Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, March 31, 2022

राणी ये ग

राणी तू उद्या त्या वळणावर
येशील या आशेवर
मी पुन्हा त्यांच वळणावर
तुजसाठी उभा आहे...
एकदा ते ग त्यांचं वळणावर
जेथे आपली नजरानजर होऊन 
गालातल्या गालात तू हसायची
भेटू ग पुन्हा एकदा
तपत झालेल्या या प्रेमाला
देऊ थोडा प्रेमाचा शिडकावा.
ये ग पुन्हा परतूनी
मी तुझ्या येण्याची आस
मनी घेऊन 
उभा आहे उभा आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍️✍️©️®️


आशेची किरणे

निशा राणी स्वप्न डोळ्यात साकारुन
रोजच चंद्र ताऱ्यांची 
बरसात करत नभात येते..
रोजच रवी त्यांच्या रंगाची उधळण करत
नविन दिवस नविन आशेची
नविन किरणे घेऊन नभात येतो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


उद्याची आशा

उद्याचा रवी काहीतरी
नविन घेऊन येईल
या आशेवर आजचा 
दिवस जगत आहे.
रोजची रात्र आशेची
निराशा करून सरत आहे..
मेघा...✍️✍️©️®️


वेडू (चारोळी)

 वेडू तू भेटशील या
आशेवर जगत आहे..
प्रेम तुझ्यावर केले
  हे सत्य आहे..
मेघा...✍️✍️©️®️


आस (चारोळी)

कशाला उद्याची बात
सरू दे आजची रात...
येशील तू परतूनी आज
हिच मनाला आहे आस...
मेघा... ✍️✍️©️®️


उद्याची आशा

उद्याची आशा उद्याची आशा
किती दिवस जगायचं असं
उद्याच्या आशेवर
रोजच उद्या येतो.
पण आशेची निराशा होते.
पुन्हा उद्याचा दिवस
आपला असेल असं म्हणत
पुन्हा उद्याची वाट पाहायची
पुन्हा निराशा पदरात पडायची.
उद्याचा दिवस काही उगवत नाही.
उद्याची आशा काही पूर्ण होत नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रवी हुकुमचा एक्का

रवी या जीव सृष्टीचा 
तूच तर हुकुमचा एक्का
तुझ्या तर पहाटेच्या 
उगवणाऱ्या ने पक्ष्यांची
किलबिल सुरू होते.
माणसांची लगबग चालू होते.
तुझ्या तर मावळतीने 
पक्षी हि घरट्याकडे परतात.
माणसाची लगबग थंडावते.
जीवन सृष्टीला नवजीवन देणारा
तूच तर हुकुमचा एक्का आहेस....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वेडू तूच हुकुमी एक्का

हुकुमाचा एक्का
वेडू तूच तर आहेस
तुझ्या शिवाय कशी होईल
माझी कहाणी पूर्ण
तुच तर सोबत असतो.
तुझीच तर स्वप्न पाहते.
जीवनात मला तुझीच
तर साथ आहे.
तुझा हुकुमी एका
माझ्या जवळ आहे.
म्हणूनच तर जगायला
मला बळ येतं आहे....
मेघा...✍️✍️©️®️


विश्वास( चारोळी)

हुकुमाचा एक्या पेक्षा
राणी तू ग माझी खास....
तुझ्या ही आहे ना ग
माझ्या वर तेवढ्याच विश्वास.....
   मेघा...✍️✍️©️®️


वेडू च {चारोळी}

वेडू तू माझ्या
कल्पनेतला हुकुमी एक्का....
कितीही त्रासात असले तरी
तू आठवतो मला बरं पक्का....
मेघा...✍️✍️©️®️


माझा हुकुमी एक्का माझं पिल्लू

पिल्लू आज तुझा वाढदिवस
तुझे नाव अबीर ठेवले..
पहाटेच्या पूर्वेला उगवणाऱ्या रवी किरणाचा
केशरी रंग म्हणजे अबीर गुलाल
तेजस व अमृता त्या दोघांच्या 
जीवनात तुझ्या जन्माने
गुलालाची उधळण झाली.
मेघा आजीच लाडकं तू रे पिल्लू 😘😘
तू तर तिच्या दुधावरची 
मऊ लुसलुशीत साय
तुझं कौतुक काय वर्णू 
शब्दच नाहीत रे 
तुझ्या साठी माझ्या कडे
माझं ही आयुष्य तुला लाभो!
खूप खूप मोठा हो
आई बाबांना विसरू नकोस.
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत.
जिवनात तुला कधीच व 
काहीच कमी पडू नये.
संघर्ष तुझ्या वाट्याला हि येऊ नये.
रवीच्या किरणांचा अबीर गुलाल
जसा पूर्ण नभात पसरतो तसं
तुझं नाव पूर्ण आसमंतात दूरवर पसरू दे.
हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू 😘
अबीर यशवंत हो किर्तीवंत हो!!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बदामाची राणी

माझ्या जवळ हुकुमचा 
एक्का नसला तरी चालेल
तू तर माझी बदामाची राणी
तू जवळ असताना
सगळेच डाव मी जिंकेल
बदामाची राणी असताना
आहे का कोणाची टॉप
मला हरवायची..
एक तू माझ्या जवळ असताना
मला जीवनात काहीच कमी 
पडणार नाही...
तूच तर माझा हुकमचा एक्का
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, March 29, 2022

जादूगर

जादूगर जादू कर जाये गा
किसी को समझ नहीं आये गा
अशी जादू तू वेडू करून गेलास.
तुझ्या त्या जादूवर मी वेडी झाले.
अशी कशी रे तू जादू केली.
तुझ्या जादू मध्ये मी बंदिस्त झाले.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


चाफ्याची जादू

जादू त्या सुगंधाने केली
चाफ्याच्या फुलांची वेडी मी झाले.
दिसताच चाफ्याची फुले
मन भरून सुगंध त्यांचा हुंगते
केसांत माळून दिवसभर हिंडते.
त्या सोनेरी रंगाच्या त्या
चाफ्याच्या फुलांनी
काय जादू केली
मी तर चाफाच वेडी झाले....
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


शब्दांची जादू

शब्दच असतात जादुगार
शब्दच असतात मनातील भाव
शब्दच असतात मनातील भावना
शब्दच असतात प्रेमवीर
शब्दच असतात प्रेमभंग
शब्दच बोलतात मंजूळ स्वर
शब्दच असतात मुकेपण
तुझ्या प्रेमाच्या नादात
शब्दच हरवले
प्रेमभंगाचे दुःख कायम
सलत राहिले... 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


जादू डोळ्यांची

वेडू अशी कशी भुरळ 
तुझी पडली.
तुझ्या डोळ्यांची जादू 
बघ कशी झाली.
तुझ्या डोळ्यात पाहून
मी स्वतःला हरवून
तुझीच होऊन रे गेले.
प्रेमाची नाजूक झंकार
हृदयात बघ मग उठली.
अशी कशी रे तू
जादू केलीस...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Monday, March 28, 2022

चाफ्याचे वन

स्वप्नांचे शहर होते
चाफ्याचे वन होते.
चाफ्याच्या सुगंधीत 
गालीचा तू पसरवला होता.
त्याचा सुगंध सर्वत्र 
पसरला होता.
चाफ्याची उधळण तू
माझ्या वर करत होता.
त्या उधळणीत धुंद
मी होऊन तो आनंद
मी मनमुराद लुटत होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आनंदाचे शहर( चारोळी)

राणी स्वप्नांचे शहर 
आपण आपले वसवू या.
तू आणि मी तेथे
आनंदाने राहू या.
मेघा...✍️✍️©️®️


वेडूच गाव

वेडू स्वप्नांचे गावं होते
तेथे तुझे माझे नाव होते
तुझ्या माझ्या त्या प्रेमनगरीला
प्रेमाची नाजूक झंकार होती.
माझ्या पैंजणाची साथ होती.
तुझ्या सतारीचे धून होती.
आपले प्रेमाचे हार्टबीट होते.
रंगीन असे जीवन होते.
शेवटच्या श्वासापर्यंत जपू रे 
ते स्वप्नाच गाव आपलं....
मुक्तछंद काव्या
मेघा....✍️✍️©️®️


सुखाची दुनिया (चारोळी)

स्वप्नांच्या दुनियेत 
कसलीच चिंता नसते.
मनाचा खेळ सारा
सुखाची प्राप्ती असते.
मेघा...✍️✍️©️®️


स्वप्नांच्या दुनियेत

राणी स्वप्नांच्या दुनियेत 
तुझ्या सवेत
रंगून मी जातो...
तुझ्या सोबत झुल्यावर
रोजच मी झुलतो...
तुझ्या मिठीत रोजच
विरघळून जातो...
तुझ्या ओठांवरील तीळेत 
भिजून मी जातो...
तुझ्या सोबत बोलण्यात
गंगून मी जातो...
स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्या सवेत रंगून 
मी जातो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्वप्नांचे शहर

एक स्वप्नांचे शहर होते.
तेथे बरीच स्वप्न विकायला होती.
सुख, दुःख, आनंद, समाधान,कष्ट,मैत्री,
स्वप्नच स्वप्न होती. त्या स्वप्नांच्या शहरात
मी ही एक चक्कर मारून आले.
माझी पण बरीच स्वप्न 
त्या स्वप्नांच्या शहरात कायमची
सोडून आली.
स्वप्नांच्या शहरांपेक्षा आपलं स्वतःचं
शहर खूप चांगले हा विचार करून
सत्यात जगायला शिकले...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रित धुंद ( चारोळी)

त्या पावसाची टिपटिप
ओढ तुझी देऊन गेली.
तुझ्या ओल्या कुंतलाची
खोडकर आठवण ठेवून गेली..
  मेघा...✍️✍️©️®️


गाण्याची धुंद

ती माझ्या आवडीची गाणी
लागली की तु त्या रेडिओचा
आवाज मोठा करायचा
मी किती हि कामात असले तरी
ती गाणी मला ऐकायला लावायचा
आणि तू सुद्धा तुझ्या आवाजात
माझ्या कानाकडे म्हणायचा
ते हे गाणं
क्या खूब लगती हो!
बडी सुंदर दिखती हो
फिरसे कहो कहैते रहो
बडा अच्छा लगता है!
आणि दुसरं मराठी गाणं
ती माझी मला ऐकायला 
येणारी रिंगट्यून आहे.
रात्रीस खेळ चाले
या गुढ़ चांदण्याचा
हा चंद्र ना स्वयंभू
रवी तेज वाहतो हा
ग्रहणात चांदण्याचा
अभिशाप भोगतो हा
प्रितीस होय साक्षी 
हि दोन्ही गाणी लागली कि
मी ऐकण्यात धुंद होऊन जाते...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाची धुंद

ते तुझ्या माझ्या आवडीच गाणं
ते तु तुझ्या सुरेल आवाजात
गायचा मी धुंद होऊन जायची रे
आज हि रेडिओ वर लागलं 
तर मी धुंद होऊन जाते रे
ते गाणं ऐकण्यात 
ते जुर्म चित्रपटातील गाणं
जब कोई बात बिगड जाये
जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा
ओ हम्म नवाब ओ हम्म नवाब....
धुंद होऊन ऐकते रे ते
आपल्या दोघांच्या आवडीच गाणं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बांगड्यांची किणकिण

राणी तुझा तो बांगड्यां
जमायचा छंद
तुझी ती बांगड्यांची आवड
किती ग जमल्यास
तू ते हिरव्या लाल पिवळ्या
निळ्या रंगबेरंगी बांगड्या
आणि मॅचिंग बांगड्या
तुझी ती आवड तो छंद
प्रत्येक वेळेस ते बांगड्या बदलणे
बांगड्या बदलताना 
ती बांगड्यांची किणकिण
माझ्या कानाजवळ पण
तुझ्या त्या बांगड्यांची किणकिण
त्या तुझ्या बांगड्यांच्या किणकिणची
खूप सुंदर धून वाजते ग.
आणि मी धुंद होऊन जातो 
ती तुझ्या बांगड्यांची किणकिण ऐकण्यात
माझ्या मनाला ती तुझ्या बांगड्यांची
किणकिण स्पर्शून जाते ग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाची नाजूक झंकार

वेडू तुला पहिल्यांदा
पाहातच ती हृदयात
झालेली प्रेमाची नाजूक झंकार
कशी विसरू रे तेव्हा 
माझी काय अवस्था झाली होती.
ते आठवलं तरी तेच फिलिंग
पुन्हा पुन्हा होतं... 
ती हृदयात झालेली नाजूक झंकार
पूर्ण शरीराला ऊर्जा देऊन गेली
तोच तू तो माझा प्रियकर आणि
माझ्या प्रेमाचा शोध संपला
ती अविस्मरणीय नाजूक
प्रेमाची झंकार अजून आठवते.
जपून ठेवली आहे रे ती नाजूक झंकार....
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Saturday, March 26, 2022

प्रेम {चारोळी}

वेडू अपूर्ण राहिली प्रेम कहाणी
पूर्ण तू करशील का?
अपूर्ण या जीवनात
पूर्णतः आणशील का?
  मेघा...✍️✍️©️®️


प्रेम कहाणी

अपूर्ण प्रेम कहाणीची
जखम ओली आहे.
ठसठसत राहणारी 
जखम अजून बाकी आहे..
सल तिची टोचती आहे..
जखम उकरून काढाता
गॅंगरींन होणार आहे.
हे माहित असूनही
जखम सोलते आहे
कळतंय पण वळत नाही
अशी अवस्था आहे...
मुक्तछंद काव्या
  मेघा... ✍️✍️©️®️


मेहंदी {चारोळी}

आपली प्रेम कहाणी
अपूर्ण राहिली ग...
हळद मेहंदी लावून
तू दुसऱ्याची झाली ग...
  मेघा...✍️✍️©️®️


अपूर्ण प्रेमकहाणी

माझी अपूर्ण प्रेम कहाणी
राणी तू का ग पूर्ण नाही केली.
तेव्हा बोललो असतो दोन शब्द
तर आज आपण एकत्र असतो.
अजूनही आठवते तू मला
तुझ्या त्या चोरून पाहणाऱ्या
खट्याळ टपोऱ्या डोळ्यातील प्रेमाला
आपली अपूर्ण राहिली प्रेम कहाणी..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अपूर्ण प्रेम

माझी प्रेम कहाणी 
अपूर्ण राहिली.
अर्ध्यावरती हात सोडला.
अर्ध्यावरती संसार मोडला
सोडून अर्ध्यावरती मजला
का रे तू एकटाच इतक्या दूर गेला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, March 25, 2022

आनंदाचे रंग

रंगहीन जीवन आज 
दिवसभर खूप जगले
संध्याकाळी फिरायला गेल्यावर
रवीच्या पश्चिमेचे 
मावळतीचे लाल केशरी पिवळे
रंग पहिले आणि विचार केला.
मावळतीला जाताना पण
रवी प्रसन्नपणे रंगाची कशी 
उधळून करून जातोय.
मग मी पण आनंदी मनाने
घरी आले....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझ्या रंगात

माझ्या रंगहीन जीवनात
वेडू तू रंग भरशील का?
श्वेत या रंगात रंगीत
रंग मिसळशील का?
रंगात माझ्या काळा, 
पांढरा रंग तो मिटून
लाल, हिरवा, पिवळ्या
रंगात रंगून टाकशील का?
सांग ना वेडू रंगहीन जीवनात
रंगबेरंगी रंग भरशील का?
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


संजना रंग भर

स्वप्नात सजणा येशील का?
जीवनात रंग हि भरशील का
भरशील का?
तुझ्या जाण्याने बघ रे 
जीवन रंगहीन झाले..
मला तर रंग खूप आवडतात.
तुला माहित आहे ना
मी रंगांची टापटीप पणाची 
वेडी आहे.
बघ रे सख्या तू गेल्यापासून
मी बऱ्याच गोष्टी सोडल्या आहेत.
रंगहीन जीवन जगत आहे.
मग माझ्या स्वप्नात येऊन 
तरी रंग भर ना?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रंगीत जीवन

राणी रंगहीन जीवन
किती दिवस जगणार
जग ग आता 
तुझ्या रंगीन जगात
श्वेत रंगातून बाहेर पड.
तुझ्या त्या श्वेत रंगात मिसळून 
नविन रंग तयार करून
आनंदाचे रंग भरून घे.
सुरवंटाच फुलपाखरू होऊन
बागड ग आनंदाने...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आसू




रंगबेरंगी इस दुनिया में
और भी बहुत रंग हो गे
मेरा अब एक ही रंग हैं
मेरा जीवन कोरा कागज 
कोरा ही रह गया!
जो देखा था आसू ओ में
बह गया!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


जीवनाच सार

तू जाण्याने जीवन रंगहीन झाले.
जगाच्या दृष्टीने मी फक्त एक सापाळ आहे..
असं असतं का तो नाही म्हणून तिनं जगणं सोडायच का?
तिला त्याच्या मागे जगायचा काहीच अधिकार नाही का?
ती पण माणूस आहे.तिच्या पण काही इच्छा असतील हे कसं समजत नाही.
तिच्या वयाचा पण विचार केला जात नाही.
सगळे नियम फक्त तिलाच का?
तो नसला तरी ती त्यांचे नातेवाईक संभाळते. त्यांच्या माघारी त्यांची सर्व कर्तव्ये ती पार पडते.तो नाही तर त्यांची कर्तव्ये पण तिला नाही पाहिजे.पण अस नाही होत.
बायको गेल्यावर पुरूष करतो का तिच्या माहेरी काही कर्तव्य नाही.तो तर जाणं येणं पण कमी करतो. तुच नाही तर मी तरी कशाला जाऊ.हे असले नियम फक्त तिला त्याला वेगळे नियम अरे बायको गेली की पुरुष जगतो का रंगहीन जीवन तो तर दुसरी करून मोकळा होतो. त्याला काहीच नियम नसतात. तो बाहेर हि लगेच पडतो. तिला मात्र सव्वा महिना बाहेर पडायचं नाही.
जास्त हसा खिदळायच नाही. खालमानेन जायचं खालामानेन यायचं.हि कसली पध्दत
तिला प्रत्येक गोष्टीत नियम पावलागणिक तिचे संस्कार काढायचे.टोचून बोलणं तू स्त्री आहेस तू अशीच राहायचं त्यांच मागे असंच जगायचं असंच रंगहीन जीवन जगायचं.
म्हणूनच नको वाटतं हे राहिलेलं आयुष्य जगायला. त्यापेक्षा तुझ्या कडे आलेलं केव्हाही चांगलं.
{कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.
जे अनुभवते जे समाजात चालू आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर साॅरी 🙏🙏}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Thursday, March 24, 2022

माझा श्वास

शेवटच्या श्वासापर्यंत वेडू
जगावच लागेल...
जीवनात जीव असे पर्यंत
लढावच लागेल...
किती आली संकटे
किती बसले टोमणे 
सहन करावच लागेल...
साथ तुझी नसताना
हिंमत धरून चालावच लागेल...
दुःखाचा दगड मनावर
ठेवून हसावचं लागेल...
चाफ्याच्या फुलांनसाठी
झगडावच लागेल...
सावष्णीच लेणं सरकवताना
मनाला जळावच लागेल...
श्वास आहे म्हणून
शेवटच्या श्वासापर्यंत
जागावच लागेल...😥😥
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शेवटचा श्वास

शेवटच्या श्वासापर्यंत तू लढला रे
पण मी तुला वाजवू शकले नाही.
शेवटचा श्वास घेताता घेता
भेटून मला गेला.
तुझी शेवटची मिठी मारून 
मला गेलास..
मी मात्र वाट पाहत होते.
तू पुन्हा येशील परतून
पण नाही आलास.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेमाचा श्वास

तुझ्या प्रेमासाठी
मी तीळ तीळ तुटत आहे.
तरी शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्या आठवणीत जगेन ग
तुझ्या स्वप्नात रोजच 
मन रमवतो आहे.
देवाकडे आता रोज 
एकच प्रार्थना करतो.
माझी राणी जेथे असेल
तेथे सुखी राहू दे.
पण पुढचे सात जन्म
तुच माझी राणी असशील....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शेवटचा श्वास

आठवणीत तुझ्याच रे जगते आहे.
श्वास चालू आहे म्हणून जीवंत आहे.
बाकी संवेदना सगळ्या मेल्या आहेत.
एक एक श्वास एक एक दिवस 
रोजच मोजत आहे.
लवकरच संपू दे हे श्वास माझे
तुझ्या सोबत यायचे आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच मी राहिलं
आठवणीत सख्या तुझ्याच रे जगेन
शेवटच्या श्वास मी घेताना
देशील ना रे साथ हात हातात घेऊन
जाशील तुझ्या दुनियेत घेऊन.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, March 23, 2022

अंकुर

तुझा छोटासा अंकुर
माझ्या पोटात असताना
एक नाळ जोडून 
दोघांचाही एकत्र श्वासाचा
प्रवास आपला सुरू झाला.
तुझ्या जन्माने आई मी होऊन
स्त्रीत्व माझं पूर्ण तू केलं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


समजून घे

आईचा त्याग समजून घे 
तिच्या भावना उमजून घे.
तिला दुःख नको रे देऊ 
तिच्या काही इच्छा असतील
त्या समजून घे.
नको मिठाई नको सुकामेवा
नकोत रे तिला पैसा अडका
सोनं हिरे पैठणी घालून मिरवणे.
तिचा जवळ बस जरा
दोन शब्द प्रेमाने बोल जरा
मांडीवर डोकं ठेवून पड जरा
अरे ती आहे तो वर तिचा
त्याग समजून घे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आईची महती

आईची महती किती वर्णू
आईचा त्याग किती सांगू
शब्द ही अपुरे पडतील आई तुझे गोडवे गायला.आई जन्म तू देऊन जग दाखवलं
जगात कसं वावरायचं ते तूच तर शिकविले
आसू लपवून हसू चेहऱ्यावर कसं ठेवायचं
अर्धा पोळीतील चतकोर पोळी
दुसऱ्याला पण दयावी.
दुःख दुसऱ्याचे ऐकून साथ कशी द्यायची
हि समाजसेवा तुझ्या कडूनच शिकले.
त्यागच महत्त्व तूच तर समजावून सांगितले.
हे सर्व शिकवून पोरक करून गेलीस.
साथ तुझी आता हवी असतानाच.
एकटच टाकून निघून गेलीस.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आई

आयुष्यभर जी त्याग करते.
ती आई असते.
जन्म बाळाला देताना
ती स्वतःचा विचार कधीच करत नाही.
ती आई‌ असते.
दुध बाळा पाजताना
ती स्वतःकडे स्वतःच्या
सौंदर्यकडे  हि दुर्लक्ष करते
ती आई असते.
ती आपल्या बाळासाठी
दिवस रात्र एक करते.
आपल्या लेकीला माहेर मिळावं
म्हणून ती सासरी नांदते.
आई बद्दल लिखाणाला
शब्द ही अपुरे पडतील...
अशी हि आई त्यागाची मूर्ती असते...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शांत मी

समुद्राच्या शांततेत हरवले
मी स्वतःला सख्या
या जगापासून लांब केले
मीच मला स्वतःला
नको ती बंधने नको तो 
विधवेचा मिळालेला अपमान
नको ती नजर आणि नको 
ते इच्छा मारून जगणे..
त्यासाठी मी माझी 
एकटीच सामाजिक कार्य करत
मला हवी तशी हसत खेळत जगेल...
मुक्तछंद काव्या 
  मेघा...✍️✍️©️®️


चल ना जाऊ समुद्र किनारी

त्या शांत समुद्रकिनाऱ्यावर
राणी चल जाऊ या ना
तो अस्ताचा रवी पाहू या
त्या नभातल्या शशीच 
समुद्रात पडलेलं प्रतिबिंब पाहू.
ती समुद्रावर चांदण्याची रांगोळी बघू.
त्या लाटांची अवखळ वाऱ्या सोबत
चाललेली मस्ती पाहू.
त्या किनाऱ्यावर धडकणाऱ्या
लाटांची जुगलबंदी पाहू.
शांत त्या वातावरणात 
समुद्राची गाज ऐकू.
चल ना राणी जाऊ समुद्र किनारी....
मुक्तछंद काव्या
‌मेघा... ✍️✍️©️®️


हरवले मी {चारोळी}

समुद्राच्या शांततेत हरवले मी...
तुझ्या आठवणीत रमले मी
तुझ्या विचारांच्या चक्रात अडकले मी...
तुझ्या स्वप्नात दंगले मी...
मेघा...✍️✍️©️®️


शांत समुद्र किनारा

तो शांत समुद्र ती लाटांची गाज
तो नभात रंगाची उधळण करत
अस्ताला निघालेला रवी
त्यांचे ते समुद्रावर पडलेले प्रतिबिंब
जसे काही तो समुद्रात विलीन होत आहे..
ती मऊ वाळू त्यांत शांत पडलेले
शंख शिंपले आणि ती लाटांची ये जा
आपण दोघेच शांतपणे आपल्या
विचारांच्या तंद्रीत हरवलेले.
किती सुंदर आल्हाददायक ते वातावरण
असे वाटते तेथेच त्या शांत वातावरणात
तुझ्या कुशीत शेवटचा श्वास घ्यावा.
व या मोहमाया रंग बदलणाऱ्या
स्वार्थी अप्पलपोटी जगापासून
कायमचे दूर व्हावे...

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Monday, March 21, 2022

चेहरा लपून

सरड्या सारखे रंग बदलतात
लोक जगात पावलोपावली
क्षणोक्षणी कसे जमते
एक चेहरा लपवून
दुसरा चेहरा पांघरायला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रंग

ये रंग बदलती दुनिया या में
चेहरे हजार मिलते हैं!
एक चेहरा ढ़ककर
नया चेहरा लेते हैं!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


लपलेला चेहरा

लपलेले चेहरे कधी तरी बाहेर येतात
खरं काय खोटं काय नक्कीच समजते.
किती जरी सभ्यतेचा बुरखा घातला तरी
एक दिवस सत्य बाहेर पडते
सभ्यतेचा बुरखा गळून पडतोच.
वाघाच कातडं पांघरली तरी वाघ होता येत नाही.
वाघासारखे वागायला त्यांने कोठे जमते.
म्हणूनच लपलेले चेहरे एक दिवस बाहेर येतातच...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


दोन चेहरे

दुःखी चेहरा लपून
हसरा चेहरा घेऊन वावरायला
मनावर दगड ठेवावं लागतं.
डोळ्यातील आसू लपवून
हसाव लागतं.आनंदी आहे.
हे दाखवावे लागते.
मनातील दुःख मनातच ठेवून 
आतल्या आत रडाव लागतं.
दोन चेहरे घेऊन वावरावं लागतं.
दुःखी एक चेहरा लपून 
आनंदी चेहऱ्याचा मुखवटा 
चढवावा लागतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


धुसरं आयुष्य

काचे सारख हृदय 💓
माझं तोडून तू गेला
कसं काहीच नाही वाटलं रे...
प्राण तुला सोडताना
काचे सारखं हे जग सारं 
गुळगुळीत ना भावनेची कदर
ना स्त्रीत्वाची किंमत
तुझ्या नसण्याने येथे समाजाचे
आहेत खूपचं नियम
माझ्या मध्मम वयाचा हि
विचार केला जात नाही.
नियमात बसवून मला
प्रौढपणाचा साखळदंड 
गळ्यात माझ्या अडकतात.
हे नको ते नको असं नाही तसं नाही
तुला आता कसं कळत नाही.
काचेचे सारखे प्लेन आयुष्य
आता तुला जगायचं आहे.
तुझ्या नसण्याने रे
आयुष्य धुसर झाले...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मुक्त {चारोळी}

काचेच मन माझं... 
नियतीने बघ ना कसं मोडल...
तुला मुक्त करून...
बंधनात मला ओढलं...
  मेघा... ✍️✍️©️®️


घाव {चारोळी}

काचेच हे जग सारे
सोडून त्याला गेलास..
मुक्त तू रे झाला
माझ्या मनी घाव ठेवून गेलास..
मेघा...✍️✍️©️®️


काचेचा तुकडा

तुझ्या आठवणींचा एक एक काचेचा तुकडा जपून ठेवला रे.टोचतो खूप काळजाला.
कधी कधी आठवणीत काळजाला रक्तबंबाळ करतो..
पण जपून ठेवलीत रे तुझी ती दुपटी, 
तुझी ती झबली टोपडी,तुझी ती कुंची, 
तुझे वाळे काही घुंगरू विखुरले त्यातील 
काही गेले दूर तुझ्या सारखेच
तर काही असून जवळ मुके झालेत..
तुमच्या सारखेच तडकली नाती दूर झाली 
माया ममता प्रेम ही काचेचे सारखे निखळले
किती लावला पारा किती ही पुसली काच
तरी नाही त्याला आता चकाकी
गेली बघ दूरवर सोडून.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्त्रीचं स्त्रीत्व

काचे सारख स्त्री तुझे शील संभाळून राहावे लागते ग तुला पावलागणिक
स्त्रीला तिच स्त्रीत्व तिलाच सांभाळावे  लागते. नाही तर काचे सारख तडा पटकन जातो. कारण या पृथ्वीतलावर बरेच आहेत
राक्षसी वृत्तीचे हातात घेऊन फिरतात
असतात दगडगोटे.
सुंदर पारदर्शक गुळगुळीत स्त्री दिसली की
झालीच यांची सुरुवात कमेंट्स करायच.
आवडलीच एखादी तर वासना यांची
उफाळते. वय काळ वेळ गरीब श्रीमंत काहीच न बघता तिला होत्याचं नव्हत करायचं.तिचा स्त्रीत्वाचा चुराडा करायचं
जपून ठेवलेलं शील तिचं त्याला तोडून मोकळं व्हायचं.
म्हणून म्हणते काचेचं सारखी स्त्री जप ग तुझं अस्तित्व तुच.या नराधमान पासून राहा कायम दूर.
{कोणाच्या ही भावना दुखावण्याचा हेतू नाही.कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर साॅरी 🙏🙏🙏 जे चालू आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे.}

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, March 19, 2022

माझी राणी

राणी अविश्वसनीय सत्य आहे.
प्रेम फक्त तुझ्या वर केलं.
तुलाच तर आपलं मानून
राणी आयुष्य तुलाच वाहिलं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझ्या हृदयात

सगळे म्हणतात तू नाही तू गेला
सख्या तू आहेस माझ्याच जवळ
माझ्या हृदयात जपून ठेवला आहे.
तू कोठे जाऊच शकत नाही
मला माहित आहे..
पावलागणिक तुला माझीच
तर साथ लागते.
माझ्या शिवाय तू जगू शकत नाही.
मला माहित आहे.
म्हणून तर तू माझ्या हृदयात आहेस...
तू माझ्या हृदयात बसून
मला साथ देतोस..
माझं मन रडत असतं
तेव्हा तूच तर पुसून घेतो.
किती किती समजावतो 
माझ्या त्या मनाला.
तू गेला नाही
तू माझ्या हृदयात आहेस...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


राणी माझ्या हृदयात

राणी तू माझ्या हृदयात आहेस
जपून ठेवलं ग तुला माझ्या हृदयात
आठवण येता भेटून घेतो तुला
तासनतास गप्पा मारतो.
गप्पांच्या ओघात सगळंच 
सांगून टाकतो..
ऐकून घेतेस तू शांतपणे
खुदकन हसून साथ देतेस.
लबाड तू खूपचं ग
हृदयात माझ्या राहून 
सगळं माझं ऐकते
छान सल्ला हि देतेस.
अडीअडचणीला विचारले काही
तर उत्तर तुझ्या कडे असतेच असते
म्हणूनच ग तुला जपून ठेवली हृदयात..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, March 18, 2022

हरवले

राणी तुझा चंद्राचा मुखडा 
का कोमजला...
टवटवीत पणाचा बहर 
का ग ओसरला...
गुलाबी तुझ्या ओठावरील हास्य 
का ग हरवलं...
हनुवटी वरचा काळा तीळ तुझा 
का ग फिका पडला...
गालावरच्या खळीतील तुझ्या 
खोडकर पणा कोठे ग गेला...
डोळ्यातील चमक तुझ्या 
का ग हरवून गेली...
प्रसन्नतेचा तुझा उत्साह
कोठे ग लोपला...
माझ्या राणीच्या चंद्राचा 
मुखडा कोठे ग हरवला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वेडू तू हरवला

असा कसा रे वेडू तू हरवला.
किती किती शोधते तुला
तू मला न गवसला...
कोठे कोठे शोधू तुला
थकले रे आता माझे नयन
विचारांनी झाली माझ्या
मेंदूची हि चाळण...
देह ही झिजतो आहे
आता झाली पन्नाशी
उरले सुरले आयुष्य किती
भेटशील का रे आता तरी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


चंद्र हरवतो

रवी नभात येता
चंद्र माझा हरवतो..
रवीच्या उजेडात
चंद्र कोठे गायब होतो..
मी मग वाट पाहते 
रवी मावळायची
रवी मावळतीला जाता जाता
रंगाची उधळण करुन
हळूच हसून सांगून जातो.
तुझा चंद्र बघ तुला भेटायला येतो आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


हरवलेला चंद्र { चारोळी}




हरवलेला चंद्र खिडकीतून डोकावतो
मला बघून हळूच हसतो...
सुख दुःखाचे दोन शब्द बोलतो
कशी आहेस विचारत असतो...
मेघा...✍️✍️©️®️


चंद्राची चांदणी

हरवला माझा चंद्र
हि शुक्राची चांदणी 
एकटीच राहिली
शोधत होती त्याला घरभर
तो काही सापडत नाही..
कोठे दडून बसला
काही केला सापडेना..
शोधून शोधून शुक्राची चांदणी थकली
विचार करत एकटीच बसली.
शुक्राच्या चांदणीच तेज कमी झालं.
हिरमुसून चांदणी गप झाली...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्वतःसाठी

स्वतःसाठीचा एक दिवस
मी तुझ्या सोबत असेन..
तू ही माझा सोबती असशील ना
आपण दोघेच असू..
तू मिस मला करत असशील
मी समजू शकते रे..
मी ही खूप मिस करते तुला
सोबत तुझ्या यायला हवं होतं रे..
मी शेवटचा श्वास घेताना 
तू साथ मला देशील ना...
हात माझा हाती घेऊन
अलगद उचलून नेशील ना..
सरणावर माझं शरीर जळताना 
माझ्या सोबत तू ही उभा असशील ना...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझा दिवस

स्वतःसाठी एक दिवस हवा आहे.
फुलपाखरं सारखं स्वच्छंद 
चाफ्याच्या फुलांवर रुंजी घालायला..
चाफ्याच्या फुलांची उधळण करून घ्यायला..
दिवसभर आईस्क्रीम वर जगण्यासाठी..
विंडोज शाॅपी करण्यासाठी..
मैत्रीणी सोबत मनसोक्त गप्पा मारायला...
मनसोक्त भटकायला...
शांत वातावरणात तल्लीन होऊन
वाऱ्यांचे सूर ऐकायला..
चंद्राच्या शीतल छायेत चांदण्यांच्या
दुधाळ उजेडात मोकळ्या नभात
तारे मोजायला..
शांत ठिकाणी बसून 
रवीचा सूर्योदय व सूर्यास्त पाहायला..
कसली जबाबदारी नको 
कसलं टेंशन नको..
हे सर्व स्वतःसाठी करण्यासाठी
एक दिवस हवा आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


पुरुषांना हि हवा एक दिवस

पुरुषांना ही हवा एक दिवस
खिशाला चाट न पडता 
बायको सोबत खरेदीला जायचा.
सुट्टीच्या दिवशी निवांत लोळायला.
सुट्टीच्या दिवशी निवांत बसता
कशाचीच मागणी न करता 
सर्व गोष्टी बायकोने हातात
आणून द्यावे.
मस्त पुरुषांच्या आवडीच्या बेत
घरच्या महिला मंडळांनी आखावा.
मित्रांसोबत गावभर हिंडायला..
सरप्राइज गिफ्ट मिळायला..
मेव्हणी सोबत निवांत गप्पा मारायला.
मैत्री सोबत फोनवर बोलायला..
असावा ना असा ही दिवस पुरुष मंडळीन साठी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


गृहिणी

स्वतःसाठी एक दिवस 
असं कधी असतं का?
घरच्या गृहिणी साठी असा 
कधी दिवस मिळतो का?
रोजच पहाटे दिवस 
तिचा सुरु होतो.
रात्री सर्व झोपल्यावर
दिवस तिचा संपतो.
एक दिवस स्वतःसाठी कधी
तिला मिळतो का?
सणवार व्रतवैकल्ये
रोजच असतं काही तरी
कधी मुलांचं आजारपण तर 
कधी सासू सासऱ्याच आजार पण
कधी पाहुणे कधी तर कधी काही 
मुलांचा अभ्यास कधी प्रोजेक्ट
नवऱ्याला मदत करणे
त्यांची मर्जी संभाळणे.
सुरु असते रोजच तिची धडपड
स्वतःसाठी वेळ कधी तिला मिळतो का?
करा जरा विचार तिच्या ही मनाचा
तिला एक दिवस तरी द्या स्वतःसाठी
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सत्य असत्य

सत्यावर नसतो विश्वास
असत्य मात्र गावभर हिंडत
सत्य समजून घे रे माणसा
असत्याची करू नकोस साथ
असत्यावर किती दिवस माज करशील
सत्य लपत नाही रे माणसा
सत्य सत्यच असतं ते ताठ मानेने
बाहेर येतच.
सत्याला मरण नसतं.
सत्य कधीच घाबरत नसतं.
असत्य घाबरून जगत
असत्याला कायम मरण असतं.
सत्याच हसू कायम स्वरुपी टिकतं.
असत्याच हसू क्षणभर टिकत.
माणसात जरी असत्याचा विजय झाला.
तरी देवाघरी सत्याचा न्याय होतोच.
सत्याला मरण नाही.
हे लक्षात ठेव रे माणसा 

मुक्तछंद काव्या


मेघा...✍️✍️©️®️


Thursday, March 17, 2022

राणी

राणी अविश्वसनीय सत्य आहे.
प्रेम फक्त तुझ्या वर केलं.
तुलाच तर आपलं मानून
राणी आयुष्य तुलाच वाहिलं..
मेघा...✍️✍️©️®️


सत्य

सत्य काय असतं
सत्य ते असं एक गुपित असतं.
ते कोणाला माहित असतं
ते फक्त आपल्या मनाला माहित असतं.
सत्य कोठे राहत
ते माणसाच्या हृदयात मनाच्या
तळ्यात राहतं.
सत्याला वाच्या असते
हो सत्याला वाच्या असते.
पण माणूस नावाचा प्राणी
बहिरा झालेला असतो.
त्यामुळे सत्याच बोलणं ऐकू येत नसत.
मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, March 15, 2022

यशस्वी होण्यासाठी

यशस्वी होण्यासाठी
एक एक पायरी चढावी लागते.
एक पायरी कष्टाची,
एक पायरी दुःखाची,
एक पायरी अपमानाची,
एक पायरी संकटाची,
एक पायरी मागे खेचणऱ्याची,
एक पायरी स्वाभिमानाची,
ह्या एक एक पायरी चढताना
त्रास खूप होतो.
बोल खूप बोलले जातात.
पण लक्ष न देता.
मन न डगमगता धैर्याने
पायरी चढायची तर
तुम्हाला यशस्वी जीवनापासून
कोणीच रोखू शकणार नाही..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


यशस्वी

यशस्वी जीवनासाठी ध्येय एकदा ठरवायचं
ते ध्येय ठरवले की काहीही झालं तरी मागे 
हटायचे नाही.
कष्टाला लाजायचे नाही, कोणीची सहानुभूती मिळवायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही,
स्वाभिमान सोडायचा नाही.
यशस्वी होण्यासाठी जो मार्ग अवलंबला आहे. तो किती ही संकटे खाच खळगे येवोत
मार्ग काढत चालत राहायचं.
एकदा का मनाला आणि बुद्धीला सांगितले
मला यशस्वी व्हायचे आहे.
त्यासाठी माझ्या मनाची आणि बुद्धीची व कष्ट करण्याची तयारी आहे.तर मग तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही.
मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मन बुद्धी तयार होत नाही.
जे ध्येय आहे त्या ध्येयावर सहज जात येत.
मग तुम्ही नक्कीच यशस्वी होता.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️®️©️


Monday, March 14, 2022

प्रेमाची डायरी

वेडू मनाच्या कप्प्यात
जपून ठेवली रे आपल्या 
प्रेमाची अपूर्ण डायरी
कधी तू भेटला तर पुर्ण करु
आपण दोघे मिळून ती डायरी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अपूर्ण डायरी

माझी डायरी अपूर्ण राहिली.
सख्या पूर्ण करण्यासाठी
तुझी सोबतच नाही राहिली..
डायरीच्या प्रत्येक ओळीवर
फक्त तुझंच नाव लिहिते आहे..
बैजू बैजू करत तुझ्या
नावाच्या ओळी मांडते आहे.
तरी ती पूर्ण होणार नाही.
माझ्या सोबत येताना.
डायरी घेऊन येईल
तुला दाखवल्या .
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मनाची डायरी

तुझ्या आठवणीत मनाची
डायरी रोजच चाळते 
चाळून चाळून आता डायरीची 
पाने जीर्ण होत आली आहेत.
एकेक पान हळूच पालटते.
माझ्या जीवात जीव असे
पर्यंत जपून ठेवायची 
ती डायरी तिचीच तर साथ
फक्त आता आहे.
जीर्ण पाने ही मला साथ देतात.
तुझ्या आठवणीत 
ती पाने ही रोज रडतात रे.
रडून मग माझ्या 
मनाला ओलंचिंब करतात...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बंद डायरी

अपूर्ण राहिले प्रेम
अपूर्ण राहिली डायरी
अपूर्ण या आयुष्यात
स्वप्न ही राहिले अपूर्ण
अपूर्ण अशा मनाला
पूर्णतः बंद केले आहे.
डायरी ही केली कायमची बंद.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अपूर्ण डायरी

तुझी सोबत सुटता.
माझी डायरी अपूर्ण राहिली.
कोरी पाने बरीच शिल्लक राहिली.
लिहू काय त्यावर पाने फक्त फडफडतात.
वाक्याना शृंगार करायला शब्द ही रुसले.
लेखणी ही अबोल झाली.
मनाचे खेळच सारे संपले.
अपूर्ण डायरी फक्त कुरवाळत असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


चाफ्याचा‌ रंग

राणी बघ सखे
चाफ्याची फुले बघून
तुझ्या चेहऱ्यावर कसा
छान चाफ्याच्या सोनेरी
रंग पसरला आहे.
कसा छान चेहरा
तुझा चाफ्या सारखा
टवटवीत दिसतो आहे.
चाफ्याची फुले
तुझ्या जीवनात 
आनंदाचे रंग भरत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रंग आनंदाचे

रंग आनंदाचे भरलेच नाही.
सुखाची सावली धरलीच नाही.
समाधानात आनंदाचे रंग 
मानूनच घेते.
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍️✍️©️®️


माझ्या रंगात

माझ्या रंगात रंगुन बेधुंद होऊन
सखी सजणी रंग आनंदाचे
भरशील का?
प्रेमाचा तुझा तो गुलाबी रंग देऊन 
ओठांवरती माझ्या तू हसू 
आणशील का?
प्रेमाच्या तुझ्या रंगात रंगुन
मला तू माझी होशील का?
खेळ रंगाचा खेळून ग
खेळून खेळून दमून भागून
माझ्याच मिठीत निजशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अबीर गुलाल

रवीने रंग पूर्वीला उधळले.
नभाला रंगून रंगात
मेघाला ही लाजवले.
अबीर गुलाल देऊन रंग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रंग

रंग आनंदाचे भरून जा.
रंग स्वप्नांचे जोडून जा.
रंग सुवासाचे खोलून जा.
रंग सौख्याचे देऊन जा.
रंग चाफ्याचे उधळून जा.
रंग मनाचे भरून जा.
रंग तुझ्या मिठीचे देऊन.
तुझ्या रंगात रंगून 
तुझ्या सोबत घेऊन जा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रंग

जीवनात आपल्या रे
रंग आनंदाचे भरायचे होते.
पण तू तर माझ्या मुठीतील
रंग उधळून बेरंग करून गेला.
आता कसे रे भरू परत
रंग आनंदाचे क्षण ते सुखाचे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, March 12, 2022

ताऱ्यांच्या शहरात

चल ग राणी जाऊ 
ताऱ्यांच्या शहरात घेईन ग
तुला चांदण्याची साडी 
चंद्राच्या कोर तू कपाळी लाव.
चाफ्याची वेणी तू केसात माळ
चंद्राच्या रथात बसून
जोडीने जाऊ
लखलखत्या शहारात
जीवनाची मजा ग करू थोडी
रोजच आहे ग 
रांधा वाढा उष्टी काढा.
आज तुला घडवतो सफर ताऱ्यांची.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बरसात

वेडू ताऱ्यांचे शहर नको
चांदण्याची बरसात नको..
तुझी आठवण आल्यावर
साथ मला दयायला
रुसवा माझा घालवायला.
वेडू तू येशील ना.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


प्रेम गीत

ताऱ्यांच्या शहरात
तुझ्या सवेत घेऊन चल
चांदण्याची बरसात कर
चंद्राच्या रथात बसून
प्रेमाचे गीत गाऊ रे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तारा

ताऱ्यांच्या शहरात जाऊन बसला
एक तारा होऊन बसला.
नभातून रोज मला पाहतोस
रोजच लुकलुकत असतो.
जवळ काही येत नाही.
लांबूनच स्मित हास्य करतो.
मेघा...✍️✍️©️®️


ताऱ्यांचे शहर

रवी नुकताच क्षितिजापार गेला होता.
आकाशात चंद्र तारे येऊ लागले होते.
आपण ही लवकरच त्या तारांच्या
शहरात पोहत होतो.
आपण पोहचे पर्यंत आकाश
शहर पूर्ण ताराऱ्यांनी भरून गेले.
आणि तुझी मिठी अलगदच 
घट्ट होऊ लागली.
आशा सुंदर तारांच्या शहरात
तू आणि मीच फक्त होतो.
एकमेकांत गुंग होऊन गेलेलो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, March 11, 2022

रहस्यमय बॉक्स {लघुकथा}

तिच्या दाराच्या बाहेर कोणीतरी रहस्यमय बॉक्स ठेवून गेल होत.काय असेल त्यात ती विचार करतच तिचे दोन तास गेले.
घेऊ का नको असा विचार करतच ती दारात उभी राहिले.त्यातच तिचा फोन वाजला.तो नंबर ही ओळखीचा नव्हता.
येथे बॉक्स तेथे फोनची रिंग तिला काहीच कळलेना.बॉक्स घेऊ का फोन घेऊ 
फोन घेऊ का बॉक्स घेऊ असं करत तिने
शेवटी फोन घेतला.

हॅलो म्हणाली तिकडून ही हाय असा रिप्लाय आवाज आला. तो आवाज ही ओळखीचा नव्हता.तो म्हणाला अरे अशी काय गोंधळी आहेस.त्या बॉक्स कडे बघत नको बसू.
तो बॉक्स उचल घरात घेऊन जा.
बघ त्यात काय आहे.त्याच्या बोलण्याने ती येथे पाहायला लागली. हं तर मला शोधते आहे का? ती विचार करते मला का तो दिसत नाही. मी त्याला दिसते.
तो अग आश्चर्यचकित नको होऊ.
माझा शोध घेऊ नकोस.तो बाॅक्स घे ग लवकर घरात.
आज तुझा वाढदिवसाच आहे ना
त्यात तुझ्या आवडीच गिफ्ट आहे.
जा लवकर उघडून बघ तरी काय आहे.
लवकर घेतलं नाही तर कोमजेल ग 
तुझ ते गिफ्ट ती एका क्षणांत तो बॉक्स
घरात घेतला.व वेळ वाया न घालवता..  
तो बॉक्स उघडून पाहते तर काय ती हरखून जाते. टपोऱ्या चाफ्यांनी भरलेली सुंदर परडी होती. तिला खूप खूप आनंद झाला.
तिने लगेच त्याला रिप्लाय दिला.
माझा वाढदिवस लक्षात ठेवून माझ्या आवडीच गिफ्ट मला दिले.
शब्दच कमी पडतील रे तुझं कौतुक करायला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुझं मन

राणी तुझं मन काही कळत नाही.
किती रहस्यांनी भरून ठेवल आहेस
तुझा तो मनाचा बॉक्स
एकदा उघडून दाखल तरी
तुझ्या त्या बॉक्स मध्ये किती
गुपित लपलेले आहेत समजतील
मला तर तुझं मन जानताच येत नाही.
रहस्यमय तुझ्या मनात कसं शिरायचं
त्यांची चावीच सापडत नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


जीवन रहस्य

रहस्यमय जीवन येथे सर्वांचे
जो आपल्या रहस्यात अडकलेला.
तो काय सोडविणार दुसऱ्यांचे रहस्य
स्वतःच रहस्यमयच जीवन त्यांचं त्यालाच
कळत नाही.
तो काय वाहणार दुसऱ्याच रहस्य
ज्यांनी त्यांनी आपले रहस्य आपले दुःख
असलेला बॉक्स आपल्या जवळच ठेवावा.उगीच प्रदर्शन करू नये.व आपलं रहस्यमयच बॉक्स व जीवन कोणाकडे उघड करू हस्याला व  चर्चाला वाव देऊ नये.. 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रहस्यमय मन

माझं मन रहस्यांनी 
भरलेला बॉक्स आहे.
किती तरी रहस्य माझ्या
मनात दडून बसले आहेत.
एकटीच बसले असता.
उघडून बघत कधीतरी
रहस्यमय मन माझ
त्या रहस्यमय मनातील
कोडं,भावना, विचार
सोडून बघायचा बराच 
प्रयत्न करते.
सोडेल तेवढी सोडवते.
बाकीचा बॉक्स पुन्हा
तळ्यात ठेवून टाकते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️✍️©️®️


Thursday, March 10, 2022

वादळ

खूप वादळ झेलली
खूप वादळ पेलली
सर्व वादळे शमवत 
वादळतून बाहेर पडून
सर्व वादळ शांत करून
किनार्यावर निवांत बसलो होतो.
पण परत मला एकटीलाच 
पुन्हा घोंघावत्या वादळात सोडून 
निघून गेला ना एकटाच.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


गोड वादळ

तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं
मनातील वादळं एकदम शांत होते.
वारा ही मग हळूच शील घालून 
कानाला स्पर्शून तुझंच गोड 
गीत गाऊन जातो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुझी मिठी

सखे तुझ्या मिठीत येता.
मनातील वादळ शमते .
तुझ्या मिठीची काय 
कशी जादू आहे.
मला माहित नाही.
पण वादळ मात्र शांत होते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


वादळ

वादळ वारे आले
शांत चाललेल्या आयुष्याची
वाट लावून गेले.
विस्कटून घडी पसारा 
माझ्या आयुष्यात करून गेले.
माझ्या सुखाच्या स्वप्नाची
व्याख्या बदलून गेले.
मला जीवनाच्या वाटेवर
वादळात सोडून गेले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुझा सुगंध

राणी तुझा तो 
अविस्मरणीय सुगंध
तुझ्या त्या मेहंदीचा
तुझ्या त्या पहिल्या भेटीचा 
तुझ्या त्या पहिल्या मिठीचा
तुझ्या त्या हळदीचा
तुझ्या त्या लाजण्याचा
तुझ्या त्या लाजून पाहण्याचा
तुझ्या त्या लिपस्टिकचा
तुझ्या त्या चाफ्याच्या परफ्यूमचा
तुझ्या त्या पाहिलेल्या स्वप्नांच्या
मी बाबा होणार ह्या गोड बातमीचा
असे अगणित अविस्मरणीय सुगंध
मी जपून ठेवलेत ग राणी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सुगंधाचा माग

सुगंध तो तुझा अविस्मरणीय
त्या तुझ्या सुगंधाचा 
मी शोध घेतला ग राणी
त्या सुगंधाच्या मागावर
तो सुगंध घेऊन जाईल
तेथे तेथे तसे तसे
वाट वाकडी करत 
वळणे घेत खूप चाललो ग
पण आता खूप दमलो ग
तू तर मिळाली नाही.
पण तो सुगंध घेऊन
दमून भागून शांतपणे
अस्ताला बसलो आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


परफ्यूमचा सुगंध

वेडू तू तो परफ्यूम मारायचा   
त्यांचा तो अविस्मरणीय सुगंध
माझ्या मनाला वेड लावायचा
मला खूपच आवडायचा 
तो तुझ्या परफ्यूमचा सुगंध
तू जेव्हा मला तुझ्या मिठीत घ्यायचा
तेव्हा मी तुझ्या मिठी सोबत
तो अविस्मरणीय सुगंधही 
माझ्या मनात साठवून ठेवायची.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अविस्मरणीय भेट




तू आयुष्यात आला
एक अविस्मरणीय सुगंध घेऊन
माझ्या जगण्यासाठी दरवळला
भेटीचा अविस्मरणीय सुगंध देऊन
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍️✍️©️®️


चाफ्याच्या सुगंध

चाफ्याचा सुगंध दरवळत होता.
तू आल्याचा भास जाणवत होता.
पाठीमागून हळूच येऊन 
ती चाफ्याची ओंजळ
तू माझ्यावर रिती केली.
तो चाफ्याचा अविस्मरणीय सुगंध
व तुझी ती ओंजळ रिती करत
मारलेली अविस्मरणीय मिठी
जपून ठेवली आहे.
अजून ही मनाच्या कप्प्यात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, March 08, 2022

तू आहेस म्हणूनचं मी आहे

तू आहेस म्हणून मी आहे.
तू आहेस म्हणूनचं घराला घरपण आहे.
तू आहेस म्हणूनचं संस्काराची शिदोरी आहे
तू आहेस म्हणूनचं मी बिनधास्त आहे..
तू आहेस म्हणूनचं निसर्ग चक्र आहे..
तू स्त्री असूनही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहेस.तू स्त्री असूनही 
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेस..
तुझा आधार, तुझा सल्ला, तुझी मदत,
खरंच मी भाग्यवान आहे..
सलाम तुझ्या कर्तत्वाला, तुझ्या स्त्रीत्वाला.
अशीच गगनभरारी घे...
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🍫
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


महिला दिन

महिलदिन महिलादिन 
एकदिवस तिचं कौतुक करायचं.
एकदिवस तिचा सोहळा करायचा.
एकदिवस तिचं गुणगान गायच
एकदिवस मानसन्मान करायचं.
आणि तीनशे चौसष्ट दिवसांत
एकदिवस तिच्यावर बलात्कार करायचं.
एकदिवस तिच्यावर अॅसिड हल्ला करायचं.
एकदिवस तिला गर्भातच चिरडून टाकायचं
एकदिवस तिचा संशयावरून बळी घ्यायचा.
एकदिवस तिचा छळछळ छळ करायचा.
एकदिवस तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करायचे.
एकदिवस तिच्या भावभावनांची होळी करायची आणि पुन्हा तीनशे पासष्ट दिवसातील
एकदिवस तिचा सन्मान करायचा
हा कसला महिलादिन
त्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस तिला मान द्या
मनाने बोला तोच तिचा महिलादिन...
मुक्तछंद काव्या
     मेघा...✍️✍️©️®️


स्त्री

स्त्री चे अस्तित्व
ती एक आई, मुलगी, बायको, 
मैत्रीण ,सून, सासू विविध रुपे तिची
ती एक सालस समृद्ध
ती एक शांतादुर्गा
ती एक समजूत दार
ती एक सोशिकता
ती एक रणरागिणी
ती आहे म्हणून निसर्ग चक्र चालू आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आस्तिक {चारोळी}

देवाला ही  विचार करावा लागला होता....
स्त्री निर्माण करताना...
तर तुझ्यासाठी न सुटणारे कोडंच...
अस्तित्व तिचे जाणता...
  मेघा...✍️✍️©️®️



तुझं अस्तित्व

स्त्री जप तू तुझे अस्तित्व
जप ग तू स्वतःला
जप तुझ्यातल्या स्त्रीत्वाला
तुझा स्वभाव माया, ममतेचा,
भोळ्या भाबड्या,
वृत्तीचा चांगुलपणाचा. 
पण हे पुरुषी जग तसं नाही ग
चांगुलपणाच्या या जगात
बहुरुपी बरेच आहेत.
गोड बोलून राक्षसी वृत्तीचा
सुळसुळाट फार आहे.
तू स्वतःच खंबीर हो.
तू स्वतःच दुर्गा चंडिका हो.
जप ग तू तुझं अस्तित्व...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Monday, March 07, 2022

लपंडाव

लपाछपीचा डाव 
तू जीवनाच्या कातरवेळी खेळला
मला राज्य घ्यायला लावून
तू कायमचा लपला.
धप्पाही देऊ शकत नाही.
कारण जबाबदारी पुष्कळ आहे.
पण थांब थोडे दिवस
पिल्लू आपलं थोड 
मोठं झालं ना की
येईल लवकरच तुला आऊट करायला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


लपाछपीचा खेळ

लपाछपीचा खेळ खेळण्यात 
माझे भाऊ व मी दंग झालो. 
पत्र्याच्या दारामागे लपताना
चांगले इंचभर कापले.
माझी रडारड ऐकून
आई आजी बाहेर पळत आले.
आई आजीचा ओरडा त्यासोबतच
फटाका ही दादांने खाल्ला.
ओयाडिन लावून दिल्या वर
अजून जोरात भोंगा माझा सुरू झाला.
त्या लपाछपीची खूण अजूनही आहे.
कधी लक्ष गेले तर तो दिवस अजूनही आठवतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


खेळ

वेडू नजरेच्या प्रेमात खूप 
खेळलो लपाछपी 
डाव ना तू जिंकला
डाव ना मी जिंकला
अर्ध्यावर सोडून तो डाव
नविन भातुकलीचा
खेळ बघ मांडला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


रवी शशीची लपाछपी

लपाछपीचा खेळ नभात 
रोजच चालतो.
संध्याकाळा झाली की तापलेल्या 
किरणांना सौम्य करत.
लाल पिवळ्या रंगाची उधळण करत
रवी हळूहळू पश्चिमेकडे झुकतो. 
शशी चांदण्या सोबत हळूच नभात येतो.
पहाटे पुन्हा तिचं गडबड नभात सुरू होते.
शशी चांदण्या सोबत हळूच निघताच.
रवी पुर्व कडून अबीर गुलाल उधळीत क्षितिजा बाहेर येतो.
मेघ ही कधीकधी त्यांच्यात
सामील होतो.
कधी रवीला झाकून टाकतो तर
कधी शशीला चांदण्या 
सोबत झाकून टाकतो.
असा हा नभातील लपाछपीचा 
खेळ रोजच चालतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


नव्याने स्वप्न

स्वप्न तुटण्यासाठी स्वप्न पाहावी लागतात.
स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागते.
बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे लागते.
स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा असतो.
मी माझं स्वप्न पूर्ण करणारच असा आत्मविश्वास हवा.
स्वप्न पूर्ण होईपर्यंत बऱ्याच गोष्टींना आळा घालून आहुती द्यावी लागते.
तेव्हा कोठे जाऊन स्वप्न पूर्ण होण्यासाठी तयार होतात.त्यात पण एखादं स्वप्न तुटते.
वाईट न वाटून घेता. टेंशन न घेता जेवढी स्वप्न पूर्ण झाली तो आनंद मानून
पुन्हा नव्याने स्वप्न बघून पूर्ण करण्यासाठी तयार व्हायचं असतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


माझं स्वप्न

राणी तुझ्या सोबत पाहिलेलं 
स्वप्न तू सोडून गेल्यावर
क्षणात तुटलं ग
स्वप्न नव्हतं ते ते तर
माझं हृदय होतं.
भेटशील कधी तर दाखवेन
माझं तुटलेलं स्वप्न तुला
अजून ही जपून ठेवलंय
किती तुकडे झालेत त्यांचे 
तुला नाही कळणार.
माझं तुटलेलं स्वप्न
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


काही स्वप्न

काही स्वप्न तुटली
काही स्वप्न पूर्ण झाली.
काही स्वप्नांना आहुती दिली.
काही स्वप्न कुपीत कायमची 
बंद करून टाकली.
काही स्वप्न जपून ठेवली.
त्यांचं स्वप्नांवर जगते आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


दुःख {चारोळी}




तुटलेले स्वप्न मनी बाळगून...
नविन स्वप्न पहायला शिकले...
स्वतःच दुःख थोडं बाजूला ठेवून...
दुसऱ्याच दुःख जाणायला शिकले...
मेघा...✍️✍️©️®️


स्वप्न

तुटलेले स्वप्न तुटल्या गाठी
जन्मभराचे वचन देऊन
स्वप्न दाखवली होती.
अर्ध्यावर स्वप्नांचा डाव मोडून 
स्वप्न भंग करून गेलास.
तेच स्वप्नांचे तुकडे गोळा करून
पुन्हा जोडायचा प्रयत्न करत
पुन्हा जगाचं स्वप्न बघत आहे.
पण तुटलेल्या स्वप्नांना
किती ही जोडलं तरी
तडा कायमचा राहणार आहे.
ते पूर्ण होणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, March 05, 2022

कश्ती




ओ कागज की कश्ती
ओ बारिश का पानी
मुझे लौटा दो ओ
मेरे प्यार भरे दिन.
मुक्तछंद काव्या
मेघा आरबुज... ✍️✍️©️©️


समुद्र

वेडू तो अस्ताला निघालेला रवी
तू मी व तो समुद्र किनारी 
आपलं शांत बसणं
त्या वाळूवर रेघोट्या ओढणे
कागदाच्या कोनातील
ते तिखट मीठाचे दाणे घेऊन खाणे.
त्यांचं कागदांची बोट करून 
समुद्रात सोडणे.
लाटेवर तरंगत जात जात
हेलकावे खात आपली बोट
समुद्रात विलीन होऊन जायची.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बालपण

कागदाची बोट
बालपणाची आठवण 
करून देते
पावसाच्या त्या दिवसांत 
रमून जाते.
धो धो कोसळणारा पाऊस
एका तालात पडणारा पाऊस
उन पावसाचा खेळ 
असणारा पाऊस
पाऊस कोणताही
बोट मात्र कागदाची
कागदाची बोट क्षणात भिजते.
मनाचे खेळ सारे असेच असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वहीच पानं

कागदी ची बोट
बोटीला कागद
वह्यांची पान
एक पान फाडता 
जीव होई खाली वर
नकोच ती बोट
नको ती मजा
सरळ सुत जगणं
पाऊस पाहत राहणं
पावसाच्या थेंबाशी खेळणं
हिच खरी मजा 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


बोट

तुझ्या माझ्या प्रेमाची बोट
हळूवार चालत होती.
वाऱ्याच्या झोक्यावर
छान डुलत होती.
कोरोनाची लाट आली
बोट थोडी डगमगली
जोराचा झटका देऊन
तुला माझ्या पासून 
कायमची दूर घेऊन गेली.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


जुना अल्बम

राणी रिटायर्ड होऊन निवांत आराम खुर्चीत बसलो होतो. सहजच मनात डोकावून पाहिले.जुन्या आठवणींचा अल्बम दिसला. घेतलं मनावर आहे वेळ तर यावं तारूण्यच्या जीवनात एक चक्कर मारून धावपळीच्या आयुष्यात सर्व कर्तव्ये पार पाडताना. कधी लक्ष दिलेच नाही.जुन्या अल्बमकडे
वेळ होता तर मग गेलो मनाच्या एकांताच्या कप्प्यात पहिलं जरा डोकावून जुना अल्बम उघडला. आणि एकदम तू समोर दिसली आणि आठवणीत रमून गेलो. मग तुझ्या सोबत गप्पा मारत बसलो.
खूप गप्पा मारल्या ग कोठे असशील काय करत असशील दिसशील का कधी कोठे
भेटशील का एकदा तरी असे खूप प्रश्न पडले ग राणी भेटशील का एकदा त्यांच वळणावर परत. त्या स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेलो ती आपली नजरानजर तुझं ते लाजून हळूच पाहणं.मी बघताच नजर फिरवणे .या तुझ्या त्या जुन्या अल्बम मध्ये रमून गेलो ग.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अल्बम

सहज जुना अल्बम काढला.
फोटो बघत असताना
तुझी आठवण झाली.
विचारात गुंतून गेले.
वेडू तू कोठे असशील
मनाला विचारू लागले.
तुला ही येत असेल का
माझी आठवण
असा संवाद साधत होते.
आठवणींवर आठवणीन
सुरु झाल्या. 
आठवणींची मालिकेत
रमून गेले.
तुझ्या स्वप्नात दंग होऊन गेले.
किती रे मी अल्लड होते.
तुझ्या विश्र्वात रमत जायची.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आठवणींचा अल्बम

जुन्या आठवणींचा अल्बम
निराशाजनक आयुष्य
पुन्हा आनंदाचे क्षण भरतो.
रमून जाता त्या क्षणात
चेहऱ्यावर नकळत हास्य येत.
नजरेत एक चकाकी येते.
क्षणभरासाठी का होईना
दुःख टेंशन इतर विचारांचा
विसर पडतो.
मुक्तछंद काव्या 
मेघा...✍️✍️©️®️


आठवणीत रमणे

जुन्या आठवणींचा अल्बम
माहेरी गेल्यावर काढला.
सर्व भाऊ बहिण हरवून 
त्या क्षणात बालपणात रमून
एकमेकांच्या खोड्या काढत
खोड्या सांगू हसू लागलो.
हसता हसता डोळ्यात पाणी आले.
नकळत हळूच रडून झाले.
ओलावा तो भाऊ बहिणीच्या मायेचा
भाऊ बहिणीच ते प्रेम पाहून
वहिनी ही क्षणभर भाऊक झाली.
असा तो काळ आठवून रमून गेलो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आठवणींचा अल्बम

जुन्या आठवणींचा अल्बम
मनात जपून ठेवला.
तुझ्या माझ्या संसाराच्या गाडीला
आता ब्रेक लागला.
आता आठवणीच आहेत.
मनाच्या एकांतात खेळायला.
आता आठवणींन सोबत जगते.
अल्बमातच तुला न्याहाळते.
तेथेच मुक संवाद साधते.
तुझ्या तर आठवणीत जगते.
जुन्या आठवणींच्या अल्बमच्या
स्वप्नात रंगून जाते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Thursday, March 03, 2022

चाफ्याची फुले {चारोळी}




काही गोष्टी न बोलता कळतील का तुला...
सोनं चांदी हिरे मोती नको रे मला...
माझं मन समजून घेऊन ओंजळभर...
चाफ्याची फुले आणशील का मला...  
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


राणी बोललो नाही

राणी का बोललो नाही.
तुझ्या वर प्रेम आहे.
का नुसताच बघत बसलो.
काही गोष्टी वेळेतच बोललेल्या
बऱ्या असतात. 
तुला सांगितलो नाही.
त्या गोष्टीचा आज पश्र्चाताप होतो.
वेळेत काही गोष्टी बोलायला 
सांगायला हव्या असतात.
आता ह्या वळणावर आल्यावर
कळत पण वेळ आता निघून गेली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


आपणच आपलं

काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्याच
काही दुःख न सांगितलेली बरी
काही कल्पना मनातच ठेवलेल्या बऱ्या
आपणच आपल्याशी बोललेल बर असतं.
सुख असो दुःख असो असो 
अजून काही आपली स्वप्नं
किंवा असो मनातील गुपित
आपल्या जीवनातील रहस्य
बोलाव आपल्याच मनाला
कोणाला बोलून का आपले
हास्य करून घ्यावे.
रहावे एकटेच चालावे एकटेच
एकटा चलो रे नारा प्रमाणे
एकटेच आपल्या स्वप्नांना घेऊन
छान जागावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


काही गोष्टी

काही गोष्टी न बोललेल्या राहिल्या
त्या तुला कळतील का रे
माझे मनाची तगमग जाणवेल का
माझं मन तुला वाचता येईल का
नयनाची भाषा समजेल का
आशा काही गोष्टी न बोलता ही
घेशील का रे वेडू समजून...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


न बोलता गेला

खूप काही बोलायच होत.
खूप काही सांगायचं होत.
असा मध्येच हात सोडून
तू निघून का गेला.
बोल आता कोणाशी बोलू
मनाची व्यथा कोणाला सांगू
स्वप्नात ही येतो तर शांतच असतो.
काहीच बोलत नाही. बोल रे
स्वप्नात तरी बोलून मनमोकळे कर.
वेळ अशी अचानक का आली.
तू काहीच न बोलता
कायमचा निघून कसा गेला.
तू कायमचा सोडून जातो.
यांची जरा सुद्धा कुणकुण
लागून दिली नाही.आशा
काही गोष्टी न बोललेल्या राहिल्या.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, March 02, 2022

तुझीच

मी राहिले नेहमी तुझीच
असेन मी नसेन मी
तरी तुझ्या हृदयात
     असेन मी 
तू तुझ्या हृदयात 
   पाहता तुला
   दिसेन मी
मेघा...✍️✍️©️®️


तुम्ही माझेच

तू माझ्या हृदयात नेहमी राहशील रे...
तू तर माझा काळजाचा तुकडा सोनू तेजस ...
मायेची ममता तुझ्यावर तू तर माझी अमृता
अमृता परी गोड तू माझी सूनबाई...
तुझ्यासाठीच जगते रे अबीर 
पिल्लू तू तर माझ्या दुधावरची साय रे...
तुम्हीच तर माझे सर्वस्व आहात रे...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


तू राहशील

तू नेहमी राहशील
या वेडीची सावली होऊन
साथ कायम देशील ना.
या वेडीचा स्वभाव थोडा
वेगळाच आहे.
तू तो समजून घेऊन
तुझा हात देशील ना.
मैत्री तुझी अशीच जपशील ना.
एकलकोंडी आयुष्यात
एकाकांतच्या कोशात
मी स्वतःला बांधून घेते.
मला त्याच कोशात ठेवून.
मन माझे समजून घेशील ना.
आशा माझ्या आयुष्यात
तू नेहमी राहशील ना????
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तू माझाच

तू नेहमी माझाच रहाशील
तू तू आहेस म्हणूनचं तर
मी तुला पूजले आहे.
तुझी आठवण कायम
स्मरणात राहील.
तुझी जागा तुझीच आहे.
ती मी कोणालाच देऊ 
शकत नाही.
तुझ्या आठवणीत माझं
काळीज फाटत रे
तुझ्या असण्याचे भास
कायम होतात.
तू माझा मी तुझीच रे
मी सरणावर जळून जरी नष्ट झाले
तरी तुझीच प्रतिमा
माझ्या हृदयात दिसेल..
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, March 01, 2022

मनाचे खेळ सारे

वेडू मनाचे खेळ सारे
खेळून झाले.
तुझ्या असण्याचे भास आभास
सारे बघून झाले.
स्वप्नात तुझ्याशी बोलून 
खेळ मांडून झाले.
मनाच्या एकांतात तुझी 
आठवण काढून झाले.
आभासी या मनाला
भुरळ तुझीच रे
वेडू ओसाड निरामय
आयुष्यात मनाचे खेळांचीच 
सोबत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


वेडे मन

मनाचे खेळ असतात
राणी खूपच सुंदर 
असतो ग मी रात्रंदिन 
तुझ्या खेळात गुंग
मनाच्या या खेळात
तुझाच तर सहारा आहे.
वाळवंटी या आयुष्यात
तुच तर मृगजळ आहेस.
त्या मृगजळामध्ये
तूच तर दिसते.
मग हे वेडे मन
त्या मागेच तर धावते.
तुला शोधत शोधत
मन माझे वेडे होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मनाचे खेळ {चारोळी}




मनाचेच ग खेळ सारे....
सावल्याचे ग हे भास सारे....
आभासी आशा खेळात....
गुंतते ग हे मन सारे....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


तुझीच आठवण

तुझी आठवण येता.
मनाचे खेळ सुरू होतात.
मग तुझीच सावली दिसते.
तुच रे बोलल्याचे जाणवते.
तू सोबत असल्याचे भास बघ होतात.
स्वतःला आरशात पाहताना
मागे तू उभे असल्याचे 
प्रतिबिंब जाणवते.
आशा मनाच्या खेळात गुंग
मी बघ होऊन जाते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


मनाचे खेळ

मनाचे खेळ सारे
डोळ्यास न दिसे.
चालतो बाजार येथे
किंमत त्यांची शून्य असते.
आशा मनाच्या खेळात
मोठ मोठे रचून इमले
त्या स्वप्नात गुंग होतो सारे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time