देवा काय अपराध केला होता.
म्हणून एवढी मोठी शिक्षा दिली.
गार हवेची झुळूक छान घेत होते.
सुखाच्या सावलीत उभी असताना.
मला दुःखाचा कडक उन्हात लोटून दिल.
परिस्थितीशी जुळवून जीवन जगले होते.
स्वाभिमानाने आयुष्य काढल होत.
अपराध माझे काय झाले.
माझे मलाच न कळले.
आता मला ते अवेळी सतावतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️