Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label काळ. Show all posts
Showing posts with label काळ. Show all posts

Monday, January 31, 2022

काळ

काळ बदलला वर्ष गेली
संकटे आली गेली
कष्टे करून झाली.
सुख दुःखाचे भोग भोगून झाले
कित्येकांनी दुखावले मन
कित्येकांनी केली शब्दांची उधळण
जखमा देऊन गेले बरेच जण
शालजोडीतले देऊन मनाला दुखवून 
हसऱ्या चेहऱ्याने गेले बरेच जण
मी हि ठाम होते साठवले सर्व मनात
बांधून त्या साऱ्यांचे गाठोडे ठेवले
मनाच्या तळाशी
लपवून पापण्या आड पाणी
हसरा चेहरा घेऊन 
मी नेहमी आनंदी राहण्याच्या
इच्छेवर जगले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


काळ

काळ बदलला, वर्ष गेली
वेडू तुझ्या आठवणीत
मी नेहमी आनंदी राहण्याच्या
इच्छेवर जगले
किती ही काळ बदलतो
किती ही वर्षे सरो
तुझ्या आठवणीत रमत असते
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन
झुलत असते.
त्या झुलणाऱ्या मनावर
तुझ्याच तर आठवणींचा झोका असतो.
यापुढे ही अशीच
तुझ्या आठवणीत आनंदाने जगेन
कितीही बदलो काळ
किती ही वर्षे सरो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time