Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label ऋणानुबंध {अलक कथा}. Show all posts
Showing posts with label ऋणानुबंध {अलक कथा}. Show all posts

Tuesday, January 04, 2022

ऋणानुबंध {अलक कथा}

तू भेटली मी तुझ्या सानिध्यात आलो.
मी तुला काय सांगू किती छान वाटलं
माझी सर्व चिंता काळजी मिटली
खूप खूप मोकळा झालो.
तुझ्या कडे बोलून मनमोकळ करून
जगायचं बळ तूच तर मला दिले.
आयुष्यातून उठलेला मी
आत्महत्यांचे विचार करत होतो.
त्यासाठी सोशल मिडियावर शेवटची पोस्ट
टाकत होतो. आणि तुझं नाव दिसले.
काय माहित काय वाटलं पण तुझ्या नावाकडे
बघून खूपच आकर्षित झालो.  तरी तुझा डिपी नव्हता.
जस काही माझं काही तरी हरवलेलं मला मिळालं. असं वाटलं 
एक सेकंद ही विचार न करता मैत्रीसाठी विचारले
आणि तू ही चक्क मिनिटभरात रिप्लाय देऊन.माझी मैत्री स्वीकारली.
खूप खूप आनंद झाला.
आत्महत्येसाठी पोस्ट टाकणारा मी तुझ्याशी
बोलण्यात एवढा गुंतून गेलो.
जसे काही आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
आहेत. 
मी सगळं तुझ्या कडे सांगत गेलो
तू सगळं शांतपणे ऐकून घेतले.
माझ मन परिवर्तन केले.
माझा नविन जन्म झाला आहे असं मला वाटलं
असे आपले मैत्रीचे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जुळले. 
{हि रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time