Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, November 30, 2021

प्रेमात पराभव

प्रेमिका तू मला प्रेमात धोका दिला.
प्रेमात मी केला होता.
तुझ्यासाठी माझा जीव कुर्बान
तुझ्याचसाठी केला होता
मी माझा खजिना खल्लास.
तू मात्र मलाच केलं खल्लास
तू तुझा नविन डाव मांडून
माझ्यापासून दूर निघून गेली.
मी वेडापिसा झालो होतो.
तो प्रेमाचा पराभव मी जाहीर केला.
तुला विसरून मी नव्या  
संघर्षांची तयारी करू पाहतो.
तिला काळजाचा तुकडा करून 
मी माझा नवा डाव पुन्हा मांडू पाहतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


पराभव अलक कथा

ती एक स्त्री होती.
जीवापाड प्रेम करत होती.
प्रेमात एवढी आंधळी झाली होती.
लग्नाआधीच आपल सर्वस्व 
त्याला प्रदान केलं होतं.
तो मात्र फक्त एक पुरुष होता.
मजा मारून डाव 
जिंकून निघून गेला.
तिचा पराभव तिने स्विकारला
त्याला अद्दल घडवण्यासाठी
नव्या संघर्षाची तयारी करु लागली.
{हि कथा काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


यशस्वी

      तुझ्या जाण्याने मी 
नव्या संघर्षाची तयारी केली.
साथ माझी मलाच मी मिळवली.
  हाती घेऊन यशाचा झेंडा
      मी पायऱ्या चढेन
        उंच डोंगरवर 
   माझा संघर्षांचा झेंडा
       मी रावून येईल.
पराभव मी माझा करणार नाही.
नव्या संघर्षात यशस्वी मी होईल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️©️


Monday, November 29, 2021

उंच भरारी

भरारी घ्यायचं काही ठरवलं नव्हतं.
तू हात सोडला आणि मी हताश झाले.
गप्प बसून चालणार नव्हतं.
तू गेल्यावर महिनाभर विचार केला.
गप्प बसून चालणार नाही.
येणाऱ्या परिस्थितीला 
सामोरे जाण भाग होतं.
मुलांची शिक्षण सासू सासरांची
जबाबदारी माझी कर्तव्ये
स्वप्न आपल्या दोघांची पूर्ण करायची
मला त्यासाठी घराबाहेर पडून दोन पैसे
कमवावे लागणार होते.
बाकी राहिलेले काही व्यवहार
पूर्ण करावे लागणार होते.
त्यासाठी उंच भरारी घ्यावी 
लागणार होती.
मोकळ्या आकाशात तिमिराला तमा न बाळगता येईल त्या अडचणींना तोंड देत.
काही कळलंच नाही कधी एवढी मोठी
उंचच उंच भरारी घेतली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


भरारी

भरारी घ्यायचं काही ठरवलं नव्हतं.
वेळेवर तसं काही कळलं नव्हतं
स्वप्न काही पूर्ण करायची होती.
त्या स्वप्नासाठी पंखात बळ घेतलं.
ती स्वप्नं पूर्ण करायची होती.
धडपडत धडपडत उंच भरारी घेतली.
स्वप्न सर्व पूर्ण झाली.
उंच भरारी घेऊन छान तरंगत होते.
तुझा हात सुटला मिळवलेल्या
स्वप्नांचा चक्काचूर झाला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Sunday, November 28, 2021

नातं आपलं मैत्रीच

त्यांच्या भावना
राणी मैत्रीच आपलं नातं
आपल्याच नात्यात आपण
आपल्याला किती गुरफटून घेतलंय
आपल मैत्रीच निर्मळ निरपेक्ष नात
त्या नात्याला का कोणाच 
ऐकून तडा देतेस.
का ग इतका त्रास करून घेतेस.
आपल्या घरच्यांनी स्विकारले ना
आपल्या दोघांच नातं

तिच्या भावना
वेडून नाही रे आता मैत्रीच्या
नात्यात गुरफटून घेणे शक्य
माझे मलाच सतावते त्रास होतो रे
लोकांना कळत नाही मैत्रीच
आपल स्वच्छ नात 
अर्थ काढतात वेगळा
समजून नाही घेत रे
एक स्त्री आणि एक पुरुष
असं मैत्रीच नात नसतं
असाच याचं मत असतं.

त्यांच्या भावना
मग आपल्या नात्याला
तू तिलांजली देणार
आपण असं राहू का ग 
एकमेकांशी बोलण्याविना
असो सुखांची गोष्ट
असो दुःखाची गोष्ट
आपण हक्काने सांगतो.
सांग ना 

तिच्या भावना
हो रे माझ्या वेडू बरोबर आहे
मुलांचे रिझल्ट
त्यांचे प्रमोशन त्यांचा उत्कर्ष
आपल्या अडीअडचणी
आपण केलेत शेअर
साथ ही दिली सुखदुःखात
पण आता माझे मलाच सतावणे
शक्य नाही.
{हि रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


गुरफटणे

तुझ्या या नात्यात गुरफटणे
आता शक्य नाही.
तु माझा होणार नाही
हे मला माहित आहे.
मग का वेडी आस लावून
माझ्या जीवाची फरफर करू.
तुझ्यासाठी किती रे माझा 
जीव मी जाळू
किती जरी केलं तरी
तुला त्यांची किंमत नाही.
तू आपलं फोन आला काम आहे.
मी बिझी आहे जेवण करायचं आहे
असं करत मला नेहमीच टाळतो.
मग का त्रास करून घेऊन
आपलं नातं ओढून ताणून
त्यात स्वतः गुरफटून घेऊ
माझेच मला सतावते आता
मला शक्य नाही. 
{हि रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


सुवर्ण अक्षरात

राणी तुझ्या असण्याना नसण्याच्या
किती नोंदी ठेवू.
तुझ्या भेटीसाठी जगत आहे.
श्वासात तुझंच नाव आहे.
तुझ्या एका मिठीची ओढ आहे.
त्याच मिठीत सामावून जायचं आहे.
एकदा शेवटच तरी भेटून घेऊ
ती भेटीची नोंद मी सुवर्ण अक्षरात
लिहून ठेवून.
मग तुझ्या पासून खूप खूप दूर जाईल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, November 27, 2021

नोंद

तुझ्या असण्या नसण्याच्या
किती नोंदी ठेवू.
तुझ्या आठवणींच्या झुल्यावर
किती रे झुलू
झुलून झुलून भोंवळ येते.
तू नाही सावरायला.
आठवणींच्या हिंदोळ्याचा
झोका वर वर जातो.
तू नसण्याची जाणीव होताच
जोरात दणक खाली आपटतो.
तू असण्याच्या नोंदी खूप आहे.
तू नसण्याच्या नोंद मला दूर घेऊन जाते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️
©️©️


सुगावा प्रेमाचा

सखे तू माझ हृदय चोरले 
मला सुगावा पण लागला नाही.
एवढं हळूवार माझ्या
हृदयात तू जागा केलीस.
त्या हृदयावर तुझंच राज्य होतं.
तेथे तुझी छबी तुझ्याच आठवणी आहेत.
सखे माझ्या हृदयात जागा करून सुध्दा माझ्या हाती काहीच लागले नाही
ना तू लागली ना तुझं प्रेम लागलं.
मिलना आधीच तू कोणा दुसऱ्याची झाली.
आता फक्त तुझ्या आठवणी
हाती आहेत.
त्यावरच जगतो आहे.
त्यावरच जगतो आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


सुगावा

कोरोना हा असा आला
कोणाला सुगावा लागला नाही.
बघता बघता सर्व जगाला
विळखा घालून बसला.
कोरोनाचा असा आहे.
त्याचा सुगावा लागत नाही.
तरूण काय म्हातारे काय
सगळ्या त्यांने वेठीस धरले.
वेठीस धरून किती तरी 
संसार उद्धवस्त केले.
किती तरी मुलांनी
आई व वडील दोघांना गमावले.
किती तरी जणांनी 
आपले तरूण अपत्य गमावले.
तर किती तरी जणांनी
आपले जोडीदार गमावले
त्यात मी पण एक आहे.
माझा ही जोडीदार
ह्या कोरोनाने घेऊन गेला.
दोन दिवसांत होत्याच नव्हतं झाले.
मला काहीच सुगावा लागला नाही.
असं काही होईल. ते असे आम्हाला
अचानक दोन दिवसांत सोडून जातील.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️
©️®️


Thursday, November 25, 2021

चांगले विचार

रोज हजारो विचार येतात.
काही असतात महत्वाचे
काही असतात असेच काही
महत्वाचे विचारांवर उपाय
शोधून त्या अडचणी सोडवाव्यात.
असेच काही विचार असतात.
त्यांना तिलांजली देऊन.
चांगल्या विचारांना
स्वतःपासून सुरुवात करावी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


विचार

राणी विचारांची अडगळ दूर कर.
स्वतःच्या विचारात गुंतू नकोस.
जगाच ऐकू नकोस
मला पटेल तेच कर
स्वतःपासून सुरुवात कर.
विचारांची तू देवाण घेवाण कर.
मनातील पसारा आवरून घे.
मनमोकळ जगायला सुरुवात कर.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️
©️®️


Wednesday, November 24, 2021

स्वप्न

समुद्र किनारी शांत बसावं
मनातील वादळ
एकमेकांना सांगून शांत करावं.
गार हळूवार वाऱ्याची
झुळूक शांत अनुभवावी
शंख शिंपले गोळा करून
वाळूत स्वप्नांचं घर बांधावे.
त्या स्वप्नांच्या घरात रमून जावं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


समुद्र

प्रेयसी समुद्र किनारी शांत बसावं
तुझ्या माझ्या प्रेमाच्या गुंज गोष्टी
आठवून डोळ्यातील समुद्र
त्या समुद्रात मोकळा करतो.
समुद्राची गाज ऐकत शांत
लाटांचा खेळ पाहत बसतो.
आपल्या प्रेमाचा खेळ आठवतो.
लाटांचा पायाला स्पर्श करता.
मनात तुझ्या आठवणींच्या
गुदगुल्या होतात.
प्रेयसी तू समुद्र किनारी येत नाही.
मला भेटत नाही.
तुझ्या माझ्या प्रेमाचा
मनातील पसारा शांत करायला
मी रोजच समुद्र किनारी येतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


Tuesday, November 23, 2021

स्वप्नांची धूळ

स्वप्नांची जेव्हा धूळ माती होते.
मनाला खूप त्रास होतो.
स्वप्न पाहिलेली पूर्ण न होता.
मनात फक्त दाटले जातात.
तेव्हा अपेक्षांची गर्दी 
बघण्यासाठी थांबते.
मनाला यातना देऊन जातात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


धूळधाण

राणी तुला भेटण्याची
खूप स्वप्न पाहिली.
तुझ्या सोबत संसाराची
स्वप्न होती रंगवलेली
तुझ्या माझ्या मिलनाची
ओढ मनाला लागली होती.
माझ्या स्वप्नांची जेव्हा
धूळ माती झाली.
अपेक्षांची गर्दी बघण्यासाठी
थांबली होती.
नियती ही त्यांत उभी होती.
तिनेच तर केला
माझा घात
रंगलेल्या स्वप्नांवर 
फिरवला कुंचला
छान रंगवलेल्या
स्वप्नांची झाली धूळधाण.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️



Monday, November 22, 2021

मळभ दाटले

रवी असताना ही
मेघांनी झाकाळले 
मळभ सर्व दाटले
रवीच्या सोनेरी किरणांची
उमेद ही सापडेना
वर्षाराणी बरसण्याची
सर्वत्र चिन्ह दिसत होती.
शेतकरी हवालदिल झाला.
आता जर वर्षाराणी बरसली
तर हातातोंडाशी आलेला घास जाईल.
सर्वत्र पाणीच पाणी होईल.
रवीला विनंती केली.
ये रे रवी कुमार तू
मेघाआड दडलेला
मळभ हे दूर कर.
उमेद तुझीच आहे.
स्वच्छ निळ्याशार मेघात
सोनेरी तुझी किरणे दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


मळभ

मळभ मनावरचे जाईना
तू भेटण्याची उमेद ही सापडेना
आशेचा एक एक किरण संपतो आहे.
जीवाची तगमग वाढती आहे.
मतीमंद झाल्या सगळ्या भावना
तुला भेटण्यासाठी
किती रे केल्या विनवण्या
मळभ दाटून आले आहे.
मन कावरे बावरे झाले.
उमेद सर्व सोडून दिली.
मन एकांतात गुंतून घेतले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


नात्यांची मैफील

आज आमच्या भाऊ बहिणीची नात्यांची
भाऊबीज साठी मैफील ही रंगली होती.
आज माझे तिन्ही भाऊ दोन वहिनी
दोन भाचे एक भाची व मी एकुलती एक बहिण असे एकत्र जमलो होतो.
खूपच दिवसांनी असा योग आला
चेष्टा मस्करी करत एकत्र गप्पा झाल्या.
छान जेवण झालं.
मनावरील ताण बोलून बराच कमी झाला
औक्षण करून छान भाऊबीज साजरी केली.
अहो गेल्या नंतर आज मी हसत
खेळत छान मैफीलीत सामिल झाले.
त्यामुळे माहेरच्या पण खूप बरं वाटलं.
आज मनात नवी पालवी घेऊन मी निघाले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


Sunday, November 21, 2021

मैफील

राणी तुझ्याविना
मैफील ही रंगली होती.
त्या मैफीलीत ना गोडवा होता.
ना सूर होते.
तुझ्या शिवाय सुन्या सुन्या मैफिलीत
माझे मन रमत नव्हते.
अचानक तुला आलेले पाहून
मनात माझ्या पालवी फुटली
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझ्या येण्याने सूर हे जुळले
ताल हा धरला होता.
नवचैतन्य अंगी आले होते.
मी तुला सोबत घेऊन 
मैफीलीत नाचू बागडू लागलो.
मैफील ही रंगली होती
तुझ्या येण्याने नवी पालवी फुटली होती.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️
©️®️


वीण

प्रेयसी नात्यांची वीण नको उसवून
झालं गेलं सोडून दे ‌
प्रेमाचे त्याला चार टाके घाल.
बारीक चुनी ने शिवून घे.
गोडा त्यात भरून घे.
वादाला विषय नको ठेवूस.
प्रेमानी त्याला जोपासून घेऊन
आपली वीण चांगली घट्ट कर.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


नियती

बरीच खलबत झाली होती.
तुला मला एकत्र न आणण्याची
खूपच कारस्थाने रचली होती.
दोघांना वेगळं करायची
नियतीचा खेळ वेगळाच होता.
नियतीच्या मनात होते आपल्याला
एकत्र आणण्याचे
नियतीने तिचा डावा खेळला
आपल्याला एकत्र आणले.
मनाची तयारी नसताना ही
दोघांच्याही घरच्यांनी लग्न
आपल लावून दिलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


Friday, November 19, 2021

मनाची तयारी

डोहाळजेवण चे इव्हेंट आलं होतं.
मनात बरीच खलबत चालू होती
जाऊ का नको बरं दिसेल का
मनाची तयारी झाली नव्हती
मैत्रीणीनी आग्रह केला.
डोहाळजेवणच इव्हेंट आहे.
तू यायलाच हवे.
मैत्रीणीच्या आग्रहाखातर
शेवटी मनाची तयारी केली
येते म्हणून सांगितले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


पहिला विमान प्रवास

माझा पहिलाच विमान प्रवास
8/11/2021रोजी पुणे तिरुपती
अहो च्या आठवणीत कारण 
आम्ही ठरवले होते.
कोरोनाचा काळ कमी झाला की 
आपण सगळे विमानाने जाऊ.
पण तो योग्य आला नाही.
अहोन शिवाय विमान प्रवास
खूप वाईट वाटले डोळे भरून आले होते.

विमात बसताना थोडी भीती होती.
भरपूर उत्साह होता.
सूनबाई अमृता आई घाबरू नका.
खाली बघा किती छान वाटतं.
मुलगा (सोनू) तेजस यांने मुद्दाम
विमानाच खिडकी जवळच तिकीट काढलं होतं.
ज्याने करून खिडकीतून विमान उडताना
आजूबाजूच निसर्ग छान बघता यावे.
मन प्रसन्न व्हावे.

खूप सुंदर 👌👌 वाटले विमानात बसून प्रवास करायला.
अभिमान वाटला माझा मलाच
त्याहून जास्त अभिमान मुलांचा आहे.
खूप लहान वयात खूप मोठ्या पोस्ट वर आहे.
माझ्या (सोनूने) तेजसने माझ्या
कष्टाची जाणीव ठेवून
माझ्या कष्टाचं सार्थक केले.

तिरुपतीला पोहचल्यावर
सुंदर रुम होती तेथे जेवण करून
झोपी गेलो.
सकाळी नाष्टा करून कालहस्तीला गेलो.
तेथून दुपारी येऊन
तिरुमल्ला म्हणजे वर डोंगरावर
बालाजी दर्शनसाठी गेलो.
तेथे वरती डोंगरावर थोडा पाऊस थोडी थंडी सोबत वारा असे छान आल्हादायक वातावरण होते.
तेथे रुम बुक करून रुम वर आवरून
दर्शनास गेलो.
छान सुंदर भरल्या डोळ्यांनी
गोविंदा गोविंदा करत दर्शन घेतलो.
दर्शन घेऊन बाहेर आलो.
तेव्हा आमच्या सर्वाचेच डोळे
पप्पांच्या आठवणीने पाणावले होते.
देवाचा प्रसादाच जेवण करून
रुम वर आलो तेथेच राहिलो.
सोनूने मला कोठेच तू एक स्त्री आहेस.
तुला हे जमणार नाही.
असे जाणून दिले नाही.
प्रत्येक ठिकाणी सल्ला विचारला.
काही ठिकाणी तू जाऊन नाष्टाची
जेवणाची ऑर्डर दे.आम्ही येतोच
तो पर्यंत असं सांगत होता.

तिरूमल्ला म्हणजे बालाजी दर्शन करून
दुसऱ्या दिवशी आम्ही खाली तिरुपतीला आलो.
तेथे बॅगा वगैरे ठेवून पद्मावती व थोडी खरेदी केली.
मला बांगड्या खूप आवडतात.
त्यातून त्यात कंगण खूप आवडतात
बांगड्या व कंगण
अमृताला तिला हवे तसे मॅचिंग 
कानातले व सेट घेतले.
तेथून संध्याकाळी सहाच्या गाडीने
हैदराबादला रवाना झालो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


मला सांगशील का

सखी शांत शांत राहते 
काहीच सांगत नाही.
माझ्या मनातील सगळंच ओळखून
माझ्या इच्छा पूर्ण करते.
तुला विचारले काही तर
स्वतः मात्र काहीच सांगत नाही.
तुच ओळख माझ्या मनातील
असं सांगून मोकळं होते.
मला तुझं मन समजत नाही.
तुझ्या मनातील ओळखता येते नाही.
खूपदा विचार करतो.
तुझ्या मनातील ओळखून
तुला सरप्राइज द्यावं.
मला मात्र तुझ मन वाचताच येत नाही.
सखी मला एकदा सांगशील का?
तुझ्या मनातील ओळखायचे कसे?
मेघा...✍️✍️
मुक्तछंद काव्या
©️®️


Wednesday, November 17, 2021

प्रेम

हेवेदावे करून प्रेम 
आपल टिकेल का
हेवेदावेतून केलेल प्रेम
यशस्वी होईल का?
समजूती घेऊन प्रेम 
तू करशील का?
माझ्या मनाला वेदना देऊन
वेडू तुला बरं वाटेल का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


हेवेदावे

हेवेदावे हे कशाला हवेत.
किती या वेदना मनाला होतात.
त्यापेक्षा दोन शब्द गोड बोलून
समजूती प्रश्न सोडवावा.
हेवेदावे करत बसलो तर
नातेसंबंध बिघडतात.
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी
सख्खे भाऊ बहिण
असून ही नसल्या सारखे होतात.
एकमेकांचे तोंड पाहत नाही.
एकमेकांच्या जीवावर उठतात.
ह्याचाच फायदा समाज घेतो.
अजूनच आगीत तेल ओतून
आपला फायदा करून घेतो.
म्हणूनच हेवेदावे कशाला हवेत.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Tuesday, November 16, 2021

लढून जगावं

लढायची खुमखुमी नव्हती.
प्रेमासाठी जगायचं होतं.
जबाबदारी साठी कर्तव्यासाठी
लढावं लागतं.त्यासाठी
जगण्याची धुंदी तेवढी होती.
जगण्यासाठी लढावं लागतं.
लढून जगावं लागतं.
आपली कर्तव्ये जबाबदारी
पूर्ण करावी लागतात.
त्यातून मिळणारा आनंद
समाधान वेगळेच असते.
लढून जगावं मरून जगावं
मरणा नंतरही प्रेमासाठी जगून बघावं.
मुक्तछंद काव्या
मेघा..‌.✍️✍️


Monday, November 15, 2021

दाटून आले

सखे किती तरी दिवसांनी
ते तुझे काव्य रुपी पत्रे काढली.
पुन्हा ते आपले कॉलेज चे दिवस आठवले.
तो तुझा कॉलेजचा पहिला दिवस
लाजत बुर्जत तुझं ते कॉलेजला येणे.
मराठी विषय घेऊन एम ए करणं
तुझे ते प्रोफेसर व्हायचे स्वप्न
तुझ्या डोळ्यात दिसत होत.
आपली शिक्षकदिनाच्या  
दिवशी ओळख होणं.
तुझं ते छान समजावून 
सांगून शिकवण
ते शंकुतलेच रुप तिचं ते
प्रेम किती छान ते समजावून 
सांगत होती.
मी ही तुझ्या कडे पाहत
तल्लीन होऊन शिकत होतो.
शंकुतलेची प्रेम कविता शिकता
शिकता मीच तुझ्या प्रेमात पडलो.
तेथेच तर आपली नजरानजर झाली.
ते वर्ष आपण खूप एन्जॉय केल.
तू मला काव्य रुपी पत्रातून
पहिलं प्रेम पत्र दिले होते.
शेवटच्या पेपरच्या दिवशी
एक सुंदर काव्य रुपी पत्र दिलं
त्या काव्यरुपी पत्रात फक्त आणि फक्त
माझी काळजी होती. पण मला त्या
तुझ्या शेवटच्या काव्यरुपी
पत्राचा अर्थ कळला नाही.
दुसऱ्या वर्षापासून तुझं कॉलेजला
अचानक येणे बंद झाले
खूप खूप वाट पाहिली
तुला खूप खूप शोधलं ग.
आज किती तरी दिवसांनी
तुझी ती काव्य रुपी पत्रे वाचली.
आता त्या शेवटच्या पत्राचा अर्थ कळला.
सखी मनात खूप दाटून आले.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Sunday, November 14, 2021

कैफ प्रेमाचा

तुझ्या प्रेमात कैफ रेंगाळलो
तुझ्या प्रेमाच्या नशेत झिंगलो
तुझ्या डोळ्यात माझ्यातला
मी पुन्हा पाहिला.

तुझा मुखडा पाहता मी वेडा होतो.
तुझ्या ओठांच्या रसात धुंद होतो.
तुझ्या मिठीत साखरे सारखा विरघळलो.
धुंदी तुझ्या प्रेमाची नशेत चूर चूर होतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Saturday, November 13, 2021

गोड मधुर

अग राणी स्वर 
तुझे ते इतके मधुर होते
अमृतापरी गोड होते. 
तुझे गोड मधुर बोलणे
आवाजात तुझ्या प्रेमळ भाव
तुझ्या प्रेमात पडलो.
तुझी ती गोड मधुर सुंदरता
तुझ्या नजरेत पाहता
प्रेमाचा तो अर्थ नवा भासला.
तुझा प्रेमळ स्वभाव 
राणी तू अमृतापरी गोड 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Friday, November 12, 2021

राख आहे

प्रियसी माझा निर्धार आहे.
एक दिवस तू मला नक्की भेटशील.
प्रेमाची कबुली नक्की देशील.
माझ्या मिठीत विरघळून जाशील.
तुच माझी प्रियसी, तुच माझी राणी,
तुच माझी सखी, तुच माझी वेडूबाई.
तुझ्या साठी निर्धार माझा आग आहे.
तुझ्या समोर बाकी दुनिया
सगळ्या लालना राख आहे.
प्रियसी मी एवढं प्रेम तुझ्यावर करतो.
बाकी जगाचं मला देणंघेणं नाही.
प्रियसी बाकी सर्व तुझ्या समोर
मला राख आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


समजावून

प्रियसी कितीदा समजावून सांगावे
मी तुझ्या वर खूप खूप 
प्रेम करतो ग
प्रियसी माझी राणी
मला समजावून घे ना
प्रियसी तुझ्यासाठी 
तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते
मी करायला तयार आहे.
प्रियसी तु फक्त मला सांग ग 
राणी जुने भाव पुन्हा
नव्याने का वापरायला सांगते.
प्रियसी एकदाच मला समजून घे.
तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
मिळतील.
मी फक्त आणि फक्त तुझाच
आहे. तुझाच राहिलं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Wednesday, November 10, 2021

स्मित

राणी तुझ्या दुःखावर हळूवार
फुंकर घालून 
तुला तुझ्या आवडीच्या 
सोनचाफाची फुले देऊन.
त्या फुलांचा सुगंध दरवळत
तुझं ते निरागस जुनं 
स्मितहास्य मी फुलण्याचा 
प्रयत्न करतो.
तुला मिठीत घेऊन
तुझ्या वर सोनचाफ्याची 
उधळण करून.
तुझ्या गोड चेहऱ्यावर
तुझ्या गुलाबी ओठांवर
जुनं ते स्मित हास्य
फुलवत राहतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Tuesday, November 09, 2021

आनंद

आनंदाच्या या सागरात डुंबावे
क्षणभर का होईना दुःख विसरावे.
मी तुझ्या शिवाय पहिला प्रवास
एकटीने आपल्या सोनू अमृता
व आपला लाडका नातू
पिल्लू सोबत करत आहे.
प्रवासाच्या या सागरात 
आनंदीआनंद आहे.
सोबत तु नाही हे 
खूप मोठं दुःख आहे.
क्षणभर का होईना आपल्या
मुलांच्या चेहऱ्याकडे बघून
दुःख विसरून हसत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Monday, November 08, 2021

कलह

कलह किती ही झाले तरी
तुझीच साथ हवी होती.
तुच तर माझा सखासोबती होता.
तू सरणावर जाण्याआधी
मला मरणवर जायचे होते.
मला मरता ना साथ 
तुझी हवी होती.
माझा देह जळताना
तुझे अश्रू थंडाव्यासाठी
हवे होते.
कलह किती झाले तरी
साथ तुझीच हवी होती.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


साथ

वेडाबाई किती कलह घालशील
तुझे माझे कितीही कलह
झाले तरी
माझी साथ तुलाच आहे.
जस मीठा शिवाय अन्नाला  
चव नाही.
तस तुझ्या शिवाय माझं जीवन
अपूर्ण आहे ग वेडाबाई.
साखर दुधात विरघळते.
मीठ पाण्यात विरघळत
तसा मी तुझ्या प्रेमात विरघळतो.
माणूस म्हटला की कलह होणार
कुरबुरी ह्या चालूच राहणार ‌
वेडाबाई कलह किती ही 
झाले तरी
साथ तुझी असावी खरी.
तुझ्या सोबतीची
ती मजा च वेगळी आहे.
जशी दिवा आणि वात
तशी तू आणि मी
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


झाकोळेला चंद्र

हा चंद्र ना स्वयंभू
रवी तेज वाहतो हा
मेघाआड लपून
चांदण्या पाहतो हा.
झाकोळलेला तरी
मेघाच्या अंधारी छायेत
चमकून दिसतो हा.
जाणीव त्यास 
शुक्राच्या चांदणी ची
तिच्यासाठीच व्याकूळ हा.
रवीच्या छायेत
मेघाच्या आड
दडतो हा.
चांदण्याना भेटायला
निशा सोबत येतो हा.
अमावस्याला चांदण्या रात्री 
चांदण्या नभा चमकता
मेघा आड दडलेला असतो.
तेव्हा अर्थ नवा हा जाणतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Sunday, November 07, 2021

चंद्र

चंद्र हा झाकोळलेला
मेघा आड दडलेला.
चांदण्या रात्री 
रवी तेजात न्हालेली
चंद्र चकोर प्यायलेली.
मेघाच्या अश्रूंनी भरलेली.
माझी प्रियसी तू उदास का
मेघा आडून येईल
तो चंद्र तुझे कोमल मुख
दर्शन करायला.
मग अर्थ नवा तो जाणेल.
तुझ्या माझ्या प्रेमाचा
प्रियसी तू जरा हास
झाकोळलेला चंद्राला
आपल्या प्रेमाचा अर्थ
नवा जाणू दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Saturday, November 06, 2021

भाऊबीज

ओवळीते भाऊराया वेड्या
बहिणीची वेडी ही माया
नको मला साडीचोळी
दुःखात तुमची साथ हवी
सुखात हवा तुमचाच हात
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा.
मला जगायला बळ द्या.
तुमचा वरदहस्त कायम मला लाभो.
तुम्ही कायम सुखी राहो
माझ्या नेत्रांच्या ज्योतीने
ओवाळते तुम्हा
ईश्वर चरणी प्रार्थना करते
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. 
लक्षलक्ष आयुष्य लाभो.
आरोग्य धनसंपदा लाभो.
तुम्ही सदासर्वदा सुखी 
समाधानी राहो.
जितेंद्र दादा, शैलेंद्र,निलेंद्र, गणेश
येवला दादा,मोहनील दादा, तापकीर दादा
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
तुमचीच लाडकी बहिण
मेघाराणी...✍️✍️


कयास

असाच कयास बांधला होता.
तुझं माझ्यावर प्रेम आहे.
ते तू कबूल केलं.
प्रश्न विनासायास सोडवला होता.
तू आता फक्त माझीच आहे.
माझ्या मनावर तुझंच राज्य आहे.
माझ्या हृदयात तुझंच घर आहे.
माझा प्रत्येक श्वास
तुझ्याचसाठी घेतलेला असेल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


वळणावर

तू  त्या वळणावर उभा होता.
मी रोज तेथून जायची.
तेथेच तर तुझी माझी
नजरेची भेट झाली.
माझे पाऊल तेथेच
त्या वळणावर आता
रोज अडखळतात
तुझ्या पाऊलखुणा
शोधून त्या पावलांवर
माझे पाऊल पडते.
आणि तुझीच आठवण 
करून देते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️👌


साथ

सखे पाऊलवाट
ओळखीची असावी.
सखे त्या तुझ्या पावलांवर 
माझे पाऊल असावे.
तुझी चालताना कायम 
सोबत असावी.
त्यात नागमोडी वळणं 
नसावे.
तुझी सुख दुःखात 
साथ असावी.
तुझा प्रेमाचा हात 
कायम हाती असावा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


पाऊलवाट

वेडू किती ही नागमोडी 
वळणे आली तरी
तू कायम माझी
साथ देशील ना.
आपली पाऊलवाट 
ओळखीची असेल ना
माझ्या पावलांवर 
तुझी पावले  ठेवशील ना
वळणावर माझा हात
धरशील ना
आपली पाऊलवाट
शेवट पर्यंत राहिलं ना
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Friday, November 05, 2021

सखे

सखे पाऊलवाट
ओळखीची असावी.
सखे त्या तुझ्या पावलांवर 
माझे पाऊल असावे.
तुझी चालताना कायम 
सोबत असावी.
त्यात नागमोडी वळणं 
नसावे.
तुझी सुख दुःखात 
साथ असावी.
तुझा प्रेमाचा हात 
कायम हाती असावा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


सुख

राणी खूप काही
मनात दाटले आहे.
तुझ्या नजरेत पाहता 
हायसे वाटले आहे.
तुझ्या मिठीत स्वर्ग
सुख आहे.
तुझ्या सुखाच्या सावलीत
हायसे वाटते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


हायसे वाटते

खूप काही मनात दाटले आहे.
वेडू तुझ्यासोबत बोलून 
हायसे वाटले आहे.
मना वरच ओझं हलकं 
झालं आहे.
साथ अशीच देशील ना रे
कायम सोबत करशील ना रे
मनातील माझ्या जाणशील ना रे
माझं ऐकून घेशील ना रे
वेडू तुझी सोबत
माझ्या मनातील दुःखाला
सोबत करते.
तुझ्या सोबत बोलून
टेंशन कमी होऊन हायसे वाटते.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️


Wednesday, November 03, 2021

तुझं स्मित

राणी तुझ्या गोड गुलाबी 
ओठांवरची अदाच वेगळी
तुझे ते स्मित पाहून
मी वेडा होतो ग
विसरून भान 
तुझ्यातच गुंततो
तुला हलकेच मिठीत घेऊन
स्मित तुझे चाखतो.
तुझे स्मित पाहून
होऊन वेडा
अश्रू मी गाळतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


सोनूली तुझ स्मित

सोनूली तुझ्या जन्मानंतर
तुझे ते स्मित हास्य पाहून
मी माझ्या वेदना विसरले ग
तुझे तो हसरा चेहरा पाहून 
किती गेले अश्रू वाहून.
तुला हसत खेळत मोठी 
होताना पाहून.
माझं काळीज भरून 
यायचे.
तुझ्या लग्नाच्या वेळी
तुझी स्वप्न पूर्ण करत
तुझ्या भावी जोडीदारा
सोबत तुझं उभे राहून
दोन घरच्या मिलनाने
तुझ्या चेहऱ्यावरील स्मित
पाहून डोळे भरून आले.
तुझं आम्ही कन्यादान करताना
किती गेले अश्रू वाहुनी.
तुला पाठवणी करताना
आमचं दोघांचं काळीज
कोणी काढून घेत का काय
अशी अवस्था आमची झाली होती.
पण तुझं ते स्मित हास्य पाहून
आम्ही अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


स्मित

तुझे ते खूप दिवसांनी 
स्मित पाहूनी
किती गेले अश्रू वाहुनी
राणी अशीच हसत खेळत
बडबड करत राह ग
तुझ्या गोड गुलाबी ओठांवर
सतत हास्य राहू दे.
तुझ्या चेहरा स्मित हास्याने
झळकू दे.
तुझ्या हास्याला आता 
कोणाची दृष्ट न लागो.
तुझ्या जीवनात अश्रूंना
आता कणभर पण जागा नको.
चांदण्या सारखी स्मित करत
सुखांनी जग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


कशाला मनाला लावून घेतेस

राणी कशाला काही
मनाला लावून घेतेस.
या वेडूच एकदा ऐक
संसाराच्या सारीपाटावर
सगळं असंच असतं.
सुख दुःख येतात जातात.
जन्म मृत्यू अटळ आहे.
किती दिवस विचार करणार.
किती त्रास करून घेणार.
किती दिवस झुरत बसणार
घडणाऱ्या गोष्टी घडणारच
झालं गेलं सोडून दे.
तुझ्या गुलाबी ओठांवर
पुन्हा हास्य येऊ दे.
हासता ना तुझ्या गालावरची
खळी पुन्हा उमलू दे.
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात 
पुन्हा चमक येऊ दे.
झालं गेलं ते सोडून द्यायचं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


झालं गेलं सोडून दे

राणी जग असंच आहे.
पायी चालून देत नाही.
घोड्यावर बसून देत नाही.
तू जगाचा नको विचार करून
कशाला काही मनाला लावून घ्यायच
झालं गेलं सोडून दे.
आता बिनधास्त जगायला शिक
तुला हवं तसं तू तुझा शॄंगार कर.
तुला वाटले मस्त फिरून यावे 
जाऊन फिरून येत जा.
काही खावे वाटले खाऊन येत जा.
तुला वाटले तुझ्या आवडीच्या
क्षेत्रात जॉब करावा.
खुशाल जॉब करायला जा.
तुला समाजसेवा आवडते
एखाद्या आश्रमात जाऊन
खुशाल मदत कर.
तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं.
कशाला काही मनाला लावून घ्यायचं
जगाचा विचार नाही करायचा
झालं गेलं ते सोडून द्यायचं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Tuesday, November 02, 2021

दुःखी

कधी कधी असं वाटू शकतं
दोष कोणाचा माझा की नशीबाचा
तू मला भेटलीस नाही.
तुझी माझी भेट झाली नाही.
जगाच्या पाठीवर 
तुला खूप शोधलं
तू सापडलीच नाही.
अशी कोठे निघून गेलीस.
सखी तुला खूप 
सांगायचं होतं.
तुझ्या सोबत 
खूप बोलायचं होतं.
तुझा हात माझ्या 
हाती घ्यायचा होता‌.
तुझ्या सोबत संसाराची 
स्वप्नं रंगवायची होती.
तुला खूप खूप सुखात 
ठेवायचं होतं.
तुला दुःख द्यायचं नव्हतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Monday, November 01, 2021

दोष

कधी कधी असं वाटू शकतं
दोष कोणाचा झाला
दोष कोणाचा नसतो 
ना तुझा ना माझा
दोष असतो आपल्या कर्मांचा
दोष असतो आपल्या नशीबाचा
दोष असतो आपल्या भोगाचा
सत्य कर्म करता जायचं
फळांची अपेक्षा ठेवायची नाही.
दोषी स्वतःला ठरवायचं नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


किनारा

ये ग राणी पुन्हा किनाऱ्यावर
गाऊ पुन्हा प्रेम गाणी
पुन्हा देऊ हात हाती 
साथ देऊ जन्मभराची
स्वप्न बांधू पुन्हा नव्याने
त्या स्वप्नात हरवून जाऊ
माझ्या मनावर तुझंच राज्य
तुझेच नाव कोरले हृदयावर.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


तुझं राज्य

सख्या ये पुन्हा त्या किनाऱ्यावर
माझ्या मनावर जेथे फक्त
तुझंच राज्य आहे.
तेथे फक्त तुझाच वास आहे.
तुझ्या साठीच ठेवलं आहे.
मी माझ्या किनाऱ्यावर
फुलांच्या पाकळ्या पसरून
हृदयावर माझ्या तुझंच 
नाव आहे.
स्वप्नांच्या दुनियेत तुझीच
स्वप्न आहेत.
ये पुन्हा त्या किनाऱ्यावर
तुझंच राज्य माझ्या मनावर
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


भाव जाणून बघ

डोळ्यात सारे शब्द पाणावले
ओठांवर कधी न आले.
तू समजून घे रे लेकरा
आई बाबांची व्यथा
असा तोडून जाऊ नकोस.
भाव अंतरीचे ओळखून बघ..
काळजावर दगड ठेऊ नकोस.
काळीज आईबाबाच जाणून बघ.
पैशात त्यांना नको तोलू
शब्दांनी जरा बोलून बघ.
प्रेम जरा देऊन बघ
भाव त्यांच्या अंतरीचे 
जाणून बघ.
नातवंडानसाठीचे प्रेम त्यांचे
जाणून बघ.
पडताना त्यांना सावरून बघ.
तुझ्या घरात राहून दे.
डोळ्यात त्यांच्या भाव बघ
भावने मागचे अश्रू बघ.
अंतरी त्यांना समजून बघ.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


भाव

डोळ्यात सारे शब्द पाणावले
तुला ना ते कधी दिसले.
भाव अंतरीचे कधी
तू समजून घेतलेच नाही.
प्रेमाच्या वाटेवर शब्द नव्हते.
नजरेच्या इशाऱ्यात सखी
तुला ना दिसले.
हसून लाजून दूर झाली.
सखी भाव ते अंतरी का उठले.
डोळ्यातील शब्दांना
जाणली असतीस तर
भाव अंतरीचे एक झाले असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


प्रेमाच्या गावाला राणी तुझे नाव

तू माझी राणी तुझ्यासाठी आणीन
मी प्रेमाची गाडी
त्या माझ्या प्रेमाच्या गाडीत 
राणी तुला बसवेन
क्षितिजाच्या पलिकडे
माझ्या प्रेमाच्या गावी 
तुला घेऊन जाईन
तेथे नसेल दुःखाची 
क्षणभर छाया
तुझ्या आवडत्या चाफ्याच्या 
वनात तुला फिरवून आणेन.
चाफ्याच्या सुगंधात 
तुला न्हाऊन घालेन.
आईस्क्रीमानी भरलेल्या
राज्यात तुला घेऊन जाईन
मनसोक्त आईस्क्रीम
तुला खाऊन घालीन.
राणी प्रेमाच्या गाडीतून
चांदण्यात फिरविण.
माझ्या प्रेमाच्या कुशीत
तुला निजवेण.
तुझ्या गुलाबी ओठांवर
हास्य मी आणीन.
हसताना तुझी गालारची
खळी मी माझ्या डोळ्यांत साठविण.
आशा माझ्या प्रेमाच्या
गावी घेऊन जाईन.
प्रेमाच्या गावाला 
राणी तुझंच नाव देईन.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


प्रेमाच गाव

त्या तिथे पलीकडे
डोंगराच्या पायथ्याशी
हिरवळीने नटलेल्या
झुळूझुळू वाहणाऱ्या वाराऱ्यात
खळखळ वाहणाऱ्या 
पाण्याचा बाजूला
सौंदर्यांने नटलेल्या जागेत
असावे माझे प्रेमाचे गाव
त्याला असावे फक्त वेडू तुझे नाव.
त्या सौंदर्याच्या जागेत
प्रेम आपल फुलून यावे.
श्वासात श्वास मिसळून
हृदयात तुझीच कंपने जाणावी.
अशा प्रेमाच्या गावात नसावी.
कसलीच भीती चिंता काळजी
असावी फक्त आणि फक्त 
प्रेमाची नाती.
वेडू अशा प्रेमाच्या गावात
तुझी माझी आयुष्यभराची 
सोबत असावी.
प्रेमळ वेडूच गाव म्हणून
असावी त्यांची किर्ती
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


गुजगोष्टी

वेडू तुला पहिले की
माझे शब्दच 
अपुरे पडतात.
तुझ्या नजरेत मी 
हरवून जाते.
काय बोलावं तेच
सुचत नाही.
माझ्या नजरेची भाषा
तू समजावून घे ना
माझ्या मनातील गुजगोष्टी
मनातच राहून जातात
वेडू त्या तू समजावून घे ना.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time