तळ्यातला गणपती आहे.
संतांची भूमी देहू आळंदी आहे.
हिंजवडी सारखे मोठमोठे आयटी पार्क आहे.
पुणेकर खायचे शौकिन खवय्ये आहेत.
पुणेकर कोणाच्या भानगडीत पडत नाही
आपण आपलं भलं असं माझं पुणे शहर.
सह्याद्रीच्या कुशीतील रिटायर्ड लोकांचं आनंदाने जगण्याचं असं माझं पुणे शहर
         I love you Pune
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, April 25, 2022

वेडू संघर्ष (चारोळी)

मनाचा संघर्ष.... 
रोजच छळतो....
वेडू तुझ्या आठवणीत...
मन रोजच झुरते....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मनाचा संघर्ष

वेडू तुला भेटण्यासाठी
तुझ्या प्रेमासाठी
मनाचा संघर्ष रोजच चालतो.
कशी समजावू या मनाला
वेडू भेटणार नाही.
संघर्ष करून काही उपयोग
होणार नाही.
संघर्ष करून मनाला
त्रास करून घेण्यापेक्षा
वेडू तुला स्वप्नात आणि
कल्पनेत भेटणच बरं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


राणी तुझा संघर्ष

अग माझी राणी 
किती ग करशील संघर्ष
मनावर जरा घे ग
मनाच जरा ऐकशील का
विचार करून त्रास करून घेऊ नकोस.
मनाशी संघर्ष करत बसू नकोस.
मनाला पटेल ते आणि आनंदाने जग 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मन

मनाचा संघर्ष रोजच असतो.
बुध्दी आणि मनाचं गणित कोठे जमतं.
बुध्दी सांगते मनाला शांत राहा.
मन मात्र आपल्याला हवं तसंच वागते.
मनाच ऐकलं तर बुध्दीला पटत नाही.
बुध्दीच ऐकलं तर मनाला पटत नाही.
दोन्हींच्या मध्ये मरण मात्र माणसांच येतं.
मन मात्र शेवटी जिंकत बुध्दी शांत बसते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Sunday, April 24, 2022

सुखी संसार

सुखी संसाराची एक परिभाषा
दोघांनी एकमेकांना समजून घेणे.
एकमेकांची साथ देणे.
तू तिथं मी आणि मी तिथं तू
कधी त्यांच्यात हो ला हो करावं
कधी आपल्या हो ला हो करायला लावावं.
एकनिष्ठ प्रामाणिकपणा समजून घेणे.
हे सर्व जमलं तर संसार सुखाचा होतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


नारी योध्दा

मीच आता माझी योध्दा
मीच माझी झाशीची राणी
लढायचे आहे माझे मलाच
माझ्या हक्कासाठी 
माझ्या सन्मानासाठी
माझ्या स्त्रीत्वासाठी
मी पण एक नारी
असून काही कमी नाही.
मीच मी माझी‌ योध्दा असेन..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


माझा योध्दा

योध्दा तू सखा तू वेडू तू
माझं सर्वस्व तू तुझीच तर मी
तूच तर माझ्या जीवनाचं सार
तुच तर माझा योध्दा 
तूच माझा योध्दा पुरुष
तुझ्या शिवाय आहेच काय
जनी स्थळी पाषाणी तूच तूच
माझा योध्दा पुरुष
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, April 22, 2022

मैत्री

मैत्री आपली 
निर्मळ निस्वार्थी श्रध्दा ठेव 
अंधश्रद्धेमुळे मैत्री नको रे सोडू
विश्वास तोडू नकोस.
श्रध्देने आपण आपली मैत्री
जपून ठेवू.
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍🏻✍🏻©️®️


अंधश्रद्धेचा खेळ

श्रध्दा अंधश्रद्धा हा सगळा खेळ मनाचा
नको रे मानवा घालू अंधश्रद्धेला तू खतपाणी
श्रध्दा ठेव स्वतःवर स्वत:च्या स्वबळावर
लिंबू गंडेदोरे बुवाबाजी हे सर्व थोतांड आहे.
अंधश्रद्धेत अडकून आपणच आपला बळी देतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अंधश्रद्धा

अंधश्रध्दा श्रध्दा
नको पडू भानगडीत
श्रध्दा ठेव विश्वास ठेव
अंधश्रद्धेला बळी नको जाऊस...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अंधश्रद्धा

गंडेदोरे लिंबू बुवाबाजी ही आहे अंधश्रद्धा
नामस्मरणाने घेता मन होईल शांत
मन एकाग्र असेल तर विचार चांगले सुचतील
आपणच आपले मार्ग मिळतील.
दगडाला शेंदूर फासून देव नाही होतं
कोंबडं बकरं असं काही देव नाही मागत.
अंधश्रद्धेचा नावाखाली बळी दिला जातो.
एक मुका जीव जगण्यास मुकला जातो.
देव भक्तीचा रे भुकेला नामस्मरणाने
मनाला मिळतो आधार 
भुकेल्याला अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या
अडचणीत आहे त्याला मदत करा.तिच तर खरी सेवा आहे.गंडेदोरे बुवाबाजी ची गरज कधीच पडणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Thursday, April 21, 2022

बगिच्या बहरला

राणी तुझा हसरा चेहरा पाहून
बगिचा बघ कसा फुलला
फुले अशी गुलाबी टवटवीत
जसे काही तुझे गुलाबी ओठ
लाल जर्द गुलाब 🌹बघ
जणू काही तुझे लाले लाल गाल
कमळ बघ ते किती सुंदर
जणू तुझे कमळ नयन
सोनं चाफा बघ तो कसा सोनेरी 
जणू बघ तुझ्या कांतीचा रंग
बगिचा ही बघ कसा 
तुला पाहून आनंदाने फुलला...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडू चाफा (चारोळी)

राणी तुझा वेडू चाफा..
तसा बोलत नाही...
तुला भेटल्यावर बागेत...
हा सारखा रुसत तर नाही...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


चाफा

चाफा बोलेना चाफा चालेना
राणी तुला पाहून बघ
चाफा बोलू लागला
बहरून वेडा तो
तुझ्या कडे पाहू लागला
माझ्या पेक्षा तोच जवळचा झाला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


आपली भेट

राणी तो आपला भेटायचा कट्टा
त्या बागेतील तेथे भेटायला ये ग
खूप वर्षं झाली ग भेटून
आता या कातरवेळी काय राहिलं 
मैत्री रुपी प्रेमात हक्काने जरा भेटू
निवांत भेटून सुख दु:खाचे चार शब्द बोलू...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


चाफ्याची बाग

वेडू चल ना चाफ्याच्या बागेत जाऊ
मनभरून चाफ्याचा सुगंध घेऊ.
त्या सुगंधात धुंद होऊन जाऊ
तेथील दोन चाफ्याची फुले
तू माझ्या केसात माळ
चाफ्याची वेणी आपण बनवू
येताना ओंजळीत घेऊन येऊ
वेडू चल ना चाफ्याच्या बागेत जाऊ...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमाच सीक्रेट

राणी तुझ्या माझ्या प्रेमाच
सीक्रेट असंच राहू दे.
समजायला नको कोणाला
नाही तर दृष्ट लागेल ग 
आपल्या प्रेमाला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडूच सीक्रेट

वेडू तुझ्या माझ्या प्रेमाच
सीक्रेट अजून जपून ठेवले आहे.
मनाच्या तळात ते जिवंत आहे.
आठवण तुझी येता आपल्या
प्रेमाच्या राज्यात फिरून येते.
गालावर लाली घेऊन
ताजीतवानी होऊन येते.
मग सर्व जण विचारतात
क्या राज आहे.
आज गालावर लाली चढली आहे.
कस आणि काय सांगू
त्यांना वेडू आपल्या प्रेमाच सीक्रेट
ऐकून ते मी फक्त लाजून चूर होते...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


निसर्गाच सीक्रेट

निसर्गात सीक्रेट खूप आहेत.
रवी ठराविक वेळी उगवता ना नभात रंगाची उधळण करतो आणि त्यांचं ठराविक वेळी मावळताना ही नभात छान रंगांची उधळण करत कोठे बरं जातो.
चंद्र तारे चांदण्या येतात कोठून
लुकलुक करत आभाळभर पसरतात कशा
हवा आहे पण दिसत कशी नाही.
मेघातून पाऊस बरसतो कसा
वीजेचा प्रवाह मेघात जातो कसा.
मेघात ही वीज कडकडून तिला
मात्र तिचा त्रास कसा होत नाही.
दिवस रात्र होते कशी
निसर्गाच हे चक्र चालवत कोण
किती तरी सीक्रेट दडलेले आहे या निसर्गाच्या सान्निध्यात  
हे निसर्गाचे सीक्रेट मिशन कधी कळेल का आपल्या???
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍🏻✍🏻©️®️


राणीचा वेडू (चारोळी)

राणीचा वेडू कोण हे जाणण्याच...
सीक्रेट मिशन सगळ्याच...
कठीण बरं शोधणं आम्हाला...
कल्पना हेच तर ठिकाण आमच भेटण्याचं...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Wednesday, April 20, 2022

सौंदर्याचं सीक्रेट

राणी नजरेत तुझ्या पाहता
मी स्वतःला हरवून बसतो.
तुझ्या गालावरच्या खळीत
मी गुंतून जातो.
तुझा हसऱ्या चेहरा पाहून
मी भान हरपून जातो.
गोड गुलाबी तुझ्या ओठावर
मी फिदा होऊन जातो.
हनुवटी वरच्या तीळेवर
जीव माझा गुंततो.
असं काय ग राणी 
तुझ्या सौंदर्यच सीक्रेट आहे.
मी माझा न राहता 
तुझाच होऊन जातो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडूची मैत्री

वेडू प्रेम की मैत्री त्यात नको अडकायला
मैत्रीच करू रे निस्वार्थी निर्मळ
प्रेमात रूपांतर नको करायला.
मैत्रीची परिभाषाच वेगळी असते.
प्रेमाच काय वितळून संपवून जाते.
मैत्रीची व्याख्या सुंदर असते.
अधिकार दाखवणे सोपे असते.
प्रेमाच काय पटलं नाही सोडून दिले.
मैत्रीत तसं नसतं रे किती ही सोडू
म्हटलं तरी मैत्री सुटत नाही रे वेडू...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मैत्री {चारोळी}

वेडू मैत्रीतील प्रेम देशील का?
मैत्रीतील हात असाच ठेवशील का?
प्रेमाचे दोन शब्द बोलशील का?
चाफ्याची दोन फुले आणशील का?
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मैत्री

मैत्रीतील प्रेमाला तू ओळखून घे
मैत्री की प्रेम तू रे समजून घे
मैत्रीतील प्रेमाला सोनेरी 
किरणांच बंधन बांधू घेऊ
मैत्रीतील प्रेमाच उंचच उंच 
असं शिखर आपण बांधून घेऊ...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


जीवन {चारोळी}

जीवनात असते गरज
प्रेम किंवा मैत्रीची
साथ तुझ्या आठवणींची 
सोबत तुझ्याच प्रेमाची
मेघा...✍️✍️©️®️


प्रेम की मैत्री

हृदयापासून हृदयापर्यंत
असते ते प्रेम 
हृदयापेक्षा एक पाऊल
पुढे असते ती मैत्री 
प्रेमात अपेक्षा असते.
मैत्री निरपेक्ष असते.
प्रेमात स्वार्थ असतो.
मैत्री निस्वार्थ असते.
प्रेमात बंधन असते.
मैत्रीत बंधन नसते.
प्रेम ठराविक वळणा
पर्यंत सोबत असते.
मैत्री शेवटच्या श्वासा
पर्यंत सोबत असते.
मुक्तछंद काव्या
 मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, April 18, 2022

तू आणि मी

अज्ञात आहे तू आणि मी
तरी ओढ का रे या जीवा अशी
अज्ञात आहे जीवन आपले
तरी जीव का रे गुंते तुझ्यात
अज्ञात आहे मला तुझी कहाणी
तरी तुझीच आठवण का रे मनी दाटे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडू{ चारोळी}

अज्ञात होता तू वेडू...
जीव मात्र तुझ्या मध्येच गुंतला...
प्रेम तुझ्यावर करून बसले...
अशी कशी रे मी तुझ्यात गुंतले..
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अज्ञात व्यक्ती {चारोळी}

अज्ञात अशी व्यक्ती...
मदत करून गेली...
काळजी घे म्हणता...
सल्ला ही देऊन गेली...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अज्ञात राणी

राणी अज्ञात होती ग तू मला
तुला पाहिले आणि नजरेचे 
खेळ सारे सुरू झाले..
गुंतत गेलो तुझ्यात
हसत होतो रोजच मनात
जोडी बघ कशी आपली
राणी आणि वेडू‌ची जमली..
अज्ञात राहून ही प्रेमामय झालो..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अज्ञात {चारोळी}

राणी तू मला अज्ञात होती...
माझी काळजी घेत होती...
किती किती समजावून सांगून...
मला मदत करत होती..
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


अज्ञात वेडू

अज्ञात व्यक्ती होऊन 
वेडू माझ्या जीवनी आला.
मग भरभरून तुझ्यावर 
रोजच लिहू लागले.. 
स्वप्नांच्या दुनियेत 
तुला रंगू लागले..
स्वप्नांच्या डोळ्यात 
तुलाच पाहू लागले..
मनातील सुख दुःख 
तुला शेअर करू लागले..
अज्ञात वेडू असा कसा रे तू
तुझ्या शिवाय आता चैन पडत नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा..‌.✍🏻✍🏻©️®️


Sunday, April 17, 2022

जंगलाची सफर

जादुई जंगलाची सफर ग करू
छोटंसं स्वप्नांचे घर तेथे सजवू
निसर्गाच्या सान्निध्यात मस्त राहू
झुळझुळ वाहणारी नदी तेथे आहे.
झुळझुळ पाटाचे पाणी पिऊ
ताजी ताजी फळे कंदमुळे खाऊ
फुलांची बरसात तुझ्यावर करतो.
अल्लड अवखळ वाऱ्या सोबत
मस्ती करू उडणाऱ्या 
वाघाची डरकाळी ऐकून
कुशीत माझ्या घेईल.
नाजूक तुझ्या पायात काटा 
टोचता हळूच मी काढील 
आधार माझा तुला देईल.
चल ना ग राणी जादुई जंगलाची
सफर ग करू...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


जादूई जंगल

जादुई जंगलात आपणच दोघं जाऊ
तू सोबत असताना कसली आली भीती
सोबतीने जंगल पालथं घालू.
काय काय जादू आहे बघून घेऊ..
चांगलं काही शिकून घेऊन येऊ.
वाईटावर मात करून गाडून येऊ..
क्षणभर निवांत बसून येऊ.
शांततेचा अनुभव घेऊन येऊ..
चल ना जादुई जंगलात
आपण दोघेच जाऊ...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Saturday, April 16, 2022

न्याय अन्याय

राणी मनापासून खरं
प्रेम केलं होतं..
नियतीने मात्र आपल्या
प्रेमावर अन्याय केला..
खऱ्या प्रेमाला न्याय न देता 
अन्याय देऊन आपल्याला विभक्त केलं..
हा ग कसला न्याय नियतीचा
आता जीवनाच्या कातरवेळी
तरी नियतीने न्याय करावा.
आता या कातरवेळी
काहीच इच्छा नाही..
एकदा तुला भेटावे बघावे 
असे वाटते ती इच्छा पूर्ण व्हावी.
नियतीने आपली भेट घडवून आणून आपल्यावर न्याय करा 
एवढीच इच्छा आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


न्याय (चारोळी)

न्याय अन्याय करत 
तिचा मात्र नाहक बळी जातो.
न्याय तर तिला मिळत नाही
अन्याय करणारा सहज सुटून जातो.
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


न्याय

न्याय मिळतो का ओ?
अन्याय मात्र ताबडतोब मिळतो.
किती ही लढा न्यायासाठी पण नाही.
खऱ्याच खोटं आणि खोट्याच खरं हाच तर न्याय आहे.न्याय मिळवणारा लढत राहतो.
न्यायाला शिक्षा होतो.आणि अन्याय मिळवणारा न लढता ही सहजच सुटून जातो. न्याय देवता खरं तर कानांनी ऐकू न्याय देणार असते म्हणून तर तिच्या डोळ्यांवर पट्टी असते. पण खरं तर न्याय देवताच आंधळी आहे. ती काय न्याय लावणार ऐकून न्याय देण्यापेक्षा ती व्यक्ती खरं बोलते का खोटं बोलते हे त्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसतं खरं बोलणारी व्यक्ती ताठ मानेनं जगायला बोलते. खोटं बोलणारी व्यक्ती कधीही ततपप करत डोळे खाली घालून भिरभिरत नजरेने बोलते.
जेवढं व्यक्ती डोळ्यांनी बोलते तेवढं ती सांगू शकत नाही न्याय देणाऱ्याला मन आणि डोळे वाचता यायला हवेत.म्हणजे खरा न्याय मिळेल.
मला तरी वाटत न्याय देताना व्यक्तीच्या डोळ्यात बघून न्याय द्यावा.
म्हणजे कोणावर ही अन्याय होणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडू कशी मी

वेडू माझी स्वतःची अशी काय 
ओळख करून देऊ
तूच ओळख मी अशी का मी तशी
तुलाच तर जास्त मी माहित असेल
तुच तर मला माझ्या पेक्षा जास्त ओळखतो.
मग तूच सांग माझी स्वतःची ओळख
कशी रे तुझी राणी अशी का तशी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


अशी मी तशी मी

मेघांन सारखी मेघा तू अथांग मनाची
कधी रिमझिम बरसात करणारी
तर कधी धो धो कोसळणारी
तर कधी मायेचा शिडकाव करणारी
तर कधी चंद्र ताऱ्यांना पण
तुझ्या काळ्या ढगांनी लुप्त करणारी
तर कधी तळपळ त्या रवीला
तुझ्या आड लपवून त्यांचा
सोनेरी किरणांचा प्रकाश
बंदिस्त करणारी तू तर कधी
रवीच्या रंगात रंगून सोनेरी किरणांत
उजळून निघणारी तू ग मेघा 
तर कधी शामला रंगात सोज्वळ 
तुझं ते निरागस रूप ग तुझं अशी मेघा...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


स्वतःची ओळख

स्वतःची ओळख मी काय देऊ
जो मला जसा समजेल तशी मी
कोण सखी मैत्रीण म्हणतं,तर
कोणी ताई म्हणतं,कोण मेघा म्हणतं,
पण मी स्वाभिमानी सरळ स्वभावाची आहे.
खोट्य बोलणं आवडतं नाही व खोटं बोलणारी माणसं ही अजिबात आवडत नाही. काही असेल ते खरं सांगून मोकळं होते.नाही काही पटलं शांत राहते.पण
एखादी गोष्ट मनावर घेतली.आणि डोक्यात पक्की केली तर ती गोष्ट मी करतेच.
मग तेथे मला त्रास होवो कोणी काही बोलो.
ती करायची म्हणजे करायाच काही ही होवो.
असा माझा स्वभाव..
मला कोणाची खोडी काढणे किंवा भांडण पटापट कोणाच्या मनाला लागेल असे बोलणे मला जमत नाही.
छक्के पंचे माहित नसलेली अशी मी
माझा स्वभाव तसा सरळ साधा
एकतर मी स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही. पण एखाद्याला जीव लावला तर मला किती ही त्रास झाला तरी साथ देते‌. पण तिचं व्यक्ती
काही कारणाने मनातून उतरली की मग मी त्या व्यक्तीकडे काहीही झालं  तर बघत ही नाही. अशी माझी ओळख त्यातून कोणाला माझी ओळख कशी वाटते सांगा तशी मी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Thursday, April 14, 2022

ते रेयुनियन (लघुकथा)

आज कॉलेजच रियुनियन होतं. खूप वर्षांनी सर्व जण भेटणार होते.जो तो आपली मैत्रीण कशी दिसत असेल काय कर असेल.
आपला मित्र कसा दिसत असेल काय करत असेल सर्व जण जवळजवळ पन्नाशीचे तर पन्नास प्लस कोणाला चष्मा तर कोणाला ढेरी कोण गोलघुमट तर कोणी टकलू कोणाची रुपेरी बट तर कोणी डाय लावून केस काळे केलेले.असे सर्व विदूषक भेटणार होते. सर्वांची मुले शिक्षणासाठी कोठे तर कोणाची परदेशात तर कोणाला सून जावई आलेले.
आशा सगळ्यांचा छान गोतावळा जमणार होता. तो ही विचार करत होता ती येईल का
कशी दिसत असेल काय करत असेल.
मुळात सुंदर व हुशार असणारी ती आता नेमकी कशी असेल.एकदा तरी तिला मी माझ्या मनातील प्रेम तिच्या कडे व्यक्त करायला हवे होते. मैत्री तुटेल तिला आवडणार नाही म्हणून मनातील प्रेमाच्या भावना मनात साठवून ठेवल्या होत्या.
तो दिवस उगवला सर्व आवरून एक एक जण ठरल्या जागी येऊ लागले. 
मी ही पोहचलो हाय हॅलो झालं भेटी गाठी चेष्टा मस्करी चालू झाली.कोण कसं दिसतं त्यावर छळणे चालू होते.
माझे मन आणि डोळे मात्र तिला शोधत होते
ती आली शांतपणे हसत पण ते हसणं तिचं पूर्वी सारखं खळखळून हसणं नव्हते. त्या हसण्यामागे‌ अश्रू होते. थोडं दुःख जाणवत होतं.थोडीशी जाड झालेली वाटत होती.
मी जाऊन तिला भेटलो बोलली काय करते विचारले.काहीच नाही रे घर सांभाळते सूनेच ,आई, बायको,व इतर नाती सांभाळते.
मनाला खूप खूप वाईट वाटले.एवढी हुशार
गोल्ड मेडल पण फक्त कर्तव्यात अडकली होती. आता तर मुलं पण शिकायला परदेशी आहेत.नवऱ्याला बिझनेस मुळे वेळ नाही.
आता कधी त्यांच्या सोबत पार्टी तर त्यांच्या सोबत शोभेची बाहुली असते. बोलू थोडंफार मोकळी झाली. तिला समजावलं आता आली आहे तर एन्जॉय कर. तिनेही माझ्या शब्दाला मान देऊन खूप मोकळेपणाने सर्व छान एन्जॉय केलं.निरोप समारंभाच्या वेळी सर्वांनाच भरून आलं. ती ही रडली मला वाईट वाटलं जाता जाता एकच म्हणाली एवढं प्रेम करत होता.तर तेव्हा एका शब्दाने पण का काहीच बोलला नाही.मी ही खूप मनापासून तुझ्यावर प्रेम करत होते. आणि पाठमोरी होवून निघून गेली...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


रेयुनियला ओळख( चारोळी)

रेवुयिनयनाला ओळखशील का वेडू....
आपल्या या राणीला....
वेगळं वळण देऊ चल ना....
अधुर्या आपल्या काहाणी ला...
मेघा....✍🏻✍🏻©️®️


रेयुनियन

कॉलेज रियुनियनला ये ना.
गप्पा गोष्टी करू या ग
चार क्षण आनंदाचे घालवू या.
कॉलेज ते दिवस आठवून
कॉलेजचा त्या दिवसांत जरा रमू या...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


कॉलेजच रियुनियन

काॅलेजचे ठरले रियुनियन
ज्यांच्या त्यांच्या मनात होते
भेटण्याचे आनंदी क्षण
जमले सगळेच उत्साहाने
जो तो एकमेकांना विचारतो 
तू सध्या काय करते,काय करतो
जमला होता सगळा सळसळता उत्साह
आपलं प्रेम मित्र मैत्रिणी एकमेकांना
भेटून सगळेच झाले खूश
उत्साहाची नवचैतन्याची
वर्षभरासाठी घेऊन शिदोरी
सगळेच निघाले परत परतीच्या वाटेवर
मुक्तछंद काव्या
मेघा....✍🏻✍🏻©️®️


Wednesday, April 13, 2022

सल

संशय तू रे घेऊ नकोस.
मनात सल ठेवू नकोस.
बोलून विचारून मोकळा हो.
मनमोकळेपणाने सर्व बोल 
मी हि सगळं सांगून मोकळे होईल
छक्के पंजे मला रे जमत नाही.
प्रेमाच्या आपल्या नात्यात
संशयाची सुई नको रे टोचू
प्रेमाचा धागा आपला तुटेल रे
इतकेही नको ना रे ताणू
संशय हा मनी नको रे बाळगू
प्रेमाने राहू आयुष्यभर...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमावर संशय

प्रेमाची आपली शाळा ती भरली.
तुझं माझं करता करता 
संशयाची ठिणगी बघ पडली.
ठिणगीचा बघ वणवा झाला.
त्या संशयाच्या भोवऱ्यात 
प्रेम आपलं जळून बघ खाक झाले...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुरी

माणसा संशयाचे भूत मानगुटीवर बसले
मान मोडून तुझ्या रे हातात दिली
म्हणून म्हणते माणसा नको रे बाळगू 
संशयाचे भूत देईल बघ हातावर तुरी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


संशय

संशय तो तुझ्या मी का ग आला
सुखी संसाराची आपल्या 
वाताहत करून गेला.
संशयाचे भूत तुझ्या डोक्यात घालून
मला तुझ्या पासून मुलांन पासून
परके तू ग केल.
संशयाची तुझी ठिणगी संसाराची
आपल्या राखरांगोळी करून गेली.
समजून घेऊन बोलली असतीस.
विचार करून वागली असतीस
तर तू तेथे मी येथे नसतो ग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️



Tuesday, April 12, 2022

प्रेमाची कबुली

राणी आपण एकमेकांना
प्रेमाची कबुली कधी दिलीच नाही.
मनातून प्रेम मात्र खूप केलं.
एकमेकांना पहिल्या शिवाय आपल्या करमत नव्हते. त्या प्रेमाला एकतर्फी प्रेम म्हणायचं का ग एकमेकांच्या आयुष्यात परत आलोच नाही. एकतर्फी असले तरी आपलं प्रेम आपण असंच जपून ठेवू ग. तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही ग राणी.
प्रेम माझं खरं होतं तू जेथे कोठे असशील तेथे सुखी राहा.कधी तुला माझी गरज लागली तर नक्कीच मनापासून आठवण काढ मी तेथे असेल तुझ्या मनाला उभारी द्यायला.तू तुझी काळजी घे ग...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


परिभाषा

एकतर्फी प्रेमाची परिभाषा वेगळीच असते.
तो किंवा ती जीवापाड प्रेम जपत असते.
दुसरा मात्र खेळखेळत असतो.
मनाचा विचार कधीच करत नसतो.
तुटल्या हृदयाचे त्याला किंवा तिला घेणे देणे नसते.खेळून झालं की डाव मोडून काढण्यात त्यांना शान वाटत असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


ओढ {चारोळी}

प्रेमाचा तो क्षण होता.
तुझ्या माझ्या भेटीचा....
गुंतले होते रे तुझ्यात 
एकतर्फी प्रेमाच्या ओढीचा....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


एकतर्फी प्रेम

बोलता बोलता तिच्या प्रेमात पडलो
तिने मात्र मनाचा ठाव लागू दिला नाही. 
मी मात्र तिचे प्रेम आहे समजून वागत गेलो.
तिच्या हौसमौज पुरवत गेलो.
तिच्यासाठी पैसे खर्च करत गेलो.
तिच्यासाठी पुर्ण वाहत गेलो.
एकदिवस मात्र माझ्या समोरच
तिने त्याला प्रेमाची कबुली देऊन
तिचा हात त्याच्या हाती दिला.
हसत हसत मला टाटा बाय बाय
करत त्यांच्या सोबत निघून गेली.
मी मात्र एकतर्फी प्रेमात पुर्ता अडकून गेलो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, April 11, 2022

चेकमेट

खेळाचा डाव रंगला होता.
त्या खेळाच्या रंगात 
आपण दोघे रंगलो आहोत.
खेळ चांगला रंगात आला
आणि तू मला अचानक
चेकमेट करून गेला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेडू चेकमेट {चारोळी}

वेडू बघ ना रे नियती कसा
खेळ आपला खेळून गेली....
वाटतं होतो जिंकतो आपण
पण ती चेकमेट देऊन रे गेली....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


राणी चेकमेट{ चारोळी}

राणी चेकमेट आपण झालो
तू तेथे आणि मी येथे...
तडफडतो आपण
नियतीच्या चेकमेट ने येथे...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमात चेकमेट

वेडू चेकमेट प्रेमात करून का रे गेला
हाती हात देता देता 
हात सोडून का रे गेला...
नजरेला नजर देऊन गेला
पण माझ्या नजरेत 
मात्र राहून गेला..
प्रेमाचा खेळ खेळून गेला
मनाच्या एकांतात खेळ
अजूनही चालू आहे.
नियतीने मांडला 
आपल्या प्रेमाचा खेळ
वेडू तू मात्र प्रेमात 
चेकमेट करून गेला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सुंदर क्षण

रवीचा तो सुंदर अस्त
अस्ताला जाता जाता
मेघांच्या आसमंतात केलेली 
ती सुंदर रंगाची उधळण
त्याच क्षणी माझा हात
तू तुझ्या हाती घेतलेला..
ती सुंदर वेळ तो सुंदर क्षण
आणि तो रवीचा सुंदर अस्त...
छानच जमून आला होता
तो अस्मरणीय क्षण...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


आता निघायला हवं

आता निघायला हवं.
आवराआवरी करायला हवी..
इथला प्रवास आता संपतं आला
इच्छा आकांक्षा संपल्या आहेत..
देणे तेवढे बाकी आहे
ती देण्याची पूर्तता पूर्ण करायला हवी...
घेणे काही शिल्लक राहिलेच नाही
आशीर्वाद तेवढे घ्यायचे आहेत...
शरीराची होईल आता येथे राख
त्या राखेतून हि मोती बनायला हवे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


ओढ

वेडू तुझ्यात गुंतले
ओढ तुझीच लागली..
ओढ तुझ्या प्रितीची
ओढ तुझ्या सोबतीची
ओढ तुझीच रे
आयुष्याच्या शेवटापर्यंत
अशीच राहिले शेवट पर्यंत...
मुक्तछंद काव्या
मेघा..✍🏻✍🏻©️®️


जुळले

मनाशी मने फक्त जुळली 
नजरेला नजर फक्त मिळली 
बाकी काही जुळले नाही 
आपण एकमेकांचे झालोच नाही 
प्रेमाचे गीत गायलोच नाही‌ 
एकमेकांना भेटलोच नाही
तू समजून घेतलेच नाही
आता तुझ्या आठवणीत रमणे
तेवढेच बाकी आहे 
आता तेच तर करत आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सोनचाफा

मोह मला झाला
तुला पाहण्याचा
तुझ्या सुगंधात 
मिसळून जाण्याचा
कसा रे फुलतो 
तू पहाटेच्या 
साखर झोपेत
तुझ्या दरवळण्याने
मग मला येते जाग
तुझ्या मिठीत येऊन
भरते श्वास 
अंगावर घेते
तुझा सडा
धुंद होऊन
तुझ्या मोहात 
तू रे माझा सोनचाफा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


Sunday, April 10, 2022

सत्य की स्वप्न

सत्य आहे कि स्वप्न आहे
वेडू तू समोर आहेस.
सत्यात जगते का स्वप्नात जगते
तुझ्या मिठीचा विळखा 
खरंच आहे.
सत्य आहे कि स्वप्न आहे
चाफ्याच्या सुगंध दरवळत आहे.
टपोरी चाफ्याची फुले 
खरंच माळली आहे.
सत्य आहे कि स्वप्न आहे
माझ्या ओल्या नयनी चे 
अश्रू खरंच तू पुसत आहे.
सत्य आहे कि स्वप्न आहे
वेडू तू खरंच माझ्या सोबत आहे.
सत्य आहे कि स्वप्न आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सत्य असत्य

सत्यता आता कोठे राहिली आहे.
जो तो पैसा प्रतिष्ठेत साठी असत्याचा
वापर करत आहे.आपल्याच जन्मदात्या ना फसवत आहे. नातलगांना फसवत आहे.
असत्यचा जयजयकार होत आहे.
त्यांच्याच परिणाम निसर्गावर होत आहे.
तो हि बदलत आहे.
माणूस माणूसकी सोडून वागत आहे.
असत्याचे चटके सर्वत्र बसत आहे.
माणसातील माणुसकी हरवली आहे.
असत्याचाच विजय होतो आहे.
त्यामुळे सत्य घाबरून जगत आहे.
बघावे तेथे असत्याची दादागिरी चालली आहे.सत्याला वाचा असून हि असत्यामुळे सत्य मुके झाले आहे.
असत्याचे घोर कलियुग चालू आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सत्य

नेहमी खरे बोलावे हा सुविचार आपण लहान पणा पासून लिहितो वाचतो.
सत्य सत्यच असते.देवाच्यादारी सुध्दा सत्याचाच विजय होतो.
सत्याला नसते मरण सत्याला घाबरणे माहित नसते. सत्याचा विजय होतोच. सत्य कायम सत्य असतं. म्हणून नेहमी सत्य बोलावे सत्यातच जगावे. 
असत्याला कधीच सोबत करू नका.असत्य हा क्षणभरासाठी आनंद देऊन जाईल आणि
कायमच दुःख देऊन जाईल. क्षणभराच्या आनंदासाठी आयुष्यभर दुःख सोसण्या पेक्षा
सत्यात जगावे सत्यात मरावे.
किर्तीरुपी मागे उरावे.....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, April 08, 2022

वेडू भेटू या

वेडू आयुष्यात भेटू रे पुन्हा एकदा
मनातील काही गोष्टी सांगायच्या आहेत.
तुला एकदा मनभरून पाहायचं आहे.
नजरेला नजर द्यायची आहे.
प्रेमाच्या गोष्टी करायच्या आहेत.
मनातील स्वप्नांचे खेळ खूप झाले.
प्रत्यक्षात एकदा भेटू या 
वेडू सरणावर जाण्याआधी 
तरी एकदा भेट घे रे मनातील गोष्टी समजून घ्यायला तरी भेट. 
त्या वळणावर आपण भेटू रे वेडू एकदा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


भेट त्या वळणावर

मी तिला पुन्हा भेटलो
त्याच त्या वळणावर
भेटून ही बोललो नाही.
नजरेने पाहून घेतलो.
त्यांच त्या वळणावर
एकदा तरी मागे वळून
पाहिलं म्हणून थांबलो 
त्यांचं त्या वळणावर
ती ही पुन्हा तशीच गेली
नेहमीच्या पद्धतीने
घुटमळलो तेथेच
त्यांचं त्या वळणावर
पुन्हा एकदा भेटशील
का त्यांचं त्या वळणावर
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


राणी ये भेटायला

राणी पुन्हा भेटलो असतो ग
त्याच वळणावर जेथे झाली होती 
तुझ्या माझ्या नजरेची नजर
ये ग पुन्हा एकदा परतूनी
कातरवेळी तेथेच भेटायला..
मुक्तछंद काव्या 
मेघा...✍️✍️©️®️


ती पुन्हा भेटली {लघुकथा}

आज किती तरी वर्षांनी तिला पुन्हा भेटलो.
त्यांचं त्या नेहमीच्या ठिकाणी ती आली होती. ती जागा आमच्या दोघांची आवडीची जागा होती. शांत निसर्गरम्य असा तो परिसर होता. तेथेच तर आम्ही भेटायचो मनातील गुंजगोष्टी एकमेकांना सांगायचो.
तिथेच तर आम्ही एकमेकांना प्रेमाची कबूली दिली होती. ती जागा आमच्यासाठी खास जागा होती. 
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी व आम्ही एकमेकांना प्रेमाची कबूली दिली त्या दिवशी मी आवर्जून तेथे जायचो.
थोडावेळ तेथे बसून आमचे ते दिवस आठवून तेथे थोडं रममाण होऊन तू जेथे कोठे असशील तेथे सुखी राहा. असे म्हणून मी तेथे त्या ठिकाणी दोन चाफ्याची फुले ठेवून यायचो.
तो दिवस ही तोच होता. तिचा त्या दिवशी ५०वा वाढदिवस होता. म्हणून मी आज तिच्या साठी एक छान कविता करून व दोन चाफ्याची फुले घेऊन गेलो होतो.
मी जायच्या आधीच ती तेथे येऊन बसली होती.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
अरे हि येथे कशी काय आमच्या दोघांची नजरानजर झाली. दोघांही काय बोलावे सुचेना फक्त दोघं एकमेकांकडे पाहत होतो.
मग मीच पुढे होऊन.
तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ती चाफ्याची फुले दिली. ती भावूक होऊन रडू लागली. मी तिला रडून मोकळं होऊन दिलं
ती शांत झाल्यावर तिला तिच्यावर केलेली कविता म्हणून दाखवली. ती खूप खूष व आनंदीत झाली.
मी तुझ्या आयुष्यात आले नाही तरी तू अजूनही माझ्या आवडी जपून ठेवल्यास म्हणाली. व नेहमीच्या पद्धतीने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती फुले घेऊन मनसोक्त 
त्याचा सुवास हुंकून ती फुले नेहमीच्याच स्टाईलने केसात माळली. थोडावेळ गप्पा मारून एकमेकांची जीवन कहाणी सांगून.
आता फक्त मैत्रीतील निरपेक्ष प्रेम जपायचे असे वचन एकमेकांना देऊन
हसतमुखाने तेथून निघालो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Thursday, April 07, 2022

डिनर {चारोळी}

कँडर लाइट डिनर
मला नाही जमत...
मेघात नसेल रवी तर
मला नाही ग गमत...
मेघा...✍️✍️©️®️


कॅंडल लाडट डिनर

कॅंडल लाइट डिनर
वेडू आपण दोघेच होतो.सर्वत्र कॅंडल लावून
छान सगळी तयारी केली होती.
मस्तच जेवणाचा तुझ्या आवडीचा बेत आखला.चिकनचा रस्सा, सुकं चिकन,
चिकन फ्राय, तांदळाची भाकरी,
पोळ्या, इंद्रायणी तांदळाचा दालच्या भात कांदा, लिंबू,कोशिंबीर, स्वयंपाकाचा
घमघमाट सुटला होता.जेवण झाल्यावर
मस्त गारेगार कुल्पी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती. तुला सरप्राईज द्यायचं म्हणून सर्व जय्यत तयारी करून ठेवली होती.
वेडू तुझ्या सोबत घेतलेलं ते कॅंडल लाइट डिनर काय सांगू तुला तो दिवस माझ्यासाठी
किती भाग्याचा दिवस होता....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


डिनरला जाऊ

सख्या चल ना लांब फिरायला जाऊ
कॅंडल लाईट डिनर करु
मस्त झगमगाटात
कपल डान्स करू
एकमेकांच्या मिठीत हळूच
शिरून गोड शिरशिरी
अंगावर घेऊ.
सख्या चल रे जाऊ या ना
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कॅंडल लाडट डिनर

राणी तुझ्या सोबत करायचं आहे
कॅंडल लाडट डिनर
आपण दोघेच जाऊ
तेथे फक्त तू आणि मी असेन.
येशील का ग सोबत
वनपिस घालून छान 
तयार होऊन
मी येईल मस्त आवरून
तुझ्यासाठी आणतो.
तुझ्या आवडीची 
चाफ्याच्या फुले
तुझ्यावर चाफ्याची 
फुलांची उधळण करेल
तुझा हात कायमसाठी 
माझ्या हाती मागेन.
लाजून हळूच तू हात 
माझ्या हाती देशील
त्याचवेळी रिंग तुझ्या 
बोटात घालेन मग
मस्त तुझ्या आवडीचे
कॅंडल लाडट डिनर करू
तृप्त मनाने परत येऊ..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, April 06, 2022

निष्ठावान वेडू

वेडू माझा निष्ठावान आहे
प्रेम त्यांचे माझ्यावर अपरंपार
साथ सोबत सतत करतो.
माझी काळजी खूपच घेतो.
जगण्यास मला बळ देतो.
तू मला अजन्म हवी आहेस म्हणतो.
किती करू त्यांच कौतुक तरी कमीच आहे.
असा माझा निष्ठावान वेडू आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्वामी निष्ठा

माझी स्वामी समर्थांनवर निष्ठा आहे.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
हे त्यांचं बीद्र वाक्य आहे.
मला स्वामींचा कायम आधार आहे.
अडीअडचणीला ते मला कायम 
साथ मला देतात.
मला स्वामींचे अनुभव पण 
खूप छान आले आहेत.
स्वामींचा आशीर्वाद घेऊन एखादं काम करण्यासाठी घेतलं तर ती कामे माझी नक्कीच पूर्ण झाली आहेत.
माझा मुलगा तेव्हा बारावीत होता.
आणि अहोना टायफॉइड झाला. ताप इतका होता कि ते त्या तापात काय काय बडबडत होते. समजत नव्हते.तशाच अवस्थेत मी आणि तो दोघांनी मिळून त्यांना अॅडमिट केलं.आणि त्यांची परिक्षा आहे म्हणून तो परिक्षेला गेला.
मी एकटीच दवाखान्यात त्यांच्या सोबत होते.
डॉक्टरांनी हात टेकले आणि मला सांगितले
आम्ही प्रयत्न करत आहोत शेवटी देवाची मर्जी काहीच सांगू शकत नाही.
त्यांची तर नुसती तळमळ तळमळ चालू होती.
मला तर काहीच सुचत नव्हते. विचारांनी डोकं फुटायची वेळ आली होती.
शेवटी स्वामीनाच साकडं घातलं ह्या सर्वातून 
अहो ना आणि मला तारायचं आणि सहीसलामत बाहेर काढायचं असे म्हणून
त्यांचे दोन्ही पाय घट्ट पकडून जो स्वामी समर्थांचा जप चालू केला.तो बराच वेळ करत बसले पहाटे पहाटे साडेतीन चार वाजता ते दिवसभराची तळमळ थांबून शांतपणे झोपले.आणि आठ दिवसांत ठणठणीत बरे होऊन घरी आले.
असे बरेच वेळा मला स्वामींच्या निष्ठेचे फळ मिळाले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


निष्ठावान प्राणी

माणसा तू असा रे कसा
निष्ठावान प्राण्यांचे देवाच्या 
नावाखाली देतोस बळी
देवाला आपली इच्छा सांगतात.
देवा माझं असं होऊ दे तुला कोंबडं देतो.
देवा माझं तसं होऊ दे तुला बकरं देतो.
लालच देतो मानव तू देवामागून घेतात.
देव काय मागतो का? अरे तो तर भक्तीचा भुकेला आहे.
पण मानवा देवाचा नावाखाली तू तर
त्या गरीब शेळी, बोकूड, कोबड्यांचे, बळी देतोस. नंतर मिटक्या मारत सर्व फस्त करतो. आणि पुन्हा म्हणतो अरे एवढी मोठी कोंबडी आणली तरी चिकन कमीच पडल.
एवढं मोठी शेळी, बोकूड, आणलं तरी मटण काही जास्त पडलं नाही.
असं कसं रे म्हणतो तू मानवा
स्वभावाला किती गरीब असतात ते शेळी, बोकूड, कोंबडी 
एक म्हण आहे शेळी गेली जीवांनी शी खाणारा म्हणतो वातड होती.
हा तर तुझा स्वभाव.
सर्व मुके प्राणी निष्ठावान असतात.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, April 05, 2022

राणी रोबोट देते

राणी तुला देते ग
लग्नाच्या आंदणात रोबोट
तुझ्या कामात मदत 
करेल तो खूपच 
सुख तुला मिळेल ग
कामाच्या व्यापातून
मग वेळ मिळेल ग
तुम्हा दोघांना समजून घ्यायला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


जीवन

रोबोटिक जग झाले तर
मानवा तू रे काय करशील
जीवन जगशील कसा
जीवनाच्या आवश्यक गोष्टीसाठी
तरी तुला काम करावं लागेल.
रोबोट वर जग चालले तर
दोन पैसे कसे रे तू कमवणार
माणूस तू तर होशील बिनकामाचा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


यंत्राच जग

रोबोटिक जग यंत्राचे झाले.
तर पाहावे तेथे हातोडी, पकड,
पाने, आणि स्क्रू ड्रायव्हर, 
आॅईल आणि इलेक्ट्रिकल
हेच तर यंत्रमानवच जग राहिल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रोबोटिक जग

रोबोटिक जग सारे
ना कोणाच्या दुःखाची पर्वा
ना कोणाच्या सुखाची किंमत
ना कोणाच्या भावनांची कदर
जो तो जगतो आपल्याच तोऱ्यात
ज्यांची त्यांची दुनिया त्यांच्या पुरती
जो तो स्वतःपुरते पाहणारे
माणुसकी राहिली शिल्लक फक्त
हाताच्या बोटावर मोजण्या इतकी
कोणाची नाही कोणाला किंमत
रोबोटिक जग झाले सारे...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Monday, April 04, 2022

तुझे झुमके

तुझ्या डोळ्यातील चमक
तुझा स्वाभिमान सांगतो.
मान तुझी सभ्यपणाणे 
झुकलेली असते.
कानातील झुमके तुझे
मानाने डोलतात...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


डोळ्यातील चमक

तुझ्या डोळ्यातील चमक 
कोठे ग हरवली राणी....
तुझ्या झुमक्यातील ठसका
कोठे ग गेला राणी....
तुझे ओठचा गुलाबी रंग
पिक्का का ग पडला राणी....
तुझ्या गालाची लाली
कोठे ग लुप्त झाली राणी....
तुझा तो केवड्याचा गोरापान रंग
असा का ग काळवंडला राणी....
तुझ्या कडे बघून भकासपणा
जाणवतो ग राणी....
येऊ दे राणी तुझा पूर्वीचाच
तो अवखळ अल्लडपणा पुन्हा
तुझ्या जीवनात प्रितीचा सुगंध 
पुन्हा एकदा दरवळू दे....
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


तुझे केस

तुझ्या डोळ्यातील चमक
मला करते इशारा...
तुझ्या कानातील झुमक्या मागे
तुझे कुरळे केस लपतात..
तुझे कुरळे केस जेव्हा
वाऱ्याने गालावर येऊन उडतात.
तेव्हा मी होतो ग पुरा बेजार...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


अप्सरा

कानात झुमका, डोळ्यात चमक,
माथी बिंदी,हाती कंकण,
गालावर लाली,ओठ गुलाबी,
रंग तुझा गोरापान,
केस काळेभोर लांबसडक
नक्षत्रांची नार तू
काय तुझी अदा वर्णू
वेड लावते जीवाला
तुला पाहतो पाहतच राहतो.
अशी तू ग पृथ्वीवरची देखणी अप्सरा
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Sunday, April 03, 2022

अभिमान

माझा वेडू रोजच स्वप्नात येतो.
तू स्वाभिमानाने जगतेस 
हेच छान आहे सांगतो.
मला तुझं स्वाभिमानाने जगण आवडत.
माझी राणी किती किती चांगली आहे.
असे सांगून माझे डोळे हळूच पुसतो.
गालावर हळूच पापी देऊन कपाळाचे
चुंबन 😘 घेऊन.
मला तुझा खूप खूप अभिमान आहे सांगून जातो.
अशीच जग ग जगाकडे लक्ष देऊ नकोस.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रवीचा अभिमान

रवीचा मला आहे अभिमान
रोजच सकाळी लवकर येतो 
कोवळी किरणे घेऊन
आकाशात सप्तरंगाची 
उधळण करतो. 
धरणी मातेला तुझ्याकडून
सुवर्णाचा शालू भेट देऊन
सोनेरी उन्हाची तिरीप देतो.
मावळतीला जाताना ही
आकाशात करतो रंगाची उधळण
हसतहसत जातोस 
धरणी मातेला देऊन सोनेरी संध्याकाळ
रवी तुला मेघांनी ही झाकोळून टाकले तरी
पुन्हा तेवढाच तळपळत आकाशी येतो.
नाही रे तुला उगवतीचा गर्व
ना तुला आहे मावळतीचा माज
ना मेघांच्या झोकाळूतून बाहेर पडण्याचा
अभिमान...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझा स्वाभिमान माझा अभिमान

मी स्वाभिमानी आहे त्यामुळे
मला माझा अभिमान आहे.
मला जमत नाही भांडण वगैरे करायला
आणि पटापट बोलायला मला नाही पटलं नाही जमलं तर सरळ बाहेर पडते. त्या ठिकाणाहून मी नाही पडत कोणाच्या भानगडीत मला नाही आवडत कोणाला त्रास द्यायला.
कोणी स्वतःहून सांगितले तर बरं
मला आवडत नाही सहानुभूती आणि 
कोणाच्या आधाराची गरज
मी भलं माझं काम भलं असं मी राहते.
मनातील भावना मोकळ्या मनाने मांडते
सहानुभूती मिळवण्यासाठी नाही मांडत.
पण काही जणांना असं वाटतं मी सहानुभूती मिळवण्यासाठी लिहिते. किंवा वाचकांना माझ्या कडे खेचून घेण्यासाठी लिहिते.
पण तसं काही नाही.
मनात साठवून त्रास करून घेण्यापेक्षा कागदावर उतरवून मन मोकळं केलेलं चांगलं असतं.
काल्पनिक मांडलं तरी अरे तुमचं कॉलेज मध्ये अस होतं का? असं विचारतात.
प्रेमावर लिहिले तर म्हणतात अजून प्रेमावर लिहिते.अरे मला प्रेमावर लिहिण्याचा हक्क नाही का? माझं वय झालं का? फक्त ५१ वर आणि माझं नवरा नाही म्हणून मी नाही लिहू शकत का? प्रेमावर काय चुकत माझं सांगा.
मी माझ्या जीवनात खूप स्वाभिमानाने जगले व जगते मला कोणाची सहानुभूती नको कोणाचा आधार नको.
मी माझं आयुष्य मला हवं तसं जगत आहे.
लोक घोड्यावर बसून देत नाही.
पायी ही चालून देत नाही..
तुम्हीच सांगा मायबाप वाचक कसं लिहावं...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


माझा अभिमान

माझा अभिमान माझा मुलगा माझ्या कष्टाला दिली साथ समजून उमजून वागला.
कधीच नाही केला कुठला हट्टाहास
खोटे बोलून कधीच केले नाही कुठले काम.
कॉलेज,ICWA,चे क्लास त्यातून मिळाला वेळ तर केला त्यांने ऑफिस मध्ये अकाउंट चे काम करायचा.
आज वयाच्या ३४ व्या वर्षी बॅंकेत तो उच्च पदावर कामाला आहे. पण करत नाही कधीच त्याचा कामाचा गैरवापर नेटाने काम करतो दरवर्षी पुरस्कार मिळवतो.
माझे अहो ही होते माझा अभिमान
व्यवहारातच्या व इतर बऱ्याच गोष्टी होत्या त्या बाबतीत मी जे सांगितले ते त्यांनी ऐकायचे आणि कबूल ही केलं तुझं ऐकलं व तू मला मी तुला साथ दिली म्हणून आज मी निवांत आहे. सुखाचे क्षण भोगत आहे.झोपाळ्यावर झुलत आहे. तुझं ऐकलं नसतो तर काय झालं असतं माहित नाही...
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Saturday, April 02, 2022

लाटा {चारोळी}

समुद्राच्या लाटावर लाटा
तुझी आठवण घेऊन येतात..
दूरवर जरी मी बसले तरी पायाला
स्पर्श करून जातात...
मेघा...✍️✍️©️®️


आठवणींची लाट {चारोळी}

सागराच्या लाटा
किनार्यावर येऊन धडकतात...
वेडू तुझ्या आठवणींच्या लाटा 
मनपलटावर येऊन धडकतात...
मेघा...✍️✍️©️®️


समुद्राची लाट 🌊🌊

समुद्राच्या लाटावर
आपली बोट होती.
थोडी डगमग करत 
स्थिरस्थावर होतं होती.
एक जोरदार लाट आली.
बोट आपली उलटून गेली.
मला काहीच कळले नाही.
काही कळायच्या आत 
तुला माझ्यापासून कायमच
दूर घेऊन गेली
एक क्षणात होत्याच नव्हत झाल....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


I love you 💞💞💓

आज वेडू आणि राणी
सारसबागेत भेटणार आहेत.
गणपती बाप्पाच दर्शन घेऊन
प्रेमाच वचन देणार आहेत.
दोघंही एकमेकांना I love you 💞💞
😘😘 म्हणणार आहेत.
जयश्री ची पावभाजी,कल्पना ची भेळ,
त्यावर मग मस्त गारेगार भरपेट आईस्क्रीम,
गाडगीळाच्या दुकानातून छोटासा राणी हार,
वामाच्या दुकानातून नाजूक डिझाईनची राणी कलरची पिवरसिल्क साडी,
तुळशीबागेतून राणी कलरच्या छान मॅचिंग बांगड्या.
हे सगळं आज तिचा वेडू तिला गिफ्ट देऊन
प्रेमाची कबुली देणार आहे.
आजचा दिवस राणी साठी स्वर्गीय
आनंद देणारा दिवस आहे.
आज कोणी तिला काही बोलू नका
जमलं तर इतरांच साहित्य वाचेल नाही
जरी आज तिने साहित्य वाचले तरी राग येऊन देवू नका.
आज काय काय केले ते उद्या नक्कीच सगळं
तुम्हाला सांगेल...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


एप्रिल फूल डे

एप्रिल फूल डे
मी म्हणते करा ना एप्रिल फूल
पण जरा सांभाळून एप्रिल फूल च्या नादात
दुसरच काही घडायला नको.
मस्करीला गालबोट नको लागायला
त्यातील मस्करी टिकून आनंद घेता यायला पाहिजे नाहीतर मस्करी ची कुस्करी व्हायला वेळ नाही लागत.
कसं आहे ती व्यक्ती किंवा ती वस्तू त्या व्यक्तीसाठी खूप प्रिय व महत्त्वाची असते.
आपण सहजच एप्रिल फूल करायला जातो.
आणि त्यांचा नाही तो परिणाम त्या व्यक्तीवर होतो. मग निस्तरत बसावं लागतं आणि कायमचे नातेसंबंध व मैत्री तुटते म्हणून एप्रिल फूल करा पण काही गोष्टी मर्यादेत राहून.
त्या एप्रिल फूल चा आनंद घ्या आणि दया.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time