Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label बोलून काही उपयोग नाही. Show all posts
Showing posts with label बोलून काही उपयोग नाही. Show all posts

Wednesday, January 05, 2022

बोलून काही उपयोग नाही

जगा समोर बोलून मनमोकळे
होणे काही उपयोग नाही.
तो चारचौघात चर्चाचा विषय होतो.
आता आपलं ऐकतील सहानुभूती
दाखवतील.आणि 
आपली पाठ फिरली रे फिरली
की दुसऱ्याला आपलंच सांगून 
जोक करत हसतील.
मन मोकळं करायला पण तेवढी 
विश्वासू व्यक्ती हवी असते.
आजकाल एवढी विस्वासू 
व्यक्ती भेटणं अवघड आहे.
त्यापेक्षा आपलं मन 
आपल्या लिखाणातून
आपल्या स्वप्नात मोकळं करावं
लिखाण आणि स्वप्न ह्या दोन गोष्टी
अशा आहेत त्या कधीच 
आपला विश्वासघात करणार नाही.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time