ती त्याच्या सोबत तो तिच्या सोबत डोळ्यांनी बोलायचे. आँखो की आँखो में इशारे हो गये सारखं दोघंही फक्त मौनाची भाषा ते एकमेकांशी करायचे.मौन प्रेम आणि डोळ्यांच्या भावनांनी त्याचे रहस्यमय प्रेम चालू होते. असेच दिवस जात गेले. त्यांच ते रहस्यमय प्रेम कोणाच्या ही लक्षात आले नाही. आणि अचानक तिचं लग्न ठरलं तिने ही कुठले आढेवेढे न घेता लग्नाला तयार झाली. त्यांच ते प्रेमाच रहस्य रहस्यच राहिले.
तिने ही ते रहस्यमय प्रेम आयुष्यात कायमच जपून ठेवलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️