Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, October 31, 2021

सौंदर्य

राणी तू समोर आली की 
शब्द निशब्द होतात.
तुला पाहून तुझं गोड सौंदर्य
पाहून शब्द अपुरे पडतात.
राणी तुझ्या टपोऱ्या डोळ्यांची
स्तुती करावी वाटते
तेव्हाच तुझ्या गोडगुलाबी
ओठांवर नजर जाते.
तुझी गोरी मुलायम कांती
बघून मी हरवून जातो.
राणी नजरेनेच तुला खुणावतो.
तुझ्या नजरेत पाहताना
त्यांतच हरवून जातो.
तुझ्या सौंदर्याची तारीफ
करायला शब्द ही अपूरे पडतात.
मनातल्या गुजगोष्टी मनातच
राहतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


सुख दुःख

सुख हे कसं पाण्यासारखं असतं
कधी ओंजळीतून वाहून 
जाते कळतच नाही.
दुःख मात्र ठाण मांडून बसत.
जा म्हटलं तरी हलत नाही.
क्षणभर सुखासाठी
मणभर दुःख सोसाव लागत.
सुख हे हवा च्या झोक्यासारखं
येऊन निघून जात.
सुखांची झुळूक छान वाटते.
तो वर दुःखाची लाट येते.
सुख हे असंच असतं
ओंजळीत थोडावेळचं थांबत.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️


सुख

प्रेम तू करून जा
सुख तू वाटून जा
तुझ्या प्रेमाच्या मिठीत
मला तू समावून घे.
तू सुखाची बरसात
माझ्या वर करून जा.
पावसाच्या सरी सारखी
तुझी सुखाची सर 
माझ्या आयुष्यात आणून जा.
ओंजळीत माझ्या थोडावेळ
थांबून जा.
तुझ्या आवडत्या चाफ्याच्या
सुगंधा सारखी
सुखांची उधळण माझ्या
आयुष्यात करून जा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


भीती

सखी मी जवळ असताना
तुला कसली आली अनामिक भीती
माझ्या सोबत चालताना
भीतीला का जवळ करावे.
माझ्या सानिध्यात असताना.
तू का भीतीची पर्वा करावी.
तुझ्या माझ्या प्रेमळ मैत्रीला
कशाची आली भीती
भीतीला जवळ करून 
आपल्या निःस्वार्थी निर्मळ
मैत्रीला भीतीने नाव का द्यावे.
मुक्तछंद काव्या
मेघा ...✍️✍️


Saturday, October 30, 2021

स्वप्नात

राणी स्वप्नात माझ्या येशील का
चित्रात रंग ही भरशील का
राणी सत्यात तर नाही भेटली
माझ्या स्वप्नात तू माझ्या जवळी आहेस.
स्वप्नांच्या दुनियेत जगतो आहे.
स्वप्नात तुलाच जवळ करतो आहे.
स्वप्नात तू मला सोडून जाणार तर नाही ना?
माझं स्वप्न भंग करणार नाही ना?
राणी स्वप्नात माझ्या बरोबर
माझी साथ देशील ना
राणी स्वप्नात तू माझी आहेस
माझीच राहणार आहे
तरी अनामिक भीतीला
नाव काय द्यायचे
राणी स्वप्नात माझ्या
तू सोबत असताना
मी भीतीला एवढं
जवळ का करायचे.

मुक्तछंद काव्या
मेघा‌...✍️✍️


अपयशाचे वारे

राणी उदंड असतील 
माझे हे कष्ट सारे
तर तू मला अवश्य भेटशील.
तुझ्या एका भेटीसाठी
मी खूप वाट पाहतो ग
तुझ्या साठी नाही आणणार
चंद्र तारे तोडून.
माझ्या मिठीत तुला देईन
सुखाचे वारे
पैठणी बनारसी नाही घेणार
काॅटनच्या साडीत पण
तुला छान सजलेली पाहणार
तुझ्या साठी माझी चंद्र मोळी
झोपडीच सजवणार
तुझ्या सुखाच्या झोपेसाठी
माझ्या हातांची उशी देणार.
मी तुझे स्वप्न पाहतो.
तुझ्या सुखांची स्वप्ने पाहतो.
त्या स्वप्नातही येतात ग
मग अपयशाचेच वारे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


अपयश

उदंड असतील, हे कष्ट सारे
तरी अपयशाचे वारेच हाती आले.
खूप खूप कष्ट करून
तुला सुखाच्या सावलीत आणले होते.
टायफड झाला तेव्हा ही
तुला दिवसरात्र सेवा करून
मरण्याच्या दारातून बाहेर आणले होते.
त्यांतच तुला  मानसिक आजाराने
घेरले होते.
त्यातून लहान मुलासारखे समजाऊन
सतत साथ देऊन. त्यातून बाहेर काढले.
कॅन्सर सारख्या शेवटच्या स्टेजच्या
परिस्थिती असताना.
सुध्दा कशाचाही विचार न करता
दिवस रात्र एक करून त्यातून
त्या आजारातून बाहेर काढले होते.
वयाच्या अवघ्या वीस वर्षांपासून
फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच
जगले
या सर्व परिस्थितीत
कधी तुझी आई, कधी बहीण,
तर कधी खास मैत्रिण झाले.
बायको तर तुझी हक्काची होतेच.
हे सर्व रोल करता करता.
कष्ट करून मुलालाही शिकवलं
त्याला ICWA केलं.
हे सर्व करताना मला किती
त्रास झाला किती कष्ट पडले.
हे फक्त माझ्याच जीवाला माहित.
हृया सर्व परिस्थितीवर
मात करून आता कुठे सुखाचे
क्षण आनंदाचे जगत होते.
तर नियतीला ते मान्य नव्हते.
नियतीने माझ्या नशिबी अपयशाचेच
वारे लिहिले होते.
कोरोनाने एक दिवसांत होत्याच
नव्हतं करून‌ तुम्हाला माझ्या पासून
दूर घेऊन जाऊन.
शेवटी एक दिवसांत अपयश
माझ्या पदरी टाकले.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


एकटेपणाच्या आठवणी

राणी तुझ्या आठवणींना 
साथ देऊन थकलो ग
राणी तुझ्या स्वप्नात 
रंगून थकलो ग
राणी तुझ्या विचार
करून करून थकलो ग
राणी कधी भेटशील
हाच विचार करतो.
राणी थकल्या माझ्या जीवाला
साथ तू देशील का ग
राणी सोबत तू करशील का ग
एकटेपणात या रमलो आहे ग
राणी जमलंच कधी तर येऊन
बघ ग
तुझ्या वेडूची एकटेपणाची अवस्था.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


एकटीच

वयाच्या अवघ्या सतरा वर्षांपासून
आता वयाच्या पन्नाशी पर्यंत साथ दिली.
तुला सुख दुःखात साथ दिली.
कष्टात साथ दिली.
तुला तुझ्या मानसिकतेत साथ दिली.
पावलोपावली तुला साथ दिली.
पावलागणिक साथ दिली.
क्षणोक्षणी साथ दिली.
एवढी बत्तीस तेहतीस वर्ष 
तुला साथ देऊन.
मला एकटीला एकटेपणात 
रमायला सोडून गेला.
तुझ्या शिवाय मी एकटीच काय
करू शकते काहीच नाही.
मी एकटीच बसून तुझ्या विरहात
फक्त कविता व लिखाण करण्यात रमते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


भविष्य

राणी मी भूतकाळ उकरून काढत नाही.
मग तुझ्या आठवणीचा
मलाच खूप त्रास होतो.
तुझ्या बद्दल प्रेम आहे
ते तसंच जपून ठेवलं आहे.
तू भेटली नाही तरी
तुझ्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.
त्या आठवणींवर वर्तमानात जगत आहे.
भविष्य मला माहित नाही.
तू भविष्यात एकदा तरी भेटावी
हिच इच्छा आहे.
भविष्यात झालीच कधी भेट
तर ओळख नक्कीच दाखव.
थकल्या भागल्या माझ्या जीवाला
समजून जरा घे.

मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


भूतकाळ

मी भूतकाळ उकरून काढत नाही.
खूप त्रास होतो. 
खूप कष्ट सोसले होते.
झालं गेलं काढून काही जुने दिवस
परत येत नाही.
भूतकाळात परिस्थिती वर 
मात करून
सुखाचे वर्तमान घडवले होते.
भविष्याची काळजी नव्हती.
पण ह्या कोरोनाने घात केला.
सुखाच्या सावलीत अंधार
करून गेला.
आता ना भूतकाळच काही वाटतं
वर्तमान जगायचं म्हणून जगते.
भविष्य काही माहित नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Friday, October 22, 2021

मेसेज कोठे करु

मेसेज तर तुला खूप करायचे आहेत.
तुझा नंबर माझ्याकडे नाही.
प्रश्न तर तुला खूप विचारायचे आहेत.
पण विचारू कुठे आणि कसे.
मला ही तुझ्या खूप प्रश्नाची उत्तरे
द्यायची आहेत.
एक मेसेज कर ना
भेट आपली घडव ना
विचारांचा गोंधळ थांब ना

मुक्तछंद काव्या.

मेघा...✍️✍️


टाईप

वेडू किती रे तू हट्टी
माझ्या कडून तुला 
लगेच रिप्लाय हवा असतो.
किती रे त्रास देतो.
रिप्लाय देत नाही
तो पर्यंत तुझे मेसेज 
चालू असतात.
जरा उशीर झाला की 
लगेच फुगून बसतो.
वेडू रे खरंच वेडू आहेस.
वेळ जरा दे ना
प्रतिक्षा जरा कर ना
तुला हवं तसं टाईप होत नाही.
सांगायचं असतं वेगळंच
टाईप वेगळं होतं 
वेडू खरंच मला समजून घे ना
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


मेसेज

तुला किती मेसेज करायचे
राणी सांग ना तुझ्या आठवणीत
अजून किती दिवस जगायचं
तू माझे मेसेज वाचत नाही.
मला रिप्लायपण देत नाही.
किती ग वाट पाहायची.
तुझ्या साठी जीव माझा तळमळतो.
तुझा एक मेसेज साठी
चांदण्या मोजत
रात्र अख्खी जागून काढतो.
मेसेज ट्यून वाजली की
तुझा मेसेज असेल म्हणून
लगेच मोबाईल चेक करतो.
तुझे मेसेज सोडून बाकीचेच
ढिगभर मेसेज असतात.
कधीतरी केलाच मेसेज तर
एक हसरी स्माईल टाकून मोकळी होती.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Thursday, October 21, 2021

व्यक्त करायला हवं होतं

आपलं एकमेकांवर प्रेम आहे 
ते आपण वेळेवर व्यक्त 
करायला हवं होतं वेडू.
दिरंगाईने का होईना
आपण आपल्या घरी 
कळवायला हवं होतं.
वेडू आता ती वेळ निघून गेली.
आपल्या हातात आता काही नाही.
आता जसे आहोत तसे
जेथे आहोत तेथे राहायचं आहे.
त्यातच सुख मानायच आहे.
आपल्या गोड आठवणी
मनाच्या एकांतात जपून
ठेवायच्या आहेत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


दिवाळी आली

आता दिवाळी जवळ आली.
आळस झटकून कामाला सुरुवात
करायला हवी.
घराची स्वच्छता वेळेवर
घडायला हवी.
सामानाची यादी खरेदी
ते वेळेवर घडायला हवं
दिवाळीचा उत्साह पुन्हा वाहायला हवा.
आता दिरंगाई ने का होईना
कोरोनावर बऱ्यापैकी मात करत
बाजारपेठा, हॉटेल्स, माॅल,
नाट्यगृह, सिनेमा थिएटर
उघडले आहेत.
असंच सुरळीत चालू राहावं
असं वाटतं असेल तर
सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर,
मास, ह्याचा वापर चालूच ठेवणे
हे कळायला हवं.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


कळायला हवं होतं

तिचं तुझ्यावर प्रेम आहे
तुला हे समजायला हवं होतं.
तू वेळेवर बोलायला हवं होत.
दिरंगाईने का होईना,
तुला ते कळायला हवं होतं.
आता पश्चात्ताप करून काय फायदा
ती आता दुसऱ्याची झाली.
तिच्या जीवनात ती सुखी आहे.
तू आता तिच्या स्वप्नांच्या दुनियेत जग
तुझी मनांची तोरण किती ही बांधली.
तरी ती येणार नाही.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Wednesday, October 20, 2021

आठवणी

तुला कोरोना झाला होता.
तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आले.
तू मला न सांगता, मला न भेटता
त्या हॉस्पिटलमध्ये तू शेवटचा
श्वास घेतला.
एकेकाळी त्याच हॉस्पिटलमधून
मरणोत्तर परिस्थितीतून
तुला खणखणीत बरं करून
घेऊन आले होते.
त्या हॉस्पिटलवर माझा
खूपच विश्वास होता.
तेथेच तुझ्या वर काळाने घाला घातला.
त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला ही
मी जात नाही.
त्या हॉस्पिटलकडे वळून
ही बघत नाही.
तुझ्या आठवणीचा
मला खूप त्रास होतो रे
म्हणून पुन्हा तेथे जाणे नको
मागे वळून बघणे नको.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


आठवणींची जागा

वेडू तू नाही.
ती आपली प्रेमाची जागा
मी सोडून आले.
पुन्हा त्या जागी, जाणं होतं नाही.
त्या जागी जाऊन मागे वळून बघून
मन उगीच आठवणींच्या
हिंदोळ्यावर झुलते.
मग त्रास होतो रे त्या मनाला
वेडू सांग ना का जाऊ त्या जागी
आता मागे वळून का बघू
जेथे फक्त आपल्या प्रेमाच्या
अस्पष्ट खूणा शिल्लक आहेत.
त्या खूणा बघून मनावरची खपली निघून
आठवणींच्या जखमा भळाभळा वाहतात.
त्या निघालेल्या खपलीला
भळाभळा वाहणाऱ्या जखमेला लावायला
तुझ्या प्रेमाचं मलम नाही.
म्हणून वेडू पुन्हा त्या जागी मी जात नाही.
मी आता मागे वळून बघत नाही.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Tuesday, October 19, 2021

मेघ

तिमिराची मेघाला कशाची तमा
तिमिरात ही मेघा सजली 
चंद्राच्या प्रकाशात
सुबक चांदण्यांनी भरली.
मेघाला नव्हती तिमिराची तमा
रवीच्या किरणांनी तिची
सकाळ हसरी झाली.
कवितेत तिच्या प्रकाश गाणी 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


आकाश

आज आकाशात तिमिराला तमा न कशाची
आज आकाशी पोणिमेचा पूर्ण चंद्र
आज शुक्राची चांदणी चमचम करती.
आज लक्ष लक्ष चांदण्यांची सुबक रांगोळी
आज आकाशी सजले चंद्र तारे
आज आकाशाला तिमिराची न तमा
कवितेतून गाती चंद्र तारे प्रकाश गाणी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


प्रकाश

तिमिराला तमा न कशाची
तिमारातून प्रकाशाकडे
तुझ्या अस्तित्वाचा खूणा शोधाते.
माझ्या कवितेतून गाणी मांडते
तुझ्या प्रकाशाची.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Monday, October 18, 2021

माझी खिडकी

तुझी वाट पाहत त्या खिडकीत
मी तासन् तास बसायची.
आपल्या अबोल प्रेमाची
ती खिडकीच एकमेव साक्षीदार होती.
तू कधी येणार तू आला की
मग तुझी माझी नजरानजर व्हायची.
तो चंद्र ही आपल्या अबोल प्रेमाला
हळूच हसायचा
शुक्राच्या चांदणीला घेऊन पुढे जायचा.
आपण मात्र खिडकीतून
एकमेकांना बघत बसायचो.
गार वाऱ्याला ते सहन नाही व्हायचे.
तो खट्याळ गार वारा खिडकी
जोरात आपटून निघून जायचा.
आणि आपण दोघं स्वप्न भंगातून
बाहेर यायचो.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


खिडकी

त्या खिडकीतून आभाळ दिसायचं.
तो छान पौर्णिमेचा दुधाळ चंद्र 
त्याचा जवळ तो शुक्रतारा
त्या दोघांची सुबक जोडी दिसायची.
त्या छान चमचम करण्यारा
चांदण्यांनी सजलेल आभाळ
जणू काही कोणीतरी चमचमणाऱ्या
फुलांची उधळण केली आहे.
तो गार वाराचा झोत अंगावर यायचा
तो मला सहन नाही वाहायचा
सख्या तुझ्या मिठीची
आठवण करून द्यायचा.
मग मी ती खिडकी बंदच ठेवते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Sunday, October 17, 2021

उत्तर दे

प्रश्न सारे अडवत होतो.
एकच उत्तर हवं होत.
मी तुझ्या वर मनापासून प्रेम केलं.
तू ही माझ्यावर प्रेम करतेस.
मला हे माहित आहे.
तू उत्तर द्यायची का टाळत आहे.
तुझं माझ्यावर प्रेम आहे हे उत्तर द्यायच
तू का टाळत आहेस.
ह्या एकाच उत्तराला जवळ घेत आहे.
तू काही उत्तर देत नाही.
मी माझा प्रश्न विचारायचे सोडत नाही.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


प्रश्न

प्रश्न सारे अडवत होतो.
एकच उत्तर हवं होत.
मी तुझ्या वर मनापासून प्रेम केलं.
तू ही माझ्यावर प्रेम करतेस.
मला हे माहित आहे.
तू उत्तर द्यायची का टाळत आहे.
तुझं माझ्यावर प्रेम आहे हे उत्तर द्यायच
तू का टाळत आहेस. 
ह्या एकाच उत्तराला जवळ घेत आहे.
तू काही उत्तर देत नाही.
मी माझा प्रश्न विचारायचे सोडत नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Saturday, October 16, 2021

काहूर

वेडू काहूर मनात अजब दाटले होते.
तुझ्या येण्याची वाट पाहत होते.
तुझ्या भेटीची आस लावून बसले होते.
आभाळ ही भरून आले होते.
डोळे ही भरून आले होते.
तुला पाहून कोण कधी कोसळेल 
माहित नव्हते.
आज तुझ्या मिठीत अश्रूंना करून मोकळे.
तुझ्यात समावून जायचे होते.
आज तुझ्यासाठी काही तरी 
वेगळेच वाटत होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


सांजवेळी

सांजवेळी उन्हे उतरते
तुझी आठवण येते.
काहूर मनात अजब दाटले होते.
दुःख मनातील तुला बोलून
मन हे हलके हलके झाले.
आता तुझ्यासाठी काही 
तरी वेगळेच वाटले होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Friday, October 15, 2021

फुले उमलू दे

माझी राणी किती ते दुःख करणार
झालं गेलं विसर ग किती
त्रास करून घेणार.
आता नको ग तुझ्या जीवनात दुःख
असेल काही क्षणिक दुःख तर
तुझं ते दुःख माझ्या वाट्याला येऊ दे.
तुझ्या जीवनात आनंदाची
बरसात होऊ दे.
माझ्या बागेतील आनंदाची
फुले तुझ्या अंगणी पडू दे.
सुखाची बरसात तुझ्या जीवनी
होऊ दे.
राणी दुःख सारे विसरून
सुखाचे क्षण वेचून घे राणी.
राणी तुझ्या जिवनी
चाफ्याच्या सुगंध पसरू दे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


सुखाचा क्षण

माझी राणी किती ते दुःख करणार
झालं गेलं विसर ग किती
त्रास करून घेणार.
आता नको ग तुझ्या जीवनात दुःख
असेल काही क्षणिक दुःख तर
तुझं ते दुःख माझ्या वाट्याला येऊ दे.
तुझ्या जीवनात आनंदाची
बरसात होऊ दे.
माझ्या बागेतील आनंदाची
फुले तुझ्या अंगणी पडू दे.
सुखाची बरसात तुझ्या जीवनी
होऊ दे.
राणी दुःख सारे विसरून
सुखाचे क्षण वेचून घे राणी.
राणी तुझ्या जिवनी
चाफ्याच्या सुगंध पसरू दे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Thursday, October 14, 2021

राणी नेमकं सांगायचं राहून गेलं

राणी नेमकी तिचं गोष्ट सांगायची होती.
आणि तुझ्या जाण्याची वेळ झाली.
मनातील गोष्ट मनातच राहिली.
डोळ्यातील पाणी हळूच बाहेर आले.
पावसाच्या सरीत भिजून गेले.
पावसाची तीच सर एकदाच पडून गेली.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


वाहून गेलं

तुझ्या माझ्या प्रेमाची
तिचं गोष्ट सांगायची राहून गेली.
रोजच भेटत होतो.
रोजच बोलत होतो.
नेमकं तेच सांगायचे राहून गेलं.
तू ही नाही समजून घेतलं.
तू ही नाही ओळखून घेतलं.
तू ही नाही बोलला
पावसाची तीच सर एकदाच 
पडून गेली.
आपलं प्रेमाच गणित वाहून गेलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Wednesday, October 13, 2021

सखी तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी हद्दपार करण
सोप आहे का?
आपली इतक्या वर्षांची सोबत
अशी विसरण सोपं आहे का?
पावलोपावली क्षणोक्षणी तुझी
आठवण येते.
प्रत्येक क्षणात तुझ्याच आठवणी आहेत.
प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे.
लोकांना सांगणे सोप आहे.
विसर सर्व मागचं पुढंच पुढे बघ
पण तसं नसतं रे
ज्यांच जळत त्यालाच कळतं.
हि म्हण खरी आहे.
किती जरी विसरू म्हटले तरी
मनातल्या वेशींना मात्र ते मान्य नसत.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी हद्दपार करण
सोप आहे का?
आपली इतक्या वर्षांची सोबत
अशी विसरण सोपं आहे का?
पावलोपावली क्षणोक्षणी तुझी
आठवण येते.
प्रत्येक क्षणात तुझ्याच आठवणी आहेत.
प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे.
लोकांना सांगणे सोप आहे.
विसर सर्व मागचं पुढंच पुढे बघ
पण तसं नसतं रे
ज्यांच जळत त्यालाच कळतं.
हि म्हण खरी आहे.
किती जरी विसरू म्हटले तरी
मनातल्या वेशींना मात्र ते मान्य नसत.
मेघा...✍️✍️


Tuesday, October 12, 2021

शोधू पाहते

माझं असं काही शोधू पाहते.
मेघाच्या बरसण्यात
उन्हाच्या कवडशात
रवीच्या किरणात
थंडीच्या हुडहुडीत
तुझ्या शिवाय माझं अस्तित्व
मी शोधू पाहते.
नदीच्या पाण्यात
समुद्राच्या लाटेत
डोंगराच्या कुशीत
कुठे कुठे शोधू पाहते
झाडाच्या पानांत
पक्ष्यांच्या किलबिलाट
बर्फाच्या रांगेत
मी मलाच शोधू पाहते
उन्हाच्या सावलीत
आरशाच्या प्रतिबिंबात
मनाच्या एकांतात
मनाच्या पलटवार
सगळी कडे शोधून झाले.
तुझ्या अस्तित्वाच अवघड
गणित नाही सोडव शकले.

मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️


बाकी शून्य

माझं असं काही शोधू  पाहते.
माझं काय अस्तित्व राहिलं.
तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे.
मी माझं तुझ्याशिवाय काय शोधणार.
तुला शोधून तू काही सापडणार नाही.
अवघड गणित आता सोडवू पाहतो.
गणित किती ही सोडवून पहिलं
तरी हाती बाकी शून्याच येणार.
तुझ्या शिवाय जीवनाच्या वाटेवर
माझी किंमत ही शून्यच आहे.
शून्यच आहे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Monday, October 11, 2021

पहाटेचे स्वप्न

पहाटेच्या साखर झोपत
सखी तू माझ्या स्वप्नी यावे.
तुझे कोमल हात डोक्यावर फिरावे
तुझी लांबसडक बोटे केसांत
माझ्या गुंतवावी.
हलकेच थोपटून गालांवर
ओठ तुझे टेकवावे.
सखे पहाटेच्या गारव्यात
तुझ्या मिठीत मला घ्यावे.
होऊन धुंद तुझ्यात विरून जावे‌.
धुके हे न विरावे
पहाटेचे स्वप्न न सरावे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


पहाट

पहाटेचा थंड वारा
    तू आणि मी 
धुकं हे दाट दाटलेले
त्यातून वाट काढत.
रूसलेल्या रवीला
विनवून सांगते.
रंगाची उधळण करायला.
प्रसन्न ती पहाट करायला.
मेघा...✍️✍️




 


स्वप्न

राणी तू पहाटेच्या स्वप्नात आली.
तू धुक्यात न्हालेली
तू धुक्यात गुंडाळलेली.
तू रवी किरणांच्या रंगात रंगलेली.
तू रवीच्या कोवळ्या उन्हात
चमकणारी.
तू साखर झोपत स्वप्नात
येणारी.
धुके विरत जावे
तसे राणी तू स्वप्नातून सरत जाते.
स्वप्नातून तू सरत जाते.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Sunday, October 10, 2021

माझी नौका

मी नाविक संसारात तशी तरबेज होते.
आपण दोघे संसाराच्या नावेत
बसून छान नौका वल्हत होतो.
संसार रूपी नौका पार करून
किनाऱ्यावर पोहोचत होतो.
निवांत क्षण किनाऱ्यावर
बसून आनंद लुटायचा होता.
दैवाने तुझा हात माझ्या हातून
सोडून घेतला.
तू माझा हात सोडून
निवांत किनारावर बसला आहे.
आता आपली नौका डगमगते.
एकटीला वल्हे मारता येत नाही.
विचारांच्या पुरात वाहते आहे.
वाट तिला नीट सापडत नाही.
मी किनारा शोधते आहे.
आता एकटीनेच नौका वाहायची आहे.
सत्य एकच आहे.
किनारा लागे पर्यंत एकटीच
नौकेत बसून नौका वाहायची आहे.
मला किनारा लवकरच लागू दे.
मला तुझ्या जवळी लवकर येऊ दे.
नौका घेऊन एकटीलाच प्रवास आता नको आहे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Saturday, October 09, 2021

तुझी साथ

वेडू माझ्या वेदनेला
तुझी हळुवार फुंकर असावी.
माझ्या जीवनात रवी 
किरणांची सोनेरी पहाट यावी.
तुझ्या अलगद मिठीत
सुंदर पहाट तेजोमय व्हावी.
पहाटेच्या गरम गरम कॉफी 
सोबत तुझा हात हाती असावा.
विसरून सारे दुःख
तुझ्या कुशीत मनसोक्त
बागडून घ्यावे साथ तुझी घेऊन.
पहाटेच्या मंद गार वारऱ्यात
तुझ्या सोबतीने हिंडून यावे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


तुझी मिठी

सखी माझ्या वेदनेला
तुझी फुंकर असावी.
रात्र लवकर संपवून 
पहाट लवकर व्हावी.
तुझ्या माझ्या मिलनाची
चाहूल मज लागली.
रात्रीच्या स्वप्नी
तु कानी कुजबुजून गेली.
तुझ्या माझ्या आयुष्याला
ओळख नविन मिळावी.
पहाटेच्या गारव्यात
वेदनेला फुंकर घालत
तुझी गोड मिठी असावी.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Friday, October 08, 2021

श्रध्दा अंधश्रद्धा

श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नको
श्रध्देने डोकं टेकाव पण अंश्रध्देने
आपटून घेऊ नये
श्रध्देने हात जोडावे पण त्याच हात
अंधश्रद्धेने बळी घेऊन नये
श्रध्देने पुण्य करावे पण अंधश्रद्धेने
पाप करू नये
श्रध्दा अशी ठेवावी की कुठल्याही
परिस्थितीत ती डगमगली नाही पाहिजे.

मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️


माझा बेत

तू मला एकटीला त्या निर्जन स्थळी
भेटायला बोलावलं
मला तेव्हाच तुझा बेत कळला होता.
प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवून
फसवून करून
तुझी पापी नजर त्यावर टाकतो.
हे मला माहित होते.
मी म्हणूनच तुझ्या सोबत प्रेमाच नाटक
करून.
माझा बेत आखून जाळ विणलं होत.
तुला रंगेहाथ पकडायच होत
मी पण म्हणून तू बोलावलेल्या स्थळी
निर्धास्त दिमाखात नटूनथटून आले होते.
तुला पाहून गोड गोड बोलून
प्रेमाच नाटक चालू केलं.
तुझ्या अपेक्षा वाढल्या तेव्हा
इशारा करून 
पोलिसांच्या हातात देऊन
तुझा बेत हाणून पाडला.
तेव्हा कुठे माझं समाधान झालं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️





बेत तुझे फसले

मला ते तेव्हाच कळले होते.
तू तुझा संसार मांडल्यानंतर
मला तू दुधातून माशी काढावी
तसे काढून दूर करणार आहेस.
गोड बोलून तू माझ्या कडे
पैसे मागणार हे मला माहित होते.
मी पण मनाची सर्व तयारी करून
ठेवली होती.
जो पर्यंत मी जिवंत आहे.
तो पर्यंत तुला माझ्या प्रापर्टीतील
एक ही पैसा मिळणार नाही.
बेत सारे तुझे फसले होते.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️
{हि रचना लग्न झाल्या नंतर मुले आई वडीलांना संभाळत नाही. पण त्यांचा
पैसा हवा असतो. त्यावर आधारित आहे.
कोणाला दुखवण्याचा हेतू नाही.
कोणाच मन दुखले असेल तर सॉरी 🙏🙏}


Thursday, October 07, 2021

माणूस

     अरे माणसा
तू आज पासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवात
आई अंबाबाईचा आई जगदंबेचा 
तू उदोउदो करशील.
तुझ्या हाताने तिची सेवा चाकरी करशील.
नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करशील.
नऊ दिवस देवीची जोशात साजरे करशील.
नऊ दिवसा नंतर त्याचं सेवा केलेल्या
हातांनी नाजूक कोवळ्या कळ्या कुस्करून टाकशील.
गर्भातच त्यांना मारून मोकळा होशील
आई बहिण वाहिनी ताई मुलगी 
काहीच विचार
न करता तिच्या शरीराची लक्तरे तोडशील.
तरुण म्हातारी मध्यम वय लहान कुमारिका
एवढंच काय पण चार पाच वर्षांची पण
तुला तुझ्या वासनेचा डोंब शांत 
करायला चालतील.
हिच का रे तुझी देवी उपासना
देवीसारख्या निर्मळ स्त्रीला तुझ्या
घाणेरड्या हाताने बरबटून टाकणे.
हिच का रे तुझी नऊ दिवसातील
देवीची पूजा.
जिचा सन्मान तुला करता येत नाही.
तेथे तुला देवीचा उत्सव करण्याचा 
काय अधिकार आहे.
स्त्री शांत आहे शांतादुर्गा सारखी
तो पर्यंत तुझी पूजा मान्य करेल.
एकदा का ती रणरागिणी चंडिका दुर्गा
झाली तर तुझा शेवट झालाच म्हणून समज.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


स्वतःची सावली

वेडु तुझ्या माझ्या प्रेमाचा 
मी काय उगाच अर्थ लावत होते.
अर्थ लावून स्वप्नात का जगत होते.
स्वप्नात जगतं तुझाच का 
विचार का करत होते.
तुझाच विचार करून 
मी स्वतःला का जिंकून घेत होते.
हरणार आहे माहित असूनही
तुझ्यात का गुंतत होते.
आता आपण एकमेकांचे
होणार नाही माहित असूनही
उन्हात स्वतःची सावली
शोधावे तसे 
तुला का शोधत आहे.
तुला का शोधत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Wednesday, October 06, 2021

अंतरीची ओढ

सुख अंतरीचे मला गवसले.
सखे तुझ्या भेटीचे 
पत्र मला मिळाले
ते पत्र वाचून
मी माझा न राहिलो.
सखी तुला भेटण्याची
वेळ ती सनीप आली.
मनी हुरहूर दाटून 
मी तुझ्या भेटीस आलो.
तुझ्या जवळी येता
बोटांने तु थांब म्हटले
पर्समधून तुझ्या लग्नाची
पत्रिका माझ्या हातावर
ठेवून मागे ही न बघता.
अंतरीची ओढ लावून निघून
तू गेली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


अंतरीचे सुख

दूरवर दिसत होतं.
तो पश्चिमेकडे डोंगरा आड 
चाललेला रवी
त्या रवीचा सुंदर संधिप्रकाश
त्यांचा तो आकाशी पसरलेली रंग
ते सुंदर मनमोहक दृश्य
तुझ्याशिवाय एकटीच रमत होते.
त्या संधीप्रकाशात.
ते लुकलुकणारे चांदणे
चंद्राचा तो दुधाळ प्रकाश
तो आकाशी झगमगाट
त्यावेळी हवी असते
तुझ्या मिठीची ओढ
ते अंतरीचे सुख माझ्या कडे का नाही?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Tuesday, October 05, 2021

राणी तुझे जिंकणे माझ्या साठी

सखे राणी माझ्या दुःखाचे कारण
भलतेच आहे.
तुला दुःखातून बाहेर काढणे 
म्हणजे स्वतःला जिंकून घेणे आहे.
माझी राणी दुःखातून बाहेर ये ग
जरा बघ भरलेल्या डोळ्यांतील
आसवे पुसून.
सृष्टीचा आनंद लुटून घे
स्वतःच्या मर्जीप्रमाणे जग 
तुझं कर्तुत्व दाखव जगाला
तु ही काही कमी नाही.
स्त्री असली म्हणून काय झाले.
तुझ्या कडे स्वबुध्दी स्वकर्तृत्व आहे.
वेळ आली तर तू ही रणरागिणी 
होऊ शकते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते.
तुझी बुध्दी तेवढी जबरदस्त आहे.
तू समाजाला धडा शिकवू शकते.
दुःखात दिवस घालवण्यापेक्षा
तुझ्या व्यवसायात यशस्वी होऊन
उंच भरारी घे.
तुझ्या जिंकण्याचे कौतुक करायला
मी कायम तुझ्या पाठीशी आहे.
विसरू नकोस.
राणी तुला माझी कायम साथ असेल.
हे विसरू नकोस.
स्वतःला जिंकून घे.
पाठीवर कायम थाप माझीच असेल.
राणी माझ्या दुःखाचे कारण
तुला समजले आहे.
आता तुला स्वतःला जिंकून घेणे आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


स्वतःला जिंकणे

तुझ्या जाण्याने दुःख भलतेच होते.
दुःखाला सावरून स्वतःला जिंकून
घेणे पुरेसे आहे.
वेळोवेळी क्षणोक्षणी पावलोपावली
तुझी आठवण येणे साहजिक होते.
दुखले खुपले तुझी आठवण येते.
मग डोळ्यांच्या पापण्या पाणावतात.
सुखांत आनंदात तुझी आठवण येते.
मग चेहऱ्यावरचे हास्य लोप पावते.
तुझ्या जाण्याने दुःख खूप मोठे आहे.
ती उणीव भरून निघणे अवघड आहे.
ह्या स्वार्थी अप्पलपोटी जगात 
स्वतःला जिंकून घेणे महत्वाचे आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


तुच हवा

तूच सुखात तूच दुःखात
मला साथ तुझीच हवी.
अंतर्मनाला साद तुझीच हवी.
तुच स्वप्नातला राजकुमार 
तुच सत्यातला सोबती
दुःखावर फुंकर घालायला
तुझीच फुंकर हवी.
सुख दुप्पट करायला
तुझीच साथ हवी.
आनंदाने नाचताना
तुझाच हात हवा.
सरणावर जायला तुझाच
खांदा हवा.
शेवटचा अग्नी तुझ्याच
हातून हवा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Monday, October 04, 2021

समाधान

वेडू तू एकदा तरी मला भेटावे.
त्यासाठी माझे प्रामाणिक 
प्रयत्न आहेत.
तुला एकदा भेटून 
तुझ्या सोबत सर्व बोलून
मन एकदा हलके करावे.
सुख काय ते अनुभवावे
तुझ्या मिठीत सामावून
दुःख माझे मोकळे करावे.
वेडू एकदा तरी भेटशील का
मला समजून घेशील का?
मग तुला भेटून समाधान 
माझ्या चित्ती रुजतील.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️


पावसातील ती (अलक कथा)

संध्याकाळची आॅफिस सुटण्याची वेळ व अचानक पाऊस सुरू झाला तिला घरी जायची घाई कारण तिची छकुली घरी वाट पाहत होती.
सकाळी चांगलं ऊन पडलं होतं त्यामुळे तिने छत्री ही घेतली नव्हती.
रिक्षा मिळत नव्हती बस ब्रेक डाऊन काय करावं तिला सुचेना ती तशीच लेकीच्या ओढीने भिजत निघाली संपूर्ण शरीर  भिजल्यामुळे सर्व कपडे अंगाला चिकटले त्यातच वासना युक्त नजरा तिच्यावर खिळ्या जातात होत्या.
ती झपाझप खाली मान घालून चालत होती तेवढ्यात एक रिक्षावाला बोलला कुठे जायचे आहे मडॅम सोडतो अजून ही चांगले लोक आहेत देव आहे का नाही मला माहित नाही. पण देवासारखी माणसे आहेत म्हणुन जग टिकून आहे अशी हि लेकीच्या ओढणीने निघालेली पावसातील ती.
मुक्तछंद काव्या
मेघा ‌...✍️✍️


Sunday, October 03, 2021

निर्धार

निर्धार हा माझा एवढाच आहे.
आता अपेक्षा काहीच नाही.
आता आला दिवस आनंदात घालवायचा.
उरले आयुष्य समाजसेवेत घालावयाचे.
आता कोणाला मदत हवी असेल तर
मदत करायची.
मदतीचा हात कायम पुढे ठेवायचा.
जनांच दुःख वाटून घ्यायचे.
सुखाची बरसात करायची
दुःखी मनांना सहारा दयायचं
त्यांना सुखाची सावली धरायची.
व्यसनाधीनता व्यसन मुक्त करायचे.
अपेक्षा आता ह्याच आहेत.
त्यातच आपलं सुख मनायचं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Saturday, October 02, 2021

तुझीच साथ

भलतीच चिंता सतावत आहे.
वेडू बरं झालं तुझी साथ आहे.
आयुष्यभर हाती हात आहे.
माझ्या जखमेला तुझी फुंकर आहे.
आयुष्याच्या एकांत वेडू तूच आहेस.
रात्रीच्या अंधारात तुझाच आधार आहे.
स्वप्नांच्या दुनियेत तूच खास आहेस.
तुझ्याच मुळे जगण्याला अर्थ आहे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


प्रेम

ये वेडू प्रेम करतो ना तिच्यावर
मग सांगून बघायला काय हरकत आहे.
वेळ जाण्याआधी सांगून बघ.
ती दुसऱ्याच्या हाती हात देण्याआधी
तिचा हात तुझ्या हाती मागून बघ.
ती दुसऱ्या कोणाला सर्वस्व अर्पण
करण्याआधी
तिचं सर्वस्व तुझा साठी जपून
ठेवायला सांग.
तिच्यासाठी जगून बघ.
तिच्याभावना समजून बघ.
तिला सदैव साथ देण्याच वचन
देऊन बघ.
तुझीच तुला परवानगी आहे.
मग तिचीही परवानगी मागून बघ.
करून बघायला काय हरकत आहे.
ती ही तुझीच वाट पाहत असेल.
तिला ही तुझ्याच हाती हात
द्यायचा असेल.
तिला तिचं सर्वस्व तुलाच अर्पण
करायचं असेल.
तिला ही तुलाच साथ द्यायची असेल.
करून बघायला काय हरकत आहे
तुझीच तुला परवानगी आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Friday, October 01, 2021

माझी मलाच परवानगी आहे

जग बदल दुनिया बदलली
हे खरंच आहे का?
माणूस फक्त स्वतः पुरता बदलला
दुसऱ्यासाठी ना जग बदललं,
ना दुनिया बदलली ना माणूस बदलला.
अजूनही लोकांचा बघण्याचा
दृष्टिकोन तसाच आहे.
माझी मला परवानगी आहे.
घरच्यांची मला साथ आहे.
मी स्वसंरक्षणासाठी ना मंगळसूत्र काढलं,
ना टिकली काढली,ना चाफ्याची फुले घालायची सोडली.
ना छान आवरून तयार होऊन
बाहेर पडायचं सोडलं
जशी पूर्वी होते तशीच 
आताही राहते आहे.
जी कामे पूर्वीकरत होते
तिचं कामे आताही करते.
माझं काम आहे
रिअल इस्टेट एजंटच
ते चालूच आहे.
ऐनपन्नाशीत मला वैराग्य
जीवन नाही जगायचं
मी स्वतःपासून बदलायला
सुरुवात केली आहे.
दुःख तर माझं डोंगरा एवढं आहे.
ते कधीच कमी होणार नाही.
त्यांची कमी कधीच भरून निघणारी नाही.
दुःख मनात ठेवून हसऱ्या चेहऱ्याने 
जगणार आहे.जगणार आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time