समुद्रकिनारी एकटाच लाटा मोजत बसतो.
खिडकीतून चांदण्याची लुकलुक पाहतो.
चंद्र ला प्रेमाची कबुली देतो.
रवीच्या सोनेरी किरणांची अनुभूती घेतो.
पावसाच्या सरी एकटाच अंगावर घेऊन
गरमागरम कांदाभजी चहा घेतो.
चाफ्याच्या फुलांची उधळण करतो.
बागेत जाऊन एकटाच छान फेरफटका मारतो.
तुझ्या आवडीच मस्त आईस्क्रीम खातो.
गणपती मंदिरात जाऊन एकटाच ध्यानधारणा करतो.
गॅलरीत झोपाळ्यावर एकटाच
हळूवार झोके घेत वाचण्याचा आनंद लुटतो.
हे झुळझुळ वाऱ्या हळूच मंजूळ शीळ घालून
जाऊन सांग तिच्या कानी सगळे
तुझ्याविना घडत नाही काही वेगळे
जगतो आहे तसाच पूर्वी सारखा
एकटाच तुझ्या आठवणीत.
तू ये लवकर सहन होत नाही हा दुरावा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️