Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label प्रेमात काय गमावलं कमावलं. Show all posts
Showing posts with label प्रेमात काय गमावलं कमावलं. Show all posts

Saturday, September 25, 2021

प्रेमात काय गमावलं कमावलं

सखी तुझ्या प्रेमात काय मिळवल
अन् काय गमावलं?
हे गणित मांडून पाहिलं
खूप काही गमावलं
खूप काही कमावलं
त्याचा हिशोब खाली मांडतो
जमलं तर वाचून बघ.
सखी तुझ्यामुळे प्रेमात
खूप सुख मिळवलं
सखी तुझ्यामुळे प्रेमात
न्हाऊन निघालो.
सखी तुझ्यामुळे
मला टेंशन नव्हतं.
तुझ्या कडे सर्व बोलून
मोकळा मी होत होतो.
सखी तू होती तर काहीच
कमी नव्हतं.
सखी तुझ्या मुळे
खूप काही कमावलं होत.
तुला गमावल्याचा
आता पश्चात्ताप होतो ग
सखी आता तू माझ्या
सोबत पूर्वी सारखी बोलत नाही.
सखी तू पूर्वी सारखी
माझ्या सोबत भांडत नाही.
सखी तू आता माझ्या कडे
हट्ट करत नाही.
सखी तू पूर्वी सारखी
माझ्याकडे हट्टाने
भेळ आईस्क्रीम मागत नाही.
सखी तुझ्या मुळे खूप काही गमावलं.
आता हिशोब मांडून काय उपयोग
माझंच गणित कच्च होत.
सखी तू मात्र आयुष्याच्या
गणितात पास झाली.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time