Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, December 19, 2021

गुंता न गुंतता

सखी सांगना गुंता हा कसा सोडवावा
तुझ्या मोकळ्या केसात गुंतलो
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात गुंतलो
तुझ्या गुलाबी ओठांत गुंतलो
तुझ्या गालावरच्या खळीत गुंतलो
तुझ्या हनुवटी वरच्या तीळात गुंतलो
तुझ्या गोऱ्या रंगात गुंतलो
मी गुंतून तुझ्यात गुंग झालो.
सांग ना गुंतून न गुंतता कसं राहावं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


गुंता

वेडू मी तुझ्यात किती रे गुंतले
तुझ्या शिवाय चैन पडत नाही.
उठता बसता खाता पिता
तुझाच तर विचार करते.
माझ्या वेडूला हे आवडेल का
ते आवडेल का
तुझ्यात पूर्ण गुंतून 
गुंता वाढत चालला आहे.
आता या आयुष्याच्या सांजवेळी
गुंता हा सोडवावा वाटे
तुझ्यात गुंतून न पडता.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time