Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label शब्द. Show all posts
Showing posts with label शब्द. Show all posts

Sunday, May 29, 2022

शब्द

शब्दांचा बाजार रोजच भरतो.
त्या शब्दांच्या बाजारात मी हरवून जाते.
किती ते शब्द किती ते अर्थ
शब्दांच्या बाजारात मुक्तछंद मांडते
मग सुटते लेखणी सुसाट
कल्पनेतील कल्पना मांडते
आजूबाजूला घडणाऱ्या घटना मांडते.
जे चालू आहे सत्य परिस्थिती ते मांडते
कोणाची व्यथा मांडते,कोणाची कथा मांडते.
कधी तरी माझंच मन मोकळं करते.
कधी माझीच स्वप्न मांडते.
असा हा शब्दांचा बाजार मांडते
त्या शब्दांच्या बाजारात मग मीच हरवून जाते.शब्द प्रामाणिक असतात म्हणून स्वतःलाच शब्दात गुंतवून घ्यायला छानच वाटत शब्दांची ना अपेक्षा असते शब्दांचा ना स्वार्थ असतो.
जसे मांडत जाऊ तसे सुंदर सुंदर शब्द सुचत जातात.असा हा शब्दांच्या बाजारात गुंतून जाते..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, May 20, 2022

शब्द

किती रे पहावी वाट
भेट तर शक्यच नाही.
शब्द हि महाग झाले का?
भास आभासच्या दुनियेत
एकदा तरी भेट ना
प्रेमाच दोन शब्द बोल ना..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, May 02, 2022

शब्द

माझ्या जीवनाची कविता झाली.
आता काय कविता करू
शब्द शब्द मांडत गेले.
शब्दातून व्यक्त होत गेले.
कल्पनेची हि मांडली कविता
जीवनाचा अर्थ जगत गेले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time