Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label स्वप्न पूर्ण होवो. Show all posts
Showing posts with label स्वप्न पूर्ण होवो. Show all posts

Thursday, June 02, 2022

स्वप्न पूर्ण होवो

आयुष्यातील अपूर्ण स्वप्न
काही होती त्यांच आता 
गोठोड बांधून ठेवून दिलं..
आता ती पूर्ण होणार नाही
त्यामुळे आता काहीच 
स्वप्न राहिली नाहीत..
एकच स्वप्न आता आहे
ते फक्त स्वतःला
निरोगी आयुष्य लागो
चालता बोलता
कोणाला ही भार न होता..
जीवनाचा शेवट होवो
शेवटी जाता जाता
ह्या शरीराची राख तर
होणार आहेच
ती होता जे काही
ह्या शरीरातील अवयव आहेत
ते कोणाच्या तरी होतकरू
व गरजवंताला उपयोगी येवो...
हे एक स्वप्न आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time