Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, June 08, 2022

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या...
घरातील बॉस...
तुझ्या शिवाय...
जगणं ग वनवास...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


स्वप्न

मीच माझी बॉस 
मीच माझं प्रेम
एकटा तो जीव रमतो
आपल्या वेडूत स्वप्नांच्या दुनियेत
उंचच उंच भरारी घेतो.
सरळ साध जगून घेतो.
स्वप्नांच्या दुनियेत फिरून येतो.
बॉसगिरी नाही प्रेमगिरी नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, June 07, 2022

चाहूल( चारोळी)

हळूवार तुझी चाहूल...
का रे वेडी होते मी रे...
चाफ्याचा तो सुवास...
वेडावते मन माझे रे...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेम

तुझ ते काळजी घेणं..
तुझ ते समजावून सांगणं..
तुझं ते हक्कांने ओरडणं..
तुझं ते माझ्यात गुंतूने..
वेडू सांग ना ते प्रेमच आहे ना?
मग का रे दुखावतो मन माझं
का रे घेतो माझी अशी परिक्षा..
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेम म्हणजे

प्रेम आहे तर पूर्ण निभवावे.
प्रेमाची चेष्टा कधीच करू नये.
प्रेम अर्धावर कधीच सोडू नये.
प्रेम टाईमपास म्हणून कधीच करून
एखाद्याच मन दुखवू नये..
प्रेमात कधी व्हॅम्पायर होऊ नये.
प्रेम म्हणजे फक्त शारिरीक संबंध नाही.
तर प्रेम म्हणजे एकमेकांना साथ देण.
सुख दुःख वाटून घेऊन 
एकमेकांना समजून घेणे.
एकमेकांच्या दोषांवर आरोप प्रत्यारोप
न करता प्रेम करणं तेच खरं प्रेम.
प्रेमात जीव द्यायचा असतो.
जीव घ्यायचा नसतो.
प्रेम हळूवारपणे उमलू द्यावे.
प्रेमात एकमेकांची काळजी घेणं.
प्रेम जेवढ समजून उमजून घेऊ तेवढं वाढत जातं.
प्रेम मनापासून करावे.तेच खरं प्रेम..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमाची परिभाषा

प्रेम म्हणजे प्रेम असत
त्याची सीमा मोजता येत नाही.
त्याचा परिघ काढता येत नाही.
ना त्याची बेरीज वजाबाकी होते
ना त्यांच्या गुणाकार भागाकार होतो.
त्याचा आलेख मांडला जात नाही.
त्याची सरासरी काढता येत नाही.
शून्यातून सुरू झालेलं प्रेम
अनंत अथांग असं वाढत जातं.
त्याची न सीमा असते.
ना बोलून दाखवलं जात
वासनेचा लवलेश नसतो तेच
प्रेम अनंत काळापर्यंत टिकत 
जसं राधा कृष्ण, हिरा झांजा, लैला मजनू
असं प्रेम हवं असेल तर वासना न ठेवता
निःस्वार्थी निर्मळ असं प्रेम करावं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमाची सीमा नाही

 आज सहा जूनला आपण आपल्या प्रेमाच्या
जीवनला सुरुवात करून 34 वर्ष पूर्ण झाली बैजू तुझ्या हात हाती देऊन सप्तपदी
तुझ्या सोबत चालून त्या सप्तपदीच पालन करत एकमेकांच्या सुख दुःखात साथ देत...
जीवनाचा प्रवास केला रे शेवट पर्यंत साथ देतो..असं वचन देऊन हि तू तर अर्धावर हात सोडून मला एकटीला सोडून गेला कसं रे राहू तुझ्या विना रोजची सकाळ तुझ्या
आठवणीत उगवते रोजचीच संध्याकाळ
तुझ्या आठवणीत जाते..
ती कातरवेळ मला खायला उठते रे
आजचा दिवस सुखाची आठवण
आणि तू सोबत नसण्याचे दुःख
असा हा आजचा संमिश्र दिवस
हिच आपली प्रेमाची सीमा तुझ्या नंतर ही
अखंड तुझ्या आठवणीत माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत सरणावर जाईपर्यंत राहिलं रे
मिस यू बैजू 🙏😥😥😭
मेघा....✍🏻✍🏻


प्रेम

वेडू आपल्या प्रेमाची 
परिभाषाच वेगळी होती.
आपलं प्रेम निस्वार्थी निर्मळ
झऱ्या प्रमाणे होत.
त्या आपल्या प्रेमाला
सीमा नव्हती..
अथांग अनंत असं 
आपलं प्रेम आज ही 
जपून ठेवलं आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


खडतर (चारोळी)

मेघाना ही खडतर असा... 
रस्ता चालवा लागतो...
तप्त आशा रवी किरणात...
न्हाऊन निघावं लागतं...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


रस्ता

वेडू तुझ्या शिवाय एकटीच
न संपणारा रस्ता चालते आहे..
एकटीलाच रस्ता संपणार कधी
अशी आयुष्यात कुठवर चालू..
अवघड आहे रे एकटीच रस्ता चालणं
साथ तुझी असती तर
सोबतीने मिळून चालायला
सोपं झालं असतं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


चोर

माझं हृदय चोरून 
वेडू तू घेऊन गेलास..
त्या हृदयात बघ 
तुझीच प्रतिमा दिसेल..
मी तर आता जगते रे
तुझ्या विना त्याला 
अर्थ आहे का?
ते जगणं म्हणजे काय
जगणं आहे का?
तूच सांग काय करु
कसं करू बोलना
आहे उत्तर तर दे
माझ्या प्रश्नाचे उत्तर
वाट बघते तुझीच
तुझ्या उत्तराची
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


कष्टाचं व्यक्तिमत्त्व

व्यक्तिमत्व ठरत स्वबळावर
स्वत:च्या हिंमतीवर 
ते कष्ट करून मिळवाव लागत..
नुसतं दिसणं सुंदर असून 
व्यक्तिमत्त्व चालत नाही..
त्या सुंदर चेहरावर
स्वतःच्या कष्टचे तेज 
असाव लागत तेच
खरं व्यक्तिमत्व असतं..
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुमचं व्यक्तिमत्त्व (चारोळी)

तुमच व्यक्तिमत्व पाहून...
तुमच्यावर ती भाळली रे...
तुमचा खरा चेहरा समोर येता...
स्वतःला ती सावरली रे..
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व तिचं तिने निर्माण केलं..
त्यासाठी तिने काबाडकष्ट केले..
तिने घेतलेला विडा व कर्तव्यासाठी
तिने तिच्या सुखाची ‌भाव भावनांची 
तिच्या स्वप्नांची होळी केली..
एकच ध्येय ठेवून त्याचा 
पाठ पुरवठा केला आणि.
तिने नवऱ्याच, मुलांचं
स्वतःच व्यक्तिमत्व घडवलं...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Thursday, June 02, 2022

माझं करिअर

करिअर करायचं होतं 
पदवीधर नसल्याने मुळे 
राहिलं अर्धवट
रबर फिनिशिंग क्षेत्रात
करिअर केलं मोठं आणि 
त्याच क्षेत्रात नाव पण कमावलं
आता चालू असतात
छोट्या छोट्या गोष्टीत
करिअर करणं
आली एखादी मोठी संधी तर
देईल झोकून त्यात..
आणि करिअर मध्ये
कमविल अजून नाव..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


पॅकेज (चारोळी)

करिअरचा झाला आहे...
येथे सगळा बाजार...
सगळ्यांना लागला आहे... 
मोठ्या पॅकेजचा आजार...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


जाणीव( चारोळी)

तिने करीअर खुप मोठ केल... 
पण तिला दुनियादारी नाही जमली...
सुखात ती इतकी रमली की...
दु:खाची जाणीवच ती ची गमली...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


करिअर (चारोळी)

करिअर करण्यासाठी करावे... 
लागतात अपार कष्ट... 
तेव्हाच कोठे घडते...
करिअर मस्त...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


करिअर

आय.टी च्या जमाना आला
जो तो करिअरच्या 
मागे धावू लागला..
आय. टी वाल्याचा 
रुबाबच वेगळा
लाखोंचा पगार
त्यांच्या समोर इतर
क्षेत्र कमी लेखू लागले.
पण आजकाल च्या
मुलांना कळत कसं नाही
इतर क्षेत्रात पण भरपूर
संधी आहेत..
तेथे ही छान करिअर करून
नाव मोठे करता येते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


अपूर्ण स्वप्न

आयुष्यातील अपूर्ण स्वप्ने
देऊन लिपी का ग 
जखमेवर मीठ चोळते 
काही स्वप्न राहिली अपूर्ण
ती अपूर्णच राहणार
आता नाही पूर्ण होऊ शकत..
ती स्वप्नं पूर्ण
खूप खूप शिकायचं होतं.
काॅलेज मध्ये जायचं होतं
शिक्षक प्राध्यापक व्हायचं किंवा
पोलिस खात्यात जायच होत..
करिअर मध्ये खूप नाव 
कमवायच होत.
आता हि अपूर्ण स्वप्न अपूर्णच राहणार
तरी दुधाची तहान ताकावर 
भागवायचा प्रयत्न करते..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time