Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label भविष्य. Show all posts
Showing posts with label भविष्य. Show all posts

Wednesday, January 12, 2022

भविष्य

‌आपले भविष्य आपल्याच हाती
चांगल्या वाईट कर्माची फळांची
पॄष्ठावर केली जातात उत्तरे चिन्हांकित
चांगले कर्म करावे भविष्य हि होईल चांगले.
ना कोणास दुःखवावे ना कोणास लुबाडावे
मन त्यांच जाणून घेऊन मदतीचा हात पुढे करावा.
दुःखाची थोडी घेऊन काळजी
आधाराचा हात खांद्यावर ठेवावा.
प्रार्थना करुन कोणासाठी बळ त्यास
जगायला द्यावे.
या चांगल्या कर्माच्या फळांवर
आपले ही भविष्य चांगले घडते.
दुःख कोणाच्या मनास देऊन 
दुःखी त्याच मन करून
आपलं भविष्य का दुःखी करून घ्यावे.
चांगले करून चांगले वागले तर भविष्य चांगले घडते.
वाईट करून वाईट वागून मन दुखावले 
तर भविष्यात तेच पुढे येते.
चांगल्या चे फळ चांगले मिळते
वाईटा चे फळ वाईटच मिळते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, October 30, 2021

भविष्य

राणी मी भूतकाळ उकरून काढत नाही.
मग तुझ्या आठवणीचा
मलाच खूप त्रास होतो.
तुझ्या बद्दल प्रेम आहे
ते तसंच जपून ठेवलं आहे.
तू भेटली नाही तरी
तुझ्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.
त्या आठवणींवर वर्तमानात जगत आहे.
भविष्य मला माहित नाही.
तू भविष्यात एकदा तरी भेटावी
हिच इच्छा आहे.
भविष्यात झालीच कधी भेट
तर ओळख नक्कीच दाखव.
थकल्या भागल्या माझ्या जीवाला
समजून जरा घे.

मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time