Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label स्वप्न. Show all posts
Showing posts with label स्वप्न. Show all posts

Wednesday, June 08, 2022

स्वप्न

मीच माझी बॉस 
मीच माझं प्रेम
एकटा तो जीव रमतो
आपल्या वेडूत स्वप्नांच्या दुनियेत
उंचच उंच भरारी घेतो.
सरळ साध जगून घेतो.
स्वप्नांच्या दुनियेत फिरून येतो.
बॉसगिरी नाही प्रेमगिरी नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Wednesday, June 01, 2022

स्वप्न

आयुष्यात बरीच स्वप्न पाहिली होती
त्यातील बरीचशी स्वप्न
माझ्या स्वाभिमानावर व 
कर्तव्यावर पूर्ण केली..
त्याचा अभिमान आहे
पण काही स्वप्न अपूर्ण राहिली
ती तुझ्याविना अपूर्णच राहणार
ती माझ्या एकटीने पूर्ण 
नाही होणार....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Thursday, May 26, 2022

स्वप्न

प्रतिक्षा करते रे सत्यात नाही 
स्वप्नात तरी येशील का?
तुझ्या गोड मिठीत घेशील का?
माझ्या डोळ्यात तुझे स्वप्न पाहून 
काही तरी बोलशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, March 07, 2022

स्वप्न

तुटलेले स्वप्न तुटल्या गाठी
जन्मभराचे वचन देऊन
स्वप्न दाखवली होती.
अर्ध्यावर स्वप्नांचा डाव मोडून 
स्वप्न भंग करून गेलास.
तेच स्वप्नांचे तुकडे गोळा करून
पुन्हा जोडायचा प्रयत्न करत
पुन्हा जगाचं स्वप्न बघत आहे.
पण तुटलेल्या स्वप्नांना
किती ही जोडलं तरी
तडा कायमचा राहणार आहे.
ते पूर्ण होणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, January 22, 2022

स्वप्न

वेडू निशा असता तू
माझ्या सोबत असतोस.
रात्रीच्या अंधारात 
मला साथ देतोस.
स्वप्नांनातील राज्यात 
तू फिरून आणतो.
प्रभा येता कोठे रे तू जातो.
रात्रीच्या आठवणीतील साठवणीत
रवी सोबत दिवस माझा सरतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


Tuesday, December 28, 2021

स्वप्न

राणी किती ग त्रास देशील
स्वप्नात माझ्या येऊन 
किती छळशील
सत्यात ही मग मला 
तुझेच भास होतात.
आभासी या दुनियेत मग 
मी जगत जातो.
तुझ्यात मी गुंतून जातो.
तुझ्या प्रेमात मी वेडा होतो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, November 24, 2021

स्वप्न

समुद्र किनारी शांत बसावं
मनातील वादळ
एकमेकांना सांगून शांत करावं.
गार हळूवार वाऱ्याची
झुळूक शांत अनुभवावी
शंख शिंपले गोळा करून
वाळूत स्वप्नांचं घर बांधावे.
त्या स्वप्नांच्या घरात रमून जावं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
©️®️


Monday, October 11, 2021

स्वप्न

राणी तू पहाटेच्या स्वप्नात आली.
तू धुक्यात न्हालेली
तू धुक्यात गुंडाळलेली.
तू रवी किरणांच्या रंगात रंगलेली.
तू रवीच्या कोवळ्या उन्हात
चमकणारी.
तू साखर झोपत स्वप्नात
येणारी.
धुके विरत जावे
तसे राणी तू स्वप्नातून सरत जाते.
स्वप्नातून तू सरत जाते.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time