Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, December 17, 2021

स्वतःला कसे शोधावे

मी माझ्यात रमावे
माझ्यात रमता रमता
तुझ्यात हरवून जावे
तुझ्यात हरवता हरवता
तुझ्या डोळ्यात मला पहावे.
तुझ्या डोळ्यात हरवून
तुझ्या हृदयात बसावे
तुझ्या हृदयात बसून
तुझ्यात एकरुप व्हावे
तुझ्यात एकरुप होऊन
तुझ्यात धुंद व्हावे.
तुझ्यात धुंद बेधुंद झाल्यावर
माझ्यात मी सांग बरे
स्वतःला कसे शोधावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


शोधते

एकटी असताना मी माझ्यातच रमावे
वेडू आपल्या प्रेमाच्या आठवणीत 
धुंद व्हावे.
आपले ते प्रेमाचं दिवस आठवावे.
आपल ते एकमेकांना चोरून पाहण
तुझी वेळ झाली की
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसणे
तुला पाहताच समाधान होणे.
ते किती छान दिवस होते.
आता मी तुझ्या माझ्यात मी स्वत:ला
शोधते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time