तेव्हा मी सहावीत होते खूपच सुंदर अस ते आयता कृती घड्याळ होते त्यात नंबर नव्हते. फक्त बाराचा एकच Xll नंबर होत ग्रे रंगाच त्याच डायल खूप छान होतं.
लेदरचा ग्रे कलरचाच त्यांच्या मॅचिग पट्टा होता. ते घड्याळ मला खूप खूप आवडलं होतं मी रोज ते घड्याळ वापरत होते शाळेत पण घालून जायची.
ते घड्याळ इतकं हलकं होतं हातात घातलं का नाही हे हि समजत नव्हतं. इतकं सुंदर ते घड्याळ होतं.
मी ते घड्याळ जवळजवळ पंचवीस वर्षे वापरलं ते सहजच चुकून एकदा कोणाकडून तरी पडलं.आणि त्याचा बॅलन्स गेला. ते काही दुरुस्त झालं नाही. खूप प्रयत्न केले. पण कोणालाच जमले नाही.
मला तेव्हा खूप वाईट वाटले मी रडले ते घड्याळ परत दुरुस्त होणार नाही ऐकल्यावर
मी त्या नंतर घड्याळ वापरणं सोडून दिले.माझ्या मुलाने मग मला माझ्या पन्नासाव्या वाढदिवशी छान नाजूक टायटनच घड्याळ भेट दिलं तरी त्या घड्याळाची सर या घड्याळाला नाही.
मी हे घड्याळ वापरते. पण अजूनही मला त्याचं घड्याळाची आठवण येते. असं सुंदर मावशी ने भेट दिलेल घड्याळ माझ्या आठवणीत कायम राहिलं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️