Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label रवी. Show all posts
Showing posts with label रवी. Show all posts

Wednesday, February 23, 2022

रवी

रवी किती रे असा छळशील
तुझा तो अस्ताच्या केशरी पिवळ्या
रंगाने मनाला किती भुरळ घालशील.
किती जरी सुंदर तुझा अस्त असला.
तरी ते दुःखच आहे रे
ते तुला समजणार नाही.
तुझ्या जाण्याने माझ्या हळव्या मनाची 
काय घालमेल होते.
तुला कळणार नाही.
त्या साठी तुझ्याच सारखं
तप्त मन हवं
ना तुला तुझ्या सुंदर सकाळ घेऊन 
येण्याचा गर्व आहे.
ना सुंदर सप्तरंगची उधळण करुन
जाण्याचा गर्व आहे.
रोज ठरलेल्या वेळी येतो
ठरलेल्या वेळी जातो.
किती रे प्रामाणिक निस्वार्थी आहेस.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Monday, January 31, 2022

रवी

काळ बदलेल वर्षे ही सरतील
माणूस ही बदलला
निसर्ग सारा बदलू लागला
रवी तू मात्र आहे तसाच 
पूर्वला उगवतो
पश्चिमेला मावळतो.
रवी तुझ्या उगवतीत
मावळतीत बदल नाही झाला.
तू तुझी सप्तरंगाची प्रसन्न 
सकाळ घेऊन आनंदाने येणार
करून उधळण तुझ्या अबीर
केशरी रंगाची 
धरणी मातेला ही तू केशरी
अबीर रंगात रंगुन टाकणार
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time