मानव जन्म एकदाच भेटतो.
जगून घे ग आनंदाचा एक एक क्षण
दुःख तर आहेच ग
त्याच त्याच दुःखात
किती होरपळशील
दुःखाचे गोठोड बांधून
मनाच्या तळाशी ठेवून दे.
दुःखाला लपून आनंदाला सोबत घे.
सुखाची गाठोडे बाहेर काढ.
एक एक सोडवून बघ.
त्यातच तुला आनंदाची पोतडी
सापडेल ती पोतडी उघडून बघ.
त्यातील आनंदाचे क्षण टिपून घे.
मी तर सोबत कायम आहे.
तुझ्या दुःखी चेहऱ्याची प्रतिमा
मला माझ्या हृदयात ठेवायची नाही.
तुझा तो आनंदाने भरलेला
चमकदार चेहरा
डोळ्यातील तो आनंद
मला माझ्या हृदयात जपून ठेवायचं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️