Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तमा. Show all posts
Showing posts with label तमा. Show all posts

Wednesday, December 22, 2021

तमा

राणी तू सोबत असताना
मला कसलीच तमा नव्हती.
प्रत्येक गोष्टीची तू काळजी घेत होती.
संसाराच ओझं तुझ्या मुळे
खूपच हलकं झालं होतं.
प्रत्येक नातं तू मनापासून संभाळत होती.
कोणी काही बोललं तरी
तू कधीच कोणाचा द्वेष केला नाही.
कुठलीही अडचण आली तरी 
तुझ्या कडे उपाय होता.
जादूच्या झप्पी सारखी
ती अडचण तू लगेच सोडवायची.
आता मला हे सर्व सावरणं अवघड आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time