Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तिचा संकल्प. Show all posts
Showing posts with label तिचा संकल्प. Show all posts

Sunday, December 12, 2021

तिचा संकल्प

काळ्याकुट्ट अंधारात
एक ज्योत तेवत होती
तिला पाहून मी पुन्हा नव्याने
जगायचा संकल्प केला.
शशीने दिली साथ
चांदण्यांनी केली बरसात
मला साथ द्यायला 
पुन्हा नव्याने सुरुवात करायला
नविन दिवस घेऊन
रवी ही उत्साहाने आकाशी उगवला
आपल्या सोनेरी किरणांनी
मला न्हाऊ घातले.
संकल्प तडीस न्यायचे
वचन मज कडून घेतले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time