तुला कळणार नाही
माझी व्यथा माझी दशा,
तुला कळणार नाही
माझी कथा माझी स्थिती,
तुला कळणार नाही
तुझ्यासाठी नऊ महिने
मी मला कसे जपले,
तुला कळणार नाही
नऊ महिने तुला वाढवताना
मला
झालेला त्रास,
तुला कळणार नाही
तुझ्यासाठी घेतलेला श्वास,
तुला कळणार नाही
तुझ्या जन्माच्या वेळी
सोसलेल्या कळा,
तुला कळणार नाही
तुझ्यासाठी कित्येक
रात्री जागून काढल्या,
तुला कळणार नाही
तुझे लंगोट दुपटी
कितीदा बदलून धुतले,
तुला कळणार नाही
तुझ्यासाठी केलेला
हाताचा पाळणा,
तुला कळणार नाही
तुझ्या आजारपणात
कित्येकदा किती किती
वेळ तुझ्या शेजारी बसून राहिले,
तुला कळणार नाही
तू म्हणशील तुझं कर्तव्यच होत.
तुला कळणार नाही
तू वृद्धाश्रमाच्या पायरीवर
सोडून जाताना
किती वेदना माझ्या
अंतर्मनाला झाल्या असतील,
तुला कळणार नाही
आई काय असते.
तुला कळणार नाही
वृद्धाश्रम मध्ये सोडले
तरी आईच काळीज
तुला भरभरून आशिर्वाद देते.
बाळा सुखी राहा.
खूप खूप मोठा हो.
मुक्तछंद काव्या
मेघा आरबुज.✍️✍️