Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तुझा रुसवा. Show all posts
Showing posts with label तुझा रुसवा. Show all posts

Friday, September 24, 2021

तुझा रुसवा

तुझं ते हक्काने रुसणं
माझं ते तुझ्यात गुंतणं
किती दिवस वाट पाहायची
कधी जाणार तुझा रुसवा
सांग ना सखी
तुझा रुसवा मला छळतो ग
तुझ्या मिठीत यायला धडपडतो.
रागावली की अजूनच गोड दिसते.
फुगलेले गाल लाल झालेले नाक
असं वाटतं याव आणि तुझ्या
फुगलेल्या गालाचा फुगा फोडावा.
लाल झालेल्या नाकाचा चावा घ्या.
हळूच खाली सरकत
ओठांचे मधुर रसपान करावे.
हनुवटीवरील तीळ चोखून घ्यावा.
त्रास देऊन देऊन तुला बेजार करावं.
तुझ्या रूसवा घालून तुझ्यात पूर्ण गुंतून जावं.
  मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️ 


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time