द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती.
तिचा काय गुन्हा होता. तुझ्या सारख्या व्यसनाधीन माणसाचा संसार करत होती.
तुझ्या आई वडीलांना संभाळत होती.
व्यसनामुळे तुझं डोकं आणि मन जागेवर होत का
दुसऱ्याच्या सांगण्यावरून तू तुझं डोकं व मन तापून घेतलं होतं. तुझी बायको असूनही तुझ्या पेटलेल्या रानात तिच्या साठी करुणेला
जागा नव्हती.
तिच्या शरीराची व मनाची लक्तरे काढून
तिला आत्महत्ये साठी प्रवृत्त केले.
तुझ्या सोबत एकनिष्ठेने संसार करायच
चांगलं फळ तिला दिलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️