अवेळी पाऊस येतो
आडोसा शोधता शोधता
तारांबळ उडते.
तेवढ्या वेळात पाऊस
चिंब भिजवून जातो.
वेडू तू ही असाच अचानक येतो.
माझी तारांबळ उडते.
तू मात्र आडोसा शोधण्यासाठी
नजर इकडे तिकडे बघतोस.
आडोसा मिळताच आवेगाने
मिठीत घेऊन प्रेमाची बरसात करून
चिंब भिजवून टाकतो.
मुक्तछंद कव्या
मेघा...✍️✍️