Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, December 12, 2021

संकल्प

राणी संकल्प आता मी केला.
आता फक्त आपल्या दोघांन 
साठी जगायचं म्हणून
झालं गेलं विसरून जायचं
पुन्हा नव्या उमेदीने जगायचं
कोणाला काय बोलायचं बोलू दे.
राणी जगायला साथ मला देशील ना
मला समजावून घेशील ना
प्रेम मला देशील ना
आता झालं किती राहिले
किती गेले चार गेले दोन राहिले
आनंदाने जगायचे आहे.
राहिले दिवस सुखात काढायचे आहेत.
जगाचा विचार करायचा नाही.
पुन्हा नव्या सुरुवात करायची.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


द्वेषाची ठिणगी

द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती.
तुझ माझ प्रेम संपवायला
प्रेयसी तू असं न सांगता का सोडून गेली.
माझं इतक्या वर्षांच प्रेम अस
क्षणात का लाथाडून गेलीस.
तुला कसंच काही वाटलं नाही.
पेटलेल्या तुझ्या मनात
माझ्या बद्दल करुणेला ही 
जागा नव्हती.
मी तळमळतो ग तुझ्या भेटीसाठी
तुला पाहण्यासाठी
तुझ्या एका मिठीसाठी
बघ जमलं तर शेवटचं 
माझ्या सरणावर येऊन 
दोन अश्रू ढाळून जा.
निपचित पडलेल्या या देहाला 
एक शेवटीची मिठी मारून जा.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️
  


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time