Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, December 02, 2021

चांदण

शीतल अशी रात्र आहे
रातराणीचा सुगंध दरवळत आहे.
चांदणे मनोहर आहे.
चंद्र शोधतो आहे.
त्यांची शुक्राची चांदणी
मी शोधतो राणी तुला
चांदण्या रात्री साथ मला देशील का
हातात हात घालून
माझ्या सवे येशील का
तुझ्या मिठीत घेऊन धुंद 
मला करशील का
ओठात देऊन ओठ
माझी तू होशील का
तुझ्या चाफ्याच्या सुगंधात
मला घेऊन जाशील का
शीतल अशा रात्री
चांदण्यात मला न्हाऊ घालशील का
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


शीतल रात्र

शीतल अशी रात्र आहे.
चांदणे ही टिपूर आहे.
तुझ्या सोबतीची साथ आहे.
तुझ्या मिठीत ही रात्र आहे.
वाराही हा थंड गार आहे.
तुझ्या सोबतीची उब आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time