Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, December 06, 2021

निष्पाप

निष्पाप असे असतात रे
त्या छोट्या मुली
का रे राक्षसी वृत्तीने त्यांच्या 
शरीराची लक्तरे तोडता.
कसं रे काहीच वाटत नाही.
त्या मुक्या कळ्या फुले होण्याआधीच
कुस्करून टाकायला.
त्या निष्पाप मुलींन वर घाला घालून 
त्यांना ओरबाडून घ्यायला
आठवण का नाही येत 
तुमच्या आई बहीण मुलींची
स्वतःचे असे त्यांचे बालपण
स्वप्न उराशी बाळगून छान 
आनंदाने जगत असतात.
मोठ्यापणी स्वतःचे असे
काही त्यांना मिळवायचे असते.
पण त्यांचा स्वप्नांचा बेरंग केला 
गेलेला असतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Saturday, December 04, 2021

भाग्यवंत

कादाचित असेल मी भाग्यवंत
तुझ्या सारखा वेडू आहे ना 
माझा सोबती
तू सोबत असताना मी भाग्यवंत
तुझ्या कडे करतेच 
मी माझे मन मोकळे
तुझी साथ असताना
माझ्या पदरी सुखच सुख
चेहऱ्यावर जरा जरी दुःखाची 
छटा दिसता काळजी तू घेतो.
डोळ्यात माझ्या अश्रू दिसता
तू कासावीस होतो.
मी विचारात हरवताच
विचारातून मला दुर्लक्षित करतो.
मला हसण्यात तू माहिर आहेस.
तरी का जात नाही
माझ्या मनातील खंत
{ही रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time