Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label विश्वासाचा आरसा. Show all posts
Showing posts with label विश्वासाचा आरसा. Show all posts

Sunday, January 23, 2022

विश्वासाचा आरसा

तुटलेल्या आरशात जसं
किती सौंदर्यवान चेहरा पहिला
तरी त्या चेहऱ्यावर तुटलेल्या
आरशाचा तडा दिसतोच
सरळसूत चेहरा दिसत नाही.
तसच एकदा का विश्वास तुटला की
तुटला विश्वास जोडता येत नाही.
जोडला तरी पूर्वी सारखा राहत नाही
त्यात एकदा का गाठ बसली की बसली
तो विश्वास सरळ सूत राहत नाही.
जरी ती व्यक्ती आपल्याशी बोलत असली तरी काही गोष्टी हातचं राखून बोलते वागते.
म्हणून कधीच कोणाचा विश्वास गमवू नका.
विश्वास कमवायला आयुष्य लागत. पण
विश्वास गमवायला एक मिनिट पुरेसा असतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time