Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, February 28, 2022

बंधनं




धागे बांधले नात्याचे...
जोडत गेले सगळ्यांशी...
सरणा वरती जळता ना...
बंधन तोडले सगळ्यांशी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाचा धागा

राणी आपला प्रेमाचा धागा
रेशीम धागा झालाच नाही.
लग्नाचा कंकण धागा
बांधला गेलाच नाही.
तरी मी जपून ठेवला ग
तो तुझ्या माझ्या प्रेमाचा
रेशीम धागा माझ्या हृदयात
हृदय माझं तुटलं तरी धागा
कधीच तुटणार नाही.
एवढा तो पुढच्या जन्मासाठी
व पुढील सातजन्मासाठी 
घट्ट बांधून ठेवला आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आईची नाळ

आई नाळ तुटली, धागे तुटले, 
नाते तुटले, बंधन ही तोडले,
आठवणी तर तोडता येत नाही
उणीव तुझी कायम राहील.
देवाकडे प्रार्थना करते.
तुझीच नाळ तुझेच धागे
पुढच्या जन्मासाठी
आमच्या मायलेकीच्या
नात्यांची गाठ अशीच बांधून ठेव.
धागा असाच आमचा जोडून ठेव.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाच बंधन

प्रेमाचे आपले धागे जुळलेच नाही.
सोबतीने कधी चाललोच नाही.
मग ते तुटले तरी कसे म्हणावे.
प्रेमाचा धागा जोडून आहेच
एकटाच ठिगळं जोडत आहे
ठिगळं जोडता जोडता 
धागा हा संपून जाणार.
पण तो तुटणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुटलेला धागा

आयुष्यात धागाचा रीळ 
पूर्ण भरलाच नाही.
अर्ध्या वरती असतानाच 
एक धागा तुटला.
राहिलेल्या एकच धागा
जमेल तसं टाके घालून
पुढे जात आहे.
तो एकटाच पडल्यामुळे
कमकुवत झाला आहे.
तुटलेल्या धाग्यांची उणिव
आयुष्यभर जाणवणार आहे.
कधी दुःख, कधी सुख,
काही प्रसंग, सतत आठवण,
हे सर्व सोबत घेऊन
धागा एकटाच टिप घालत आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️‌


वेडू प्रेमपत्र

वेडू प्रेमपत्र कधी 
आपण लिहिलेच नाही.
नयनांनी नयनांची भाषा 
अवगत होती.
नयनांनी नयनांशी 
दोघे बोलत होतो.
अबोल असे ते प्रेम होते.
अबोल अशी त्यांची भाषा
त्या अबोलातही खूप 
सारे समजत होते.
आशा या नयनाच्या
अबोल प्रेमाला पत्रांची
गरज कधी पडली नाही.
अबोल असे प्रेम अबोलच राहिले
आता कातरवेळी आठवण त्यांची येते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


अल्लड प्रेमपत्र

प्रेम माझे अल्लड अवखळ
आशा माझ्या प्रेमाचे 
पहिले प्रेमपत्र तुला दिले आहे.
वाचून तू मला उत्तर देशील का?
करून फुलांचा स्वीकार
जपून तू ठेवशील का?
गुलाब नको चाफा दे
असे तू बोलशील का?
असे माझे प्रेमपत्र तुला दिले 
स्वीकार तू करशील ना?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आयुष्याच प्रेमपत्र

कधी प्रेमपत्र लिहिले नाही.
संसाराच्या वेलीवर रमत गेले.
वेली वर आमच्या
प्रेमाच पहिलं फुल लागले.
त्या फुलाला जपत 
छान उमलत मोठे केले.
आता त्या फुलांचा सुगंध
दाहादिशा पसरत आहे.
त्याच उमललेल्या फुलाच्या
कळीला आता जपत आहे.
संस्काराची शिदोरी देऊन
मोठे करत आहे...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


प्रेमपत्र

राणी तुझ्यासाठी लिहिलं
पहिलं प्रेमपत्र तसंच जपून ठेवल.
तुला देण्याची हिम्मतच झाली नाही.
कातरवेळी तुझी आठवण येता
पत्र काढून वाचत बसतो..
सुकलेल्या फुलांचा सुगंध घेतो.
स्वप्नात तुझ्या थोडा रमून जातो.
जगण्यासाठी पुन्हा नवचैतन्य मिळतं..

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, February 26, 2022

तिचं रहस्यमय {अति लघुकथा}

तिच्या ते डोळ्याआड पाणी लपवून दुःख  मनात तसंच दाबून ठेवून खळखळून हसत राहाण्या मागचं रहस्य कोणालाच माहित नसत.फक्त ती हसत खेळत असते..
एवढंच दिसतं.पण ती तिच्या मनात
किती रहस्य किती दुःख तिने मनात
दाटून ठेवले आहे.ते तिलाच माहिती.
ते दुःख ते रहस्य त्यांचा त्रास होऊ नये.
म्हणून तर ती हसत खेळत डोळ्याआड सर्व दुःख रहस्य लपून जगत असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रहस्यमय प्रेम {अलककथा}

ती त्याच्या सोबत तो तिच्या सोबत डोळ्यांनी बोलायचे. आँखो की आँखो में इशारे हो गये सारखं दोघंही फक्त मौनाची भाषा ते एकमेकांशी करायचे.मौन प्रेम आणि डोळ्यांच्या भावनांनी त्याचे रहस्यमय प्रेम चालू होते‌. असेच दिवस जात गेले. त्यांच ते रहस्यमय प्रेम कोणाच्या ही लक्षात आले नाही. आणि अचानक तिचं लग्न ठरलं तिने ही कुठले आढेवेढे न घेता लग्नाला तयार झाली. त्यांच ते प्रेमाच रहस्य रहस्यच राहिले.
तिने ही ते रहस्यमय प्रेम आयुष्यात कायमच जपून ठेवलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


ती स्त्री

ती एक स्त्री असते.
कधी कोणाला कळलीच नाही.
तिच्या रहस्य जीवनात जगत असते.
वर्तमानात हसून बोलून
घरच्यांना नवऱ्याला प्रेम देऊन
जबाबदारी पूर्ण करत
संसार छान करत असते.
तिच्या मनाचा थांगपत्ता
कधी लागत नाही.
तिच्या इच्छा आकांक्षा
पूर्ण करता येतच नाही.
ती एक हळव्या मनाची स्त्री असते..
ती स्त्री असते म्हणून तर जगरहाटी
चालू असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, February 25, 2022

प्रेमाचं इंद्रधनुष्य 🌈🌈

शामा तिचं नाव होतं शांत स्वभावाची काळी सावली प्रसन्न चेहऱ्यांची कोणात जास्त न मिसळणारी आपण भलं आपला अभ्यास भला अशी ही शामा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तिच्या त्या स्वभावावर
शशांक खूपच भाळला होता. त्याचा ही स्वभाव शांत सोज्वळ अभ्यासू असा होता.
दोघं ही मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.
असेच छान दिवस जात होते. तो तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून प्रेमात पडला होता. पण सांगायची हिम्मत होत नव्हती.तो खूप प्रयत्न करावयाचा तिच्या समोर प्रेम व्यक्त करण्यासाठी पण ते त्याला जमलंच नाही. गॅदरिंग व सगळे डे  वगैरे संपून जो तो फायनल परिक्षा साठी व आपलं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी अभ्यासला लागले. सर्वांनाच पेपर छान गेले. व जो तो आपापल्या इंद्रधनुष्याशाच्या स्वप्नांना मनाशी घेऊन गावी जाण्यास तयार झाले. 
शशांक व शामा च गाव तसं शेजारी शेजारीच होतं. ती व शशांक पण गावी निघाले. आणि शशांक तिच्या सोबत भविष्य बद्दल बोलू लागला. बोलता बोलता त्यांने सांगितले की मी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तुझ्या वर मनापासून प्रेम करतो मला नोकरी लागली रे लागली की पहिला तुझा हात मागायला तुझ्या घरी येणार ती आश्चर्यचकित झाली.व लाजून खाली मान घालून बोलू लागली. शशांक हे काय बोलतो तू कधी बोलला नाही. बोलायची हिंमत कधी झालीच नाही ग शामा
मला आता हि संधी हुकवायची नव्हती.
आणि अशी संधी परत आली नसती. व मी माझ्या प्रेमाला कायमचा गमावून बसलो असतो. म्हणून तर मी तुझ्या सोबत निघालो. तेवढंच दोन तासांच्या प्रवास तुझ्या समोर माझं मन मोकळं करता येईल.
मनातील गोष्ट सांगता येईल.
शशांक म्हणाला आता तुझं मत सांग मी तुला आवडतो का? तुझं ही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे का? काय असेल ते मी ऐकायला तयार आहे.नाही म्हणालीस तर आयुष्यात परत भेटणार नाही. माझी सावली ही तुझ्या आयुष्यावर संसारावर पडणार नाही.एवढा लांब मी निघून जाईल माझी कर्तव्य पार पडायला. तिने ही त्याला हो मी ही तुझ्या वर तेवढंच मनापासून प्रेम करते.आपली जोडी अशीच कायम राहू दे.मी वाट पाहत आहे.
लवकर ये. असे ती ने सांगितले व ती तिचा स्टॉप आला म्हणून उतरून निघून गेली.
असे छान सोनेरी इंद्रधनुष्याचे स्वप्न घेऊन दोघेही आपापल्या घरी पोहचले.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
मेघा...✍️✍️©️®️ 


रंग {चारोळी}

जीवनाच्या आयुष्यात...
इंद्रधनुष्याचे रंग भर ना...
ओसाड ह्या आयुष्यात...
रंगाची उधळण कर ना...
मेघा...✍️✍️©️®️


मैत्रीच इंद्रधनुष्य 🌈🌈

भरुन आलेल्या मेघातून
पाऊस सरी त्या सरल्या
रवी तुझ्या किरणांचे परिवर्तन
इंद्रधनुष्य 🌈 रुपी त्या उरल्या.
आशा या बरसून गेलेल्या
मेघा रवीच्या मिलनाचे
इंद्रधनुष्य 🌈🌈 तयार झाले.
ते पाहण्यास सर्वच अबालवृद्ध
जमा झाले.🌈🌈🌈🌈🌈मु

मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️©️®️


इंद्रधनुष्य 🌈🌈

जीवनात माझ्या तू इंद्रधनुष्य ग फुलवले
जीवनाची घडी तुझ्यामुळे बसली.
हात तू माझा हळूवार हाती घेतला.
संसारात माझ्या हातभार लावून
सुखाची बरसात तू ग केली.
अशीच आयुष्यभर साथ दे.
इंद्रधनुष्यापरी रंग आपल्या 
जीवनात असेच रंगभरीत राहू दे.
सुखाच्या झुल्यावरी झुला
   आपला झुलू दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


जीवन

राणी दुःखाचे ढग नको 
ग कुरवाळूत बसू
तुझ्या जीवनात तूच भर
इंद्रधनुष्याचे रंग
दुःखाचे धुके सारून
सुखाने जगाचे शिक ग
जगाची रीतच आहे ग
पुढे जाणाऱ्यास मागे ओढायची
तू चालत रहा पुढे 
पाऊल टाकत रहा.
जग स्वबळावर जशी लढली
झाशीची राणी लक्ष्मीबाई
सुखदुःखाला दे तू टक्कर
तुझी नौका तूच वल्लव
मग बघ कसे छान
इंद्रधनुष्य तुझ्या जीवनी फुलेल.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Thursday, February 24, 2022

गुलमोहर {लघुकथा}

अरे वेडू आपण कॉलेज मध्ये असताना
दोघांनी मिळून लावलेलं ते गुलमोहरच
झाडं किती छान डेरेदार झाले आहे.
ते झाड उन्हाळ्यात गुलमोहराच्या फुलांनी छान फुलून येतं.
एखाद्या नवचैतन्य प्रेमीयुगुलांन सारखं प्रसन्न हसत असतं.
प्रेमीयुगुलांना कधी सावली तर 
कधी फुला पाकळ्यांचा वर्षाव करत.
प्रत्येक प्रेमीयुगुलांना ते झाड
आपली साक्ष देतं.आणि सांगतं
प्रेम करावं तर असं या प्रेमीयुगुलांन
सारखं ना अपेक्षा,ना स्वार्थ, फक्त आणि फक्त निस्वार्थी निर्मळ प्रेम केलं होतं.
ना प्रेमाचा गर्व होता ना एकमेकांना
सोडून गेल्याचं मनामध्ये सूड होता 
सूर्यास्ताच्या कातरवेळी 
शेवटची मिठी माझ्याच तर सावलीत त्यांनी घेतली होती.
घेतल्या आणाभाका भेटलोच कधीतरी
आयुष्याचा उर्वरित चित्रपटात
आलोच परत कधी कुठे चुकून समोरासमोर
तर फक्त हसून छोटीशी स्माईल देऊन
पुढे निघून जायचं.एकमेकाच्या आयुष्यात डोकावयचे नाही.
असे वचन देऊन दोघंही दुःखी मनाने 
हसऱ्या चेहऱ्याने आपल्या मार्गाला निघून गेले.
येतात रे कधीतरी अडचणीत कातरवेळी
माझा आधार घेऊन मनमोकळ करून
थोडी हितगुज करून 
जगण्यास नविन बळ घेऊन जातात.
अशी माझी सावली आयुष्यभर त्यांच्या साठी असेल.
आणि ते दोघे असतील तोवर 
मला उन,वारा, वादळ, पाऊस झेलत
त्यांच्या साठी त्यांना नवचैतन्य देण्यासाठी उभं राहायचं आहे.
{लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
कृपया कशी वाटते सांगा}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सावली




झाडांची सावली
खूपच सुंदर असते.
माहेरची आठवण येऊन
आईची माया त्यात दिसते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


चाफ्याचे झाड

राणी तुला आवडतं म्हणून
मी चाफ्याच झाड लावले.
ते झाड खूप छान फुलून
त्याला आता फुले येतात.
थोडी सावली देऊन
तुझी आठवण देऊन जातात.
त्या फुलांच्या सुगंधात
मन माझं मोहून जात.
ते टपोरी चाफ्याची फुले
माळायला तू मात्र नाहीस ग राणी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


झाडे

झाडा कडून शिकावे
काहीच अपेक्षा न ठेवता
उन वारा पाऊस सर्व सहन करुन
आपल्याला सावली, सुंगधीत 
फुले, गोड फळे देते.
पाखरांची किलबिल त्यांची घरटी
सर्व सहन करत.
ते आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देत.
काही तरी अपेक्षा असते का त्यांची मानवाकडून
अशी ही निःस्वार्थी झाडे असतात.
म्हणूनच झाडे वाढवा झाडे जगवा.
निस्वार्थी निर्मळ या अशा झाडासोबत 
मैत्री करा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, February 23, 2022

कल्पनेच्या जगात

काही व्यक्ती,काही ठिकाणे,
काही स्वप्न, काही वस्तू
कल्पनेतच छान वाटतात.
वास्तवात आल्यावरच
खरे रंग कळतात आणि
मग आपले हात पोळले जातात.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


राणी

राणी किती दिवस जगू 
तुझ्या ग या कल्पनेत
ये ग कधीतरी वास्तवात
भेट ग एकदा तरी 
कसा आहेस विचारून जा तरी
नको देऊस तुझी गोड मिठी
नको तुझ्या ओठांची गोडी
डोळ्यात एकदा बघ ग
तुझीच तर छाया त्यात दिसेल.
स्वप्न मी एक पाहिलेले
ते स्वप्न माझे सत्यात उतरव.
तुला नाही बांधणार वचनात
तुझ्या कडून नाही घेणार
कुठल्याच आणाभाका
सरणावर चढण्या आधी
तुझी शेवटची भेट दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कल्पनेत जगतो माणूस

माणूस जगतो किती कल्पनेच्या जगात वास्तवाचे भान विसरतो.
कल्पनेच्या भास आभासी जगात
किती दिवस रंग रंगवणार
वास्तवतेला सामोरे जावेच लागणार. 
कल्पनेन भरलेलं जग कितीही सुंदर असले
तरी वास्तवता टाळता येत नाही.
कल्पना क्षणभराची सोबती असावी
वास्तविकता आयुष्यभराची सोबती असते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


कल्पना {चारोळी}



कल्पनेने भरलेले जग...
किती ते जगावे...
वास्तवतेचे भान ठेवून...
कल्पनेत रमावे...

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कल्पनेतील स्वप्न

कल्पनेने भरलेलं स्वप्न माझं
तू आहेस.
आशा या काल्पनिक जगात
साथ तुझीच तर आहे.
स्वप्नात माझ्या तू तर रोजच येतो.
कल्पनेच्या दुनियेत तुझ्या सोबत 
माझा रोजच सारीपाट चालतो.
या कल्पनिक जगात मरता ही येते.
मरून जगता ही येत.
सरणावर चढून उतरता ही येतं.
आपलेच अश्रू आपल्याच
सरणावर गळता ही येतात.
आशा या काल्पनेने भरल्या
जगात सुखाने जगात ही येत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कल्पनेच जग

वेडू कल्पनेने भरलेलं
जीवन माझं आहे.
वेडू किती आणि काय काय
कल्पना करते तुला काय माहित
तुझ्या माझ्या कल्पनेच्या दुनियेत
खूपच सुंदर जगत असते.
त्या जगात जगताना
खऱ्या जगाचा पण विसर पडतो.
एवढी रममाण होऊन जाते.
कल्पनेच्या जगात.
राहिलेलं आयुष्य असंच
कल्पनेच्या जगात जगायचं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सूर्यास्त

आपण दोघं तो सुंदर सूर्यास्त 
तुझ्या कुशीत निवांत शांत डोक ठेवून
तो सुर्याचा अस्त पाहू दे.
त्याच क्षणाला जर
मृत्यू ही समोर येऊन उभा राहिला
तर आला तर मी म्हणेण
ये तुझं स्वागत आहे.
घेऊन जा असाच हा सूर्याचा अस्त
पाहता पाहता 
मला माझ्या सख्याच्या बाहुपाशात
निवांत डोकं ठेवून असतानाच.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रवीचा अस्त

रवी किती सुंदर तो तुझा अस्त
रंगाची उधळण करत 
तुझं ते क्षितिजा पलाड जाण.
चंद्राच्या शीतल छायेत
धरणी मातेला सोडून 
निशाच्या कुशीत झोपणं
प्रभाच्या कुशीतून पुन्हा
अबीर गुलाल उधळीत
तुझं साम्राज्य पसरवत येणं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सागर किनारी

राणी सागर किनारी
सूर्यास्ताच्या वेळी...
रोज वाट तुझी पाहतो...
तू येशील म्हणून...
रोजच सागर किनारी येतो.
आणि सूर्यास्त पाहतो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️



रवी

रवी किती रे असा छळशील
तुझा तो अस्ताच्या केशरी पिवळ्या
रंगाने मनाला किती भुरळ घालशील.
किती जरी सुंदर तुझा अस्त असला.
तरी ते दुःखच आहे रे
ते तुला समजणार नाही.
तुझ्या जाण्याने माझ्या हळव्या मनाची 
काय घालमेल होते.
तुला कळणार नाही.
त्या साठी तुझ्याच सारखं
तप्त मन हवं
ना तुला तुझ्या सुंदर सकाळ घेऊन 
येण्याचा गर्व आहे.
ना सुंदर सप्तरंगची उधळण करुन
जाण्याचा गर्व आहे.
रोज ठरलेल्या वेळी येतो
ठरलेल्या वेळी जातो.
किती रे प्रामाणिक निस्वार्थी आहेस.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सूर्यास्त

सूर्यास्ताच्या वेळी मन कातर ते
मनाला हुरहूर लागते.
तुझ्या आठवणींनी मन सैरभैर होते.
अंधाराचे साम्राज्य पसरते. 
मग अजूनच मनाची हुरहूर वाढते.
तुझ्या आठवणीत अश्रू वाहू लागतात.
नको तो सूर्यास्त नको ते अंधाराचे साम्राज्य
फक्त आणि फक्त सूर्योदय हवा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तारा 🔯🌟

रवी बघ तू मेघात नसता.
अंधार सगळा दाटतो.
चंद्रा सोबत असंख्य
तारे ते असतात.
तो एक तारा तुटून
बघ कसा पडतो.
दुःख त्यांचे किती म्हणावे.
सहन त्यास होत नाही 
धर्तीवर पडता विरहाने 
तो बघ दगड होऊन जातो.
मुक्तछंद काव्या
  मेघा.. ✍️✍️©️®️


चमचम तारा 🔯🌟

चमचम तारा चमकत होता.
चमकता चमकता तुटून पडला
पडता पडता जिवनाच सारं
त्याने सांगितले.
क्षणभराची जिंदगी आहे.
एक दिवस तर ह्या मातीतच
मिसळायचे आहे.
जीवन आहे तोवर
दुसऱ्यांच्या साठी चांगले काम
चांगले विचार करत करत 
तुटून जगण्यात जीवनाची शान आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


दुःखी तारा 🌟🔯

तुटणारा तारा त्याला काय मागू
तोच तर नभातून निसटताना
अश्रू गाळतो.
चंद्र पासून दूर होताना
तो दुःखी असतो.
त्या दुःखी ताऱ्याकडे
मी काय मागणार
त्यांच दुःख पाहून
माझं दुःख लहानच वाटणार.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुटणारा तारा

तो तुटणारा तारा
मला रे दिसला.
एकच मागणं मागितलं
जेथे असेल माझा वेडू
तेथे तो सुखात असो
भेट जरी नसली आमची
सुख त्यांच्या पदरी असो.
इच्छा माझी पुरी कर.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रहस्यमय प्रेम

ती रोजच त्यांच्या येण्याच्या वेळी 
दारा आडून त्याला पाहायची 
जणू तिला त्यांची सवयच झाली होती.
तो ही तिला हळूच दाराआड 
लपलेली पाहायचा आणि 
हळूच हसून निघून जायचा.
ती व तो न बोलता ही
दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले.
आणि काहीच न बोलता
दोघं वेगळे ही झाले.
ते तिचं दाराआडून पाहिलेलं 
पहिलं प्रेम रहस्यमयच राहिलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाच रहस्य

राणी तुझ्या माझ्या प्रेमाच रहस्य
असंच राहू दे.
भेट जरी नसली कधी झाली.
गाठ आपली दैव्याने बांधली नसली तरी
मी माझ्या मनाच्या एकांतात
तुझे ते हळूच डोळ्यांच्या 
कोपऱ्यातून पाहून हसणे
ते आपले प्रेमाचे क्षण 
जपून ठेवले आहेत.
आठवण तुझी येता
मनाच्या दाराआड चक्कर मारुन येतो.
तुझ्या सोबत हितगुज करून
जगण्यास बळ घेऊन येतो.
रहस्य आपलं असंच राहू दे.
मनाच्या दाराआड जपलं आहे तसंच...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


चाफ्याच्या सुंगध

त्या दारामागून खूपच
सुंदर सुगंध येत होता.
तू मला न सांगता
लपवून ठेवलेल्या 
चाफ्याचा सुगंध 
त्या बंद दारामागून 
पण दरवळत होता.
मेघा...✍️✍️©️®️


सुखा मागचं रहस्य

सुखाच्या सावली मागचं रहस्य
तुला किती सांगू रे
किती खालल्या खस्ता
किती त्रास भोगला
किती कष्ट केले.
कित्येकांनी दुखावले मन
मनाच्या कवाडात बंद करून ठेवले.
पापणी आड लपून अश्रू
हसून सगळं झेलते आहे.
सुखाची सावली येता.
दुःखाचा डोंगर उभा राहिला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रवीचा प्रकाश

रवी तू येतो रे बंद खिडकीच्या
दाराच्या फटीतून
तुझा तो प्रकाशमय कवडसा 
खूप सुंदर दिसतो.
तुझ्या त्या प्रकाशमय कवडसात
काहीच रहस्य बघ लपत नाही.
तुझ्या त्या स्वच्छ प्रकाशात
रहस्यमय जीवन उघडले जाते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


खजिना

मनाच्या दारामागे
सुखदुःखाची बरीच रहस्य आहेत.
एकांत बसले असता डोकावून येते.
माझ्या एकांताला सोबत थोडी करतात.
एकटीच हसून एकटीच दुःखी होऊन
विचार थोडा करते. मनाच्या दारामागे
रहस्यमय किती खजिना आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझे अश्रू

राणी तुझ्या आठवणीत
रोजच हृदय रडत पण
डोळ्यात अश्रू नाही काढू शकत.
मन मात्र तुझ्याच साठी रडत
एकांत तुझाच विचार असतो
भेटशील का एकदा तरी
डोळ्यात दडलेल्या या अश्रूंना
तुझ्या मिठीत गाळून मोकळं होऊ दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अश्रूंची फुले

माझी तुझी भेट जरी नाही झाली.
चाफ्याची खरी फुले जरी नाही दिली.
तरी मला चालतील रे
पण तुझ्या अश्रूंची फुले करशील का
शेवटच्या क्षणी सरणावर असताना.
माझ्या देहावर सांडशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


हसू

डोळ्यात आसू
ओठावर हसू
मनात दुःख
हृदयात तूची
चेहरा हसरा
भावनेचा गोंधळ
विचारात तूच
सख्या सजणा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


लपलेले अश्रू

डोळ्याआड लपलेले अश्रू
सांग तुला दिसतील का?
मन माझं रडते सांग तुला समजेल का?
मनाच्या एकांतात अश्रू माझे
पाझरताना सांग तू पुसशील का?
मला समजून घेऊन माझ्याशी
तू दोन शब्द बोलशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अश्रू

डोळ्यातील अश्रू तुझ्या आठवणीत
रोजच गळतात.
मनाला कितीही बांध घातले तरी
डोळ्यातून चटकन बाहेर येतात.
पापणी आड किती लपवू म्हटले तरी
ते थोडीच तेथे राहतात.
तुझ्या विचारांच्या चक्रात
पटकन बाहेर पडतात.
किती समजावले तरी
थोडेच शांत बसतात.
माझेच हात त्याच्या मदतीला येतात.
पुसून अश्रूंना समजूत स्वतःची
स्वतःलाच घालून घेतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अंधार

राणी तुझी मनाच्या एकांतात
ज्योत तशीच ग तेवत ठेवली आहे.
आपण जरी एक नाही झालो.
आपली भेट जरी 
कधीच नाही झाली.
तरी अंधाराच्या मार्गावर
तू सोबत असते.
तोच तर आसरा आहे.
मग मी का ग 
अंधाराची भीती बाळगू.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वेडू {चारोळी}

वेडू का रे बाळगू 
मी भीती अंधाराची
साथ तुझी सोबत तुझी
तुच तर माझा प्रकाश
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अंधारात जळत आहे

एक ज्योत अंधारात जळत आहे.
स्वतःच स्वतःला प्रकाश देते आहे.
जळत जळत स्वतःसाठी तेवत आहे.
रवी किरणांच्या प्रसन्न पहाटेची
वाट पाहत.
आयुष्य स्वत:च संपवत आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा आरबुज...✍️✍️©️®️


सांजवेळी

रवी तू जाता सांजवेळी
अंधार या मेघात दाटतो.
स्तब्ध शांत सगळं होतं.
अंधाराच साम्राज्य येतं
साथ देते थोडी
चांदण्यांची लुकलुक
मेघ तुझ्या पुन्हा येण्याची
वाट पाहत शांतपणे 
काळोखाला जवळ करतात.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️



.


अंधार

सख्या का रे असं 
अंधाऱ्या रात्री मला अंधारात
सोडून एकटाच निघून गेला.
काहीच कसं वाटल नाही.
असं मला अंधारात
एकटीला सोडून जाताना.
आता कित्येक अंधाऱ्या रात्री 
मी एकटीच जागून रडून काढते.
तुला कल्पना ही नसेल.
त्या अंधारात मी एकटीच असते रे.
सोबत असतात तुझ्या आठवणी
त्या आठवणीत रमत जाते.
अंधाराशी मैत्री करत जाते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


एकटेच निघालो

कॉलेजचे दिवस नव्यानवलाईची
भूरकन उडून जातात.
स्वप्न मनाशी ठेवून
डिग्री घेऊन बाहेर पडायचं
मोरपंखी दिवस ते
आठवणीत राहतात.
गॅदरिंग स्पर्धा स्पोर्ट्स डे श्रमदान
सहली परीक्षा किती ते सुंदर दिवस
कोणाच कोणी आवडत
जोड्या जुळवून मोकळं व्हायचे
असे हसत खेळत दिवस गेले.
शेवटच्या दिवशी धमाल मस्ती
एकमेकांना नंबर शेअर करून
भरल्या डोळ्यांनी भावना प्रधान
होऊन एकमेकांचे निरोप घेऊन
सगळेच निघालो आपापल्या स्वप्नांना
सत्यात उतरायला.
पुन्हा भेट होईल नाही होईल.
कोण कोठे कोण कोठे
मार्ग निवडून एकटेच चालू लागलो.
दुनियादारच्या या जगात शिकायला.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️
  


Thursday, February 17, 2022

वो दिन

काॅलेज के ओ दिन भी क्या दिन थे!
गम कम और हसी जादा थी!
पंच्छी की तरह ओ दिन उड गये!
अब याद करने के दिन रह गये!
{फक्त कल्पना शक्ती रेखाटली आहे
कॉलेजमध्ये गेलेच नाही}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कॉलेजचे सुंदर दिवस

कॉलेजचे ते दिवस खूपच सुंदर होते.
तू मला नी मी तुला कसं रे भेटलो.
नजर तुझी माझ्यावर धडक बसली 
तुझी गाडीवर तरी उठून माझ्या कडे
बघायची तुझी धडपड हसूच आले.
मला पण वाईट ही वाटले.
उठून लंगडत चालत चालला होता.
मी न राहवून पटकन विचार लागलं का
तू ही हसून उत्तर दिले चलता हैं!
मग मात्र त्या दिवसापासून
तुझं माझं तर एकमेकांना शिवाय पानच
हलत नव्हते
{फक्त कल्पना शक्ती रेखाटली आहे
मी कॉलेजमध्ये गेलेच नाही}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कॉलेजचे ते दिवस

ते कॉलेज चे नविन दिवस
ती तुझी माझी नजरानजर नजरेने
कटाक्ष टाकून तुझं हळूच पाहणं
नजरानजर होताच नजर फिरवणे
असेच गेले सहा महिने
श्रमदानाच्या कार्यक्रम तून
बोलायला केली सुरुवात
पहिलाच एक कटिंग चहा
दोघांत प्यायलो किती
गोड लागला.
आज चहाचा घोट
असं तुझं चिडवणे
मग आपली जमली रे
मैत्रीची छानच केमिस्ट्री
(फक्त कल्पना शक्ती रेखाटली आहे
मी कॉलेजमध्ये गेलेच नाही.)

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


कॉलेजचा पहिला दिवस

कॉलेजचे दिवस नव्यानवलाईची
गर्दी बघून हृदयात धडधड 
मुलामुलींचे घोळके 
मी मात्र एकटीच उभी
मुलीच्या शाळेतून आलेली.
मोठं ग्राउंड सायकल स्टँड
गाडी स्टॅंड जो तो आपाल्याच नादात
जशी काही रंगबेरंगी फुलपाखरेच 
बागडत आहे.
हसरे प्रसन्न चेहरे 
चेष्टा मस्करी भरभरून गप्पा
कँटिनही मुला-मुलींनी फुलून आलेलं
अलिप्त राहून मी ही घेतली
कॉलेजची पहिल्या दिवसाची मजा
{मी कॉलेजमध्ये गेलेच नाही
फक्त कल्पना शक्ती रेखाटली आहे.}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रडत लढत

परिस्थिती चुकीची होती
असं म्हणायचं नसते.
परिस्थितीशी दोन हात करून
लढल तर परिस्थिती नक्कीच बदलते.
रडत बसण्यापेक्षा लढत राहायचं
वेळ परिस्थिती नशीब सर्वच बदलतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तिने परिस्थिती बदलली (अलक कथा)

ती एक सर्व सामान्य घरातील मुलगी होती.
लहान वयातच लग्न झाले.
लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस
छान पार पडले.
ती स्वतःला भाग्यवान समजत होती.
पण थोड्याच दिवसात तिच्या समोर सत्य परिस्थिती यायला लागली.
तशी ती खचू लागली. डगमगू लागली.
खूप विचार करून ती ने  एक निर्णय घेतला.
परिस्थिती बदलायची असेल तर
डगमगून चालणार नाही.
या व्यसनातून त्याला बाहेर काढावे लागेल.
परिस्थितीवर मात करून पुढे चालायला हवे.
तर या सर्व परिस्थितीतून आपण नवऱ्याला व्यसनातून बाहेर काढून व्यसन मुक्त करू शकतो.
तिच्या मनाचा निश्चय पक्का झाला.
परिस्थितीवर मात करत संघर्ष करत.
नियतीचा खेळ खेळत तिने स्वत:चे व नवऱ्याचे नशीब बदलले.
परिस्थितीवर मात करून सुखाचे दिवस आणले.
तिने जर परिस्थिती चुकीची होती.
असे म्हणून परिस्थितीला दोष देत बसली असती तर सुखाचे दिवस आलेच नसते.
परिस्थितीला दोष न देता.
तिने परिस्थितीशी लढून परिस्थिती बदलली.
आणि नवऱ्याला व्यसनमुक्त करून संसार सुखाचा करत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


परिस्थिती नक्कीच बदलते

परिस्थिती चुकीची होती
असं सुध्दा म्हणता येत.
परिस्थिती बरोबर होती
असं सुध्दा म्हणता येत.
आपण ठरवायचं
नेमकं काय करायचं
परिस्थिती समोर हतबल
होऊन जगायचं का
परिस्थिती बदलून जगायचं
दोन्ही आपल्याच हातात आहे.
आपलेच विचार बदलले
तर परिस्थिती नक्कीच बदलते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


परिस्थिती

कधी परिस्थिती तर कधी नियती
आपले खेळ खेळत असतात.
परिस्थिती चुकीची होती.
कि नियतीनेच असे मांडले असेल
आपण मात्र परिस्थितीला दोष देतो.
दोष कोणाचा ही असो
नियतीच सर्व खेळ खेळते.
किती ही आपण सरळ फासे टाकले
तरी नियती समोर व परिस्थिती समोर
आपले काहीच चालत नाही.
परिस्थिती चुकीची होती.
आपण बोलून मोकळे होतो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, February 15, 2022

स्वप्नात साजणा

स्वप्नात साजणा येशील का
चित्रात रंग ही भरशील का
भरशील का?
साजणा येशील का रे स्वप्नात
माझ्या अर्धवट उधळलेल्या
स्वप्नांना पूर्ण करून रंग भरशील का
माझ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी साथ मला देशील का
डोळ्यांतील स्वप्न डोळ्यात
न राहता सत्यात उतरतील का
आयुष्याच्या शेवटी 
आयुष्य संपल्यावर ही
सरणावर जळताना
दोन थेंब अश्रू माझ्या साठी
सांडून नाव माझे निघेल असे
एक स्वप्न आहे साथ मला देशील ना.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


स्वप्नातील राणी

राणी स्वप्नी माझ्या येशील का
मिठीत घेऊन मला प्रेम देशील का
नको महागडी चॉकलेट
नको महागडी गिफ्ट
नको तो प्रेमाचा आठवडा
रोज माझ्या स्वप्नी ये.
कपाळाचे चुंबन घेऊन
मिठी तुझी मला दे.
गालावर किस करून 
तुझ्या दुनियेत अलगदपणे 
घेऊन चल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझं सुंदर स्वप्न

एक सुंदर स्वप्न
रोजच मी पाहते.
वेडू त्या सुंदर स्वप्नांत
तुझी रोजच भेट घेते.
मनातील गुपित तुला रे सांगते
त्रास, अडचण, सुखदुःखाच्या
गोष्टी तुझ्या कडे बोलते.
वेडू तुझ्या सोबत बोलून
मन रे हलकं करते.
तुझ्या प्रेमाच्या मिठीत
सुखांचा एक श्वास घेत.
तुझी ही वेडी रोजच
तुला स्वप्नात त्रास देते.
त्या सुंदर स्वप्नांना साठी
तरी डोळे बंद करून 
झोपायचा प्रयत्न करते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्वप्न{ चारोळी}

मी एक सुंदर स्वप्न रोजच पाहते...
राहिलेल्या इच्छा स्वप्नात रंगवते...
स्वप्नातील झुल्यावर रोजच झुलते...
आनंदाने मन माझे स्वप्नात छान रंगते...
  मेघा...✍️✍️©️®️


Monday, February 14, 2022

प्रेमाचा दिवस

व्हॅलेंटाईन डे प्रेम दिवस
असं कधी असतं का
ज्याचं प्रेम असतं
तो असं बोलतो का
प्रेम मनापासून करायचं असतं.
त्यांच प्रदर्शन करायचं नसतं
प्रेम जपायच असतं.
ते कोणासमोर कुरवाळत
किंवा कुस्करत बसायचं नसतं.
प्रेमात पाठीशी खंबीरपणे 
उभं राहायचं असते.
प्रेमात कुठल्याही परिस्थितीत 
साथ सोबत करायची असते.
त्यासाठी असा कुठला दिवस नाही.
अशी कुठलीही वेळ नाही.
प्रेम प्रेम असतं त्याचा 
असा कोणता दिवस नसतो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


व्हॅलेंटाईन डे

रोजच असतो आपला व्हॅलेंटाईन डे 
वेडू तुझ्या आठवणीत
रोजच भेटतो तू स्वप्नांच्या दुनियेत
हसत राहा मस्त राहा.
असंच तुझं सांगणं असतं.
काळजी माझी घेतो.
शांत माझ्या आयुष्यात
तुझाच तर आधार आहे.
तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर
रोजच मन झुलते आहे.
माझ्या तर स्वप्नात तुझा माझा
आपला रोजच व्हॅलेंटाईन डे असतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️



अखंड साथ (चारोळी)

प्रेम असंच अबाधित राहू दे...
तुझ्या प्रेमात वाहायलेली राहू दे...
सख्या हात हाती राहू दे...
साथ तुझी अखंड असू दे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सप्रेम दिवस( चारोळी)

व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस...
सुंदर अप्रतिमच दिवस...
दोन प्रेमीयुगुलांचा दिवस...
तुझा माझा प्रेमाचा दिवस....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आई

आज व्हॅलेंटाईन डे
आज तिला जाणून घे
आज तिच्या साठी जगून घे
आज तिला विचारून घे
आज तिला एक तिच्या
आवडीची फुल देऊन बघ.
आजचा दिवस 
तिच्यासाठी राखून ठेव.
आज तिला हॉटेल मध्ये
जेवायला घेऊन जा.
बघ आज ती किती किती
खूश होईल.
आयुष्य भर तुमच्या साठी
राब राब राबते.
अपेक्षा काहीच न ठेवता
तुमच्या सगळ्यांच आनंदाने करते.
आज तिला मान देऊन 
तिचा गौरव करा.
ती आई असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेम { चारोळी}

वेडू खरं प्रेम आपल होत रे...
तुझं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही...
चाफ्याच्या फुला सारखे सुगंधीत राहिलं... 
तुझे माझे प्रेम राधा कृष्णा सारखे रे...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


मैत्री प्रेम

खरे प्रेम मैत्रीत असते.
निस्वार्थी, निर्मळ, निरपेक्ष,
भावनेने भरलेले.
एक कटिंग चहा दोघांत असतो.
ते खरे प्रेम असते.
मनाची तगमग घालमेल
तेथे समजते ते खरे प्रेम असते.
त म्हटलं की ताक ओळखणे
हेच मैत्रीतील खरे प्रेम असते.
भेट जरी नसली तरी
लांब राहून शब्दांचा आधार देणे.
या मैत्रीरुपी प्रेमात ऋण नसते.
धन्यवाद सॉरी असे शब्द तेथे नसतात.
वेळेला मदत आधार देऊन
नामानिराळे होते ते खरं मैत्री प्रेम असते.
ते कधीच कमी होतं नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


खरं प्रेम आहे

खरं प्रेम राणी तुझं माझं होतं
ना अपेक्षा होती,ना स्वार्थ होता.
एका वळणावर थांबलं
ते तेथेच थांबलो.
आयुष्य जगताना कधीच
त्या प्रेमाचा त्रास झाला नाही.
अडचण आली नाही.
पण मनावर कायमच कोरल गेल.
अडीअडचणीला मनापासून
हाक मारली तर ते तुझं प्रेम
मनाच्या कुपीतून आधार नक्कीच देत.
तू नसूनही तुझी साथ आहे असं 
नक्कीच वाटतं.
सोबत असल्याचा भास असतो.
खांद्यावर तुझा हात असतो.
असं आपलं खरं प्रेम जीवनाच्या वाटेवर जीवनभर सोबत असेल.
फक्त एकदा जीवनाचा शेवट होण्याआधी
भेट व्हावी एवढीच इच्छा आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आजी आजोबाच प्रेम

खरं प्रेम आजी आजोबाचं नातवंडांचे
नातवंड म्हणजे दुधाची साय
किती ही मोठी झाली तरी
सुरकुतलेला हात डोक्यावर
प्रेमाने फिरतो.
दृष्टी जरी कमी झाली
तरी चेहरा सुंदर दिसतो.
त्यांच्या एका मिठी साठी
जीव आजी-आजोबाचा अडकतो.
आपलं बालपण मुलांचं बालपण
त्यांच्यात शोधून प्रेम करणं
तेच तर खरं प्रेम असतं
ते कधीच कमी होतं नाही.
कातरवेळी ही तसंच असतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


खरं प्रेम

खरे प्रेम खोटे प्रेम
असं कधी असतं का?
प्रेम प्रेम असतं त्यात खरं खोटं नसतं
त्या प्रेमात जीव लावलेला असतो.
सुखापेक्षा अडचणीत दुःखात
खरे प्रेम पाहिला पाठीशी उभे असते.
त्या प्रेमात वासना नसते, अपेक्षा
भेटीचा आग्रह नसतो.
शुद्ध मोकळं मन असतं.
निस्वार्थी, निर्मळ निरपेक्ष प्रेम असतं
तेच खरं प्रेम असते. 
ते कधीच कमी होतं नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मिठी

एक तुझी मिठी संस्मरणीय ठरवी
तुझ्या एका मिठीत दुःख विसरावे.
तुझ्या एका मिठीत सुखच सुख समावावे.
तुझी एक मिठीत आनंदाने भरलेली असावी.
तुझ्या एका क्षणभराच्या मिठीतून
स्वर्ग सुखाचा भास व्हावा.
अशी तुझी मिठी संस्मरणीय ठरवी.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आईची मिठी

आई आता दुःखात
तुझी एक मिठीत हवी होती.
मी आहे ग हे सांगणारे 
तुझे शब्द हवे होते.
खूप खूप एकटी पडले ग
मला आताच्या या आभाळभर
दुःखात साथ तुझी हवी होती.
मनसोक्त रडायला तुझी
मायेची मिठी हवी होती.
विचारांची देवाणघेवाण करायला
तुझा आधार हवा होता.
सर्व काही विसरून 
घटकाभर शांत झोपायला
तुझी मांडी हवी होती.
डोक्यावरून हात फिरवला
तुझा हात हवा होता.
थोपटून शांत झोप
म्हणायला तू हवी होती. 
आई तुझी एक मिठी
मला दुःखात हवी होती.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


पिल्लू ची मिठी

पिल्लू तुझ्या आजी म्हणून
लाडाने मारलेल्या प्रेमळ
एका मिठीत मी सगळ्या
वेदना दुःख विसरते रे
अशी तुझी आजी म्हणून
मारलेली गोड मिठी असते.
गळ्यात हात घालून
जेव्हा माझ्या मिठीत
निरागस तुझा चेहरा घेऊन
तू झोपतो गाढ
तेव्हा मला जगाचा पण
विसर पडतो रे पिल्लू
अशी स्वर्गा होऊन सुंदर
तुझी गोड मिठी असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️



मैत्रीची मिठी {चारोळी}

वेडू तुझी संस्मरणीय मिठी असावी
त्या मिठीत तुझ्या स्पर्शाचा आधार असावा.
त्या तुझ्या मिठीत स्वर्ग सुख असावे.
ती आपली मैत्रीची गोड मिठी असावी.
मेघा...✍️✍️©️®️


शेवटची मिठी

सख्या तुला कोरोना झाला.
तुला अॅडमिट केलं
त्याच रात्री तू माझ्या स्वप्नात 
येऊन मला एक घट्ट
मिठी तू मारली 
श्वास माझा कोंडला होता.
एवढी ती मिठी घट्ट होती.
मला त्या मिठीचा 
अर्थ नाही कळला.
मी तुला त्या क्षणी वाचवायला 
यायला हवं होत का रे
मला काहीच समजलं नाही.
रे सख्या मी जर त्या क्षणाला
तुला वाचवायला आले असते तर
आज तुझ्या मिठीत सुखाची
झोप घेत असते.
ती तुझी संस्मरणीय मिठी
शेवटची मिठी ठरली 
शेवटची मिठी ठरली...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, February 11, 2022

तू तिथे मी

तू आणि मी तू तिथे मी...
आयुष्याची सुरुवात तू...
आयुष्याची साजवात तू...
आयुष्याचा शेवट ही तू...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


राणी तू मी

राणी तू आणि मी
माझं पहिल प्रेम तू
माझं पहिल फुल तू
माझं अस्तित्व तू
तू आहेस म्हणूनचं मी
मी तुझ्या स्वप्नावर जगत आहे
माझ्या जीवनाची शिल्पकार तू
मुक्तछंद काव्या
मेघा....✍️✍️©️®️


तू राणी चारोळी

तू आणि मी वेगळे का आहोत...
तू श्वास प्राण मी आहे...
जरी भेट नसली तरी...
राणी तू माझीच आहे...
मेघा...✍️✍️©️®️


मेघ रवी

मी मेघ तू रवी
तुझी माझी जोडी 
अंतराळात जमली
मी बरसणारे मेघ
तू तळपळता रवी
तु अस्ताला जाणारा
फिरून परत येणारा
माझा ना अस्त आहे.
ना फिरून परत ये न आहे.
तरी नभातले तू आणि मी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मानपान

तू आणि मी वेगळे का होतो.
दुध साखरे सारखं 
एकजीव झालो होतो.
दोन शरीर एक प्राण 
तूझ्या शिवाय नाही.
या जगी मानपान
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️®️©️


तू मी

तू आणि मी जीवन साथी
एक गेला जग सोडून
दुसरा वाट बघतो त्यांच रस्ताची 
मी पण येईल रे लवकरच
साथ सोबत तुला करायला
दोघे मिळून राहू तेथे आनंदाने
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Thursday, February 10, 2022

भेटवस्तू {चारोळी}

भेट वस्तू नसली तरी चालेल...
सुखात साथ दे दुःखात सोबत कर...
महागडी गिफ्ट नकोच देऊ...
काळजी फक्त माझी कर....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


वेडू {चारोळी}

वेडू काहीच नको रे...
चाफ्याची दोन फुले दे...
सुगंध त्याचा माझ्या...
जीवनात कायम दरवळू दे...
मेघा...✍️✍️©️®️


साथ तुझीच

तुझी माझी पहिली नजरानजर झाली.
तीच तर माझ्या साठी भेट होती.
मग रोजच नजरानजर होऊ लागली.
एकमेकांना पहिला शिवाय
आपल्याला करमायच नाही.
तीच तर माझ्यासाठी खास भेट होती.

मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


पर्स

लग्न ठरल्यानंतर मिळालेली पहिली भेट.
लग्न ठरल्यानंतर आम्ही
पहिलेदा फिरायला गेलो.
त्यांनी त्यांच्या दुकानात घेऊन गेले.
तेथे बरऱ्याच लेडीज वस्तू होत्या.
त्यांनी मला एक पर्स काढून दिली.
त्यांत एक रुपयाची नवी कोरी 
नोट ठेवून दिली.
ती माझी पहिली भेट.
मला पर्स व बांगड्या खूप आवडतात.
मी ती पर्स व ती एक रुपाची नोट
अजूनही जपून ठेवली आहे.
ती माझी पहिली त्यांनी दिलेली भेट.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


नजर भेट

तुझी माझी पहिली नजरानजर झाली.
तीच तर माझ्या साठी भेट होती.
मग रोजच नजरानजर होऊ लागली.
एकमेकांना पहिला शिवाय
आपल्याला करमायच नाही.
तीच तर माझ्यासाठी खास भेट होती.

मुक्तछंद काव्या

  मेघा...✍️✍️©️®️


लग्नातील वचन

लग्नात सप्तपदी घेतात.
हात हात घालून देवा 
ब्राह्मणांच्या साथीने
नातीगोती समाज 
यांच्या समोर वचन घेतात.
संसाराला सुरुवात करून
नव्याचे नऊ दिवस संपताच
मग सुरू होतात कुरबुरी
हुंडा मानपान जेवणावळी
टोमणे अपमान त्रास देणे
छळवणूक करणे.
मग सुरू होते मालिका
हुंड्यासाठी मारझोड
घरातून बाहेर काढणे.
जाळणे मारणे ढकलून देणे.
उपाशी ठेवणे मुलगीच झाली.
म्हणून त्रास देणे.
अपत्य लवकर नाही झाले.
दोष फक्त तिलाच देणे.
पटत नाही घटस्फोट घेणे.
मग कसले देवा ब्राह्मणच्या 
साक्षीनी नेहमी एकत्र राहण्याचे 
वचन दिले असते.
एकमेकांना छळायचे की 
एकमेकांना समजून घ्यायचे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुला दिलेलं वचन

नेहमी एकत्र राहण्याचे वचन 
तुझ्या सोबत स्वप्नात
मी मला दिले होते.
आपण एकत्र आलोच नाही.
तरीही तू माझ्या जवळच आहे.
जनी, स्थळी, पाषाणी, मनी
तुच ग तू आहेस.
तुझी सुंदर मूर्ती माझ्या
हृदयात जपून ठेवली आहे.
श्वासात तू ,स्वप्नात तू,
मनाच्या कप्प्यात तू, हृदयात तू ,
काळजात ही तूच तू
सोबत तू नाही ग
तरी तू सोबत आहेस
असं समजून वचन मी पळतो ग
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वचन

नेहमी एकत्र राहण्याचे 
वचन दिले होते ना रे
मग का गेला अर्ध्यावर 
डाव टाकूनी
असा काय गुन्हा केला होता.
काही न सांगता न बोलता
गुपचूपपणे माझ्या 
आयुष्यातून निघून गेला.
तुला कसं काहीच 
वाटलं नाही का रे
आपण तिला काहीच न 
सांगता जातो आहे.
एक सेकंद पण 
माझा विचार आला नाही का
आपण आयुष्यभराच नातं
एक क्षणात तोडून जातो आहे.
असलं कसलं रे नेहमी एकत्र
राहण्याच खोटं वचन दिलं होतं.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, February 08, 2022

राणी

राणी माझं पाहिलं प्रेम
तू आणि तूच आहेस.
अशी नाराज नको होऊ
अशी निराश नको होऊ.
तुला असं दुःखी बघून
जीव माझा तुटतो ग
हसरा खेळता चेहरा तुझा
बघ कसं काळवंडला
विचार किती करशील ग
सोबत जरी नसलो तरी
साथ माझी आहे ग..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अबोल प्रेम

अबोल‌ आपल प्रेम अबोलच राहिलं
मनात असूनही व्यक्त नाही झालो.
नजरेचा खेळ मांडला सारा
नजरेच्या टप्प्यातच बोलत राहिलो.
प्रेमाची आपली भाषा ना तुला समजली
प्रेमाच अतुट नातं ना मला समजलं.
अबोल असं प्रेम अबोलच राहिलं.
मेघा...✍️✍️©️®️


माझं प्रेम

माझे पहिलं प्रेम तू होता रे
किती किती जपलं आहे.
तुला काय माहित रे
तुझ्या शिवाय ना दिवस सुरू होतो
तुझ्या शिवाय रात्र नाही सरत.
वेडू तुझ्या प्रेमाच्या स्वप्नात
वेडी मी जगत असते रे
तुझ्या सहवासात आनंदी होते.
तुझ्या आठवणीत रमते 
तुझ्याच स्वप्नात जगते.
मेघा...✍️✍️©️®️


पहिलं प्रेम

वेडू तू माझं पहिल प्रेम
पहिल्या प्रेमाची भावना वेगळीच
पहिलं प्रेम वेगळंच
ते सांगता येत नाही.
ते बोलता येत नाही.
आठवणी कायम असतात.
मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसतात.
कातरवेळी आठवतात
मनात पिंगा घालतात.
क्षणभर मनाला हेलावून जातात.
तुझीच स्वप्न होऊन छळतात.
तुझ्याच आठवणी राहतात.
पहिलं प्रेम पहिलच असतं 
त्यांची सर नंतर कशाला नसते.
मुक्तछंद काव्या
    मेघा....✍️✍️©️®️


प्रेमाचा गुलाब

तो गुलाब जुना कसा होईल
तुझं माझं प्रेम ते उमलत जाईल
पाकळ्या जरी सांडल्या तरी
एक एक पाकळी जमा करील
मनाच्या कप्प्यात जपून ठेवीन.
सुगंध त्याचा दरवळत राहिलं
काटे आता रुतत नाही.
भावना बोधट होत नाही.
प्रेमाच अंकुर ताजाच राहिलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


गुलाब

राणी तो जुना गुलाब 
तुझ्या माझ्या प्रेमाचा प्रतिक
आज ही जपून ठेवल आहे.
वहीच्या पानांत रंग तसाच आहे
लाल लाल तुझ्या ग ओठांन सारखा
एक एक पाकळी मोकळी झाली.
तरी ही तुझ्या प्रेमाची कातरवेळी
आठवण करून देतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Sunday, February 06, 2022

बालपणीचा काळ

बालपणीचा काळ सुखाचा
खेळ खेळून मजा मस्तीचा
गोट्या, विटीदांडू, पतंग, लिंगोरच्या,
खो-खो, टिपरी पानी, दोरीच्या उड्या,
काकडी पाणी, हॉलीबाॅल, भातुकली, बाहुली
खेळ आता हे जूने झाले.बालपण त्यात
छानच सरले. मोरपीस ते जपून ठेवले.
नाद खुळाच होता चिल्लर जमवायचा.
पाटी पेन्सिल, स्वच्छ सुबक अक्षर
स्वच्छ सुंदर पुस्तके वह्या वहीच्या शेवटी
कवितेचा मेळा. 
समाजसेवेचा तासच निराळा
मनाला देई नविन तजेला.
भावंडांशी मस्ती मस्तीत भांडणे
भांडून रडत बसणे.
बाबांचा धाक आईची माया आजीचे लाड
माझी माऊ माझी माऊ करत दुध पोळी
वरणभात तूपाची धार दिवस ते मजेचे
परत नाही येणार आठवणींच्या साठवणीत कायम लक्षात राहणार.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बालपण

बालपणीच्या आठवणी
आता साठवणीत आहे.
बालपणीचा काळ सुखाचा
चिंता नाही काळजी नाही
शाळा अभ्यास स्पर्धा गॅदरिंग
तो काळ सुखाचा होता.
हट्ट लाड कौतुक होत.
भावंड भावनाचा मेळ होता.
कमी पैशात सुख होत.
माणुसकी होती. 
बालपणीचा काळ सुखाचा होता.
  मेघा...✍️✍️©️®️


आपली भेट

राणी तुला एकदा पाहव भेटावे
म्हणून मी तुला त्या वळणावर
आपण जेथे भेटायचो तिथे
पुन्हा भेटायला बोलवलं.
मला तुला भेटून कडकडून 
मिठी मारायची होती.
डोळे भरून तुला पाहून
तुझा तो निरागस चेहरा
मनाच्या आरशात कायमचा 
ठेवायचा आहे. ये ग एकदा  
जाता जाता मागे वळून भेट ग त्याच वळणावर ती शेवटची भेट आपली अस्मरणीय ठरव ग...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शेवटची भेट

ती शेवटची भेट
तुझी माझी घडलीच नाही.
दाटून कंठ आला होता.
तू समोर नव्हतास.
एकदा शेवटच डोळे भरून
तुला बघायची खूप इच्छा होती.
पण आपली शेवटची 
भेट झालीच नाही.
किती रे मी पापी तुला 
मला तुला शेवटचं पाहता ही 
आले नाही.
बहुतेक देवाची ही इच्छा नसावी
तुला ते कफण मध्ये बांधलेलं
शेवटचं भेटणं.
मला ही पाहवल नसतं 
तुला असं निपचित पडलेल.
माझ्या कडे तुझी हसती खेळती
छबी आहे तिचं खूप सुंदर आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, February 04, 2022

स्वतःसाठी लढावे

नेहमी शांत राहणे योग्य नाही.
डोळ्यातून अश्रु गाळण बरं नाही.
एक धडा शिकल्या नंतर
दुसरा धडा आपण शिकवावा
चूक नसताना का बरं ऐकून घ्यावं.
मान मान किती तो द्यावा
नातीगोती तुटतील किती बरं जपावी.
स्वतःला किती त्रास करून घ्यावे.
क्षणभंगुर जीवन आहे.
स्वतःसाठी थोडे लढावे.
स्वतःसाठी थोडे जगावे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शांत राहणे

नेहमी शांत किती राहू
मनाला सांग ना आता 
कसं आवरू तुझ्या आठवणीत
मनाची तगमग किती रे होते.
तुझ्याशिवाय त्रास किती रे होतो.
स्वतःसाठी ठामपणे कशी रे उभी राहू.
कसे सांगू तुला एकटीनेच
शांत राहणे किती अवघड आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


शांत राहणे

नेहमी शांत राहणे योग्य नाही.
जेवढं शांत तेवढी पिळवणूक जास्त
आज बदल होईल उद्या बदल होईल
असं किती दिवस गप्प बसायचं
सहनशक्तीचा अंत किती तो बघायचा.
जगाची रीतच आहे.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा
माती मऊ लागली की कोपरीने खोदायची
आता ठरवलं स्वतःसाठी उभं राहायचं.
स्वतःसाठी लढायचे
आपणच खरं हे दाखवून द्यायचं.
काही गोष्टी पटत नाही.
हे स्पष्ट पणे सांगायचे.
जेवढं मुळूमुळू रडू तेवढं जगाला 
बरंच असतं.
मग चालू होते तिची पिळवणूक
नेहमी शांत नाही राहायचं
स्वतःसाठी ठामपणे उभं राहायचं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Thursday, February 03, 2022

फुले सांगून गेली

बागेत भरलेली फुले
सांगून मज गेली
आयुष्य असे किती 
बोलून मज गेली
पडणारी पाने मज 
बोलून गेली
एकदिवस आहे
गळून पडायचे
जोवर आहे श्वास
तो वर देईन
चांगल्याना साथ
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


झाडं

बागेत भरलेली फुले मोजा
पडणारी पाने मोजू नका.
सुकलेल्या पानाच दुःख
त्यांनाच माहित
सुकलेली फुले त्यांना साथ देई.
बहर असा गळून पडे.
ओडके बोडके झाड फक्त
एकटेच उभे
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, February 02, 2022

हसू

राणी किती त्या वेदनांना ग 
कवटाळून बसशील
वेदनेचे दुःख लपवायला
किती ग हसू चेहऱ्यावर ठेवशील
दुःख कवटाळून काय ग होणार
सुखाच्या सावलीला पण 
तू परकी करणार वेदनेच्या आगीत 
किती ग जळणार
तुझ्या शरीराची राख झाली
तरी कोणाला नाही कळणार
वेदनेच दुःख बोलून 
तू माझ्या कडे मोकळी हो
खरंखुरे हसू चेहऱ्यावर ठेव.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


खोटे हास्य

तुझ्या जाण्याच्या वेदना खूप आहेत.
मनी वेदना लपून पापण्या
आड पाणी साठवून 
गर्दीला मूर्ख बनवून चेहऱ्यावर 
खोटे हास्य घेऊन जगते आहे.
पण लोकांना समजत नाही.
ते खोटं हास्य ही खरं वाटत 
मला माहित आहे 
खोट्या हसण्याने वेदना 
कमी होत नाही
त्या खोट्या हसण्याच्या
वेदनेवर ही मीठ चोळून
जाणारे बरेच आहेत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️©️


वेदना

राणी तुझे ते खोटे हसणे
डोळ्यात आड दुःख लपवून
ओठावर हसू ठेवणे
मला माहित आहे.
तू जेवढं दुःखी असते.
तेवढं तुझे डोळे निराश असतात.
त्या डोळ्यातील चमक कमी होते.
तू गर्दीला मुर्ख बनवू शकते.
पण मला नाही हे लक्षात ठेव.
ते वेदना कधीच कमी करत नाही.
लक्षात ठेव.
त्या पेक्षा ती सल ती वेदना
बोलून मोकळी हो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


उर्जा

रात्र सरली शांतता संपली
आशेचा नविन प्रकाश
घेऊन सूर्योदय झाला.
प्रसन्न रवी किरणांची
नविन उर्जा घेऊन
मानव पुन्हा निघाला 
जीवनातील गरजा पूर्ण करायला.
आपल्या उद्योग व्यवसायाला
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


शिक्षणाचा प्रकाश

तो स्त्री शिक्षणाचा
ज्योतीबा फुलेनी घेतलेला
प्रकाश आशेचा होता.
सावित्रीबाई फुलेना शिकून
ज्योतीबा फुले नी
तो नविन प्रकाश देशात आणला.
तो स्त्री शिक्षणाचा प्रकाश सर्व स्त्रीयांच्या
जीवनात नविन सुर्योदय होता.
तो स्त्री साक्षरतेचा सुर्योदय
चांगलाच तळपळत आहे.
त्या प्रकाश मागे सूर्य तळपळण्यासाठी
फुले जोडीने जीवाचे रान केले.
चिखल माती बोलणे टोमणे
सर्व सहन केले.
आपल जीवन या दांपत्याने स्त्री शिक्षणासाठी वाहिले. व देशात एक नवी प्रगती घडवून आणली.
स्त्री शिकली प्रगती झाली.
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहून आपला ठसा उमटू लागली.
असा आपला देशातील स्त्रीयांच्या जीवनात
नविन प्रकाश नविन सुर्योदय ज्योतीबा व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांच्या बाबतीत घडवून आणला.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time