प्रत्येकाचे म्हणणे वेगळं
आपल्या पटत ते करावं
आपल्या मनाला विचारावं
जास्त विचारत बसलो तर
प्रत्येक जण वेगळंच सांगेल.
जो तो म्हणेल माझंच खरं
माझं कसं खरं हे संदर्भ देईल.
त्या सगळ्यांच्या विचारात
आपल्या डोक्याचा भुगा होईल
जे आपल्याला पटलं ते करावं
कोणाला संदर्भ देत बसू नये.
जग असं ही बोलत
आणि तसं ही बोलत.
लोकांना लावत बसू दे.
संदर्भ आपलं आपण
आपलं ऐटीत जगायचं
आपल्या हवं तसं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️