Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, December 04, 2021

खंत

कदाचित असेल मी भाग्यवंत
तुझ्या सारखी प्रेमळ प्रेयसी होती
तू जीवाला जीव देणारी राणी होती.
तू समजून घेणारी मैत्रीण होती.
तू सुखांची बरसात करणारी
सुख सागरीका होती.
तू माया लावणारी मायावती होती.
तरी का जात नाही मनातील खंत
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Friday, December 03, 2021

तिच्या भावना

बेईमान झाल्या या भावना
कधी तरी येशील का
मला दूर देशी घेऊन जाशील का
दुःखाचे चटके सहन केले.
सुखांची बरसात करशील का
तुझ्या नजरेत मला जपशील का
तुझ्या हृदयात मला ठेवशील का
तुझ्या मनाच्या राज्यात 
माझी दखल घेशील का.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time