Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label जीवन. Show all posts
Showing posts with label जीवन. Show all posts

Monday, May 02, 2022

जीवन

जीवनाची आता काय कविता करु
नियतीने टाकले फासे उलटे
आता सर्व गमावले आहे.
जीवन एक पुस्तक झाले आहे
रोज एक पान पटलत आहे.
शेवटच्या पानावर मृत्यू लिहिले आहे.
शेवटचे पान येत नाही तोवर
पान पटलत जगायचे आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


जीवन

जीवनाची कविता काय लिहू
मनात येईल ते मांडलं
तर सहानुभूती मिळवते
असं बोलतात.
मन रमवण्यासाठी लिहिले.
तरी ऐकून घ्यावे लागते.
काल्पनिक मांडलं तरी विचारतात
असं घडलं का तुमच्या जीवनात
तो वेडू कोण ती राणी कोण
काय लिहावे आता
विचार करून करून डोक
फुटायची वेळ येते कधी कधी
असं वाटतं दयाव सगळं सोडून
आणि जाऊन बसावे.
त्या हिमालयात शांतपणे
नको कोणाचे ऐकून घेणे.
आणि नको कोणाला काही बोलणे.
आणि त्याच त्या प्रश्नांची उत्तरे देणे...
या सगळ्याचा कंटाळा आला आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, April 05, 2022

जीवन

रोबोटिक जग झाले तर
मानवा तू रे काय करशील
जीवन जगशील कसा
जीवनाच्या आवश्यक गोष्टीसाठी
तरी तुला काम करावं लागेल.
रोबोट वर जग चालले तर
दोन पैसे कसे रे तू कमवणार
माणूस तू तर होशील बिनकामाचा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, February 25, 2022

जीवन

राणी दुःखाचे ढग नको 
ग कुरवाळूत बसू
तुझ्या जीवनात तूच भर
इंद्रधनुष्याचे रंग
दुःखाचे धुके सारून
सुखाने जगाचे शिक ग
जगाची रीतच आहे ग
पुढे जाणाऱ्यास मागे ओढायची
तू चालत रहा पुढे 
पाऊल टाकत रहा.
जग स्वबळावर जशी लढली
झाशीची राणी लक्ष्मीबाई
सुखदुःखाला दे तू टक्कर
तुझी नौका तूच वल्लव
मग बघ कसे छान
इंद्रधनुष्य तुझ्या जीवनी फुलेल.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time