Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, December 19, 2021

तुझ्या विना जगणे

तुला कसं सांगू राणी तुझ्या विना
जगतो कसा 
ह्या वेडूची तू वेडी राणी ग
तडफडतो हा वेडा तुझ्या शिवाय
जसा पाण्याविना मासा
जाऊन सांगा तिला सगळे
शेवटचा श्वास घेत आहे.
तुझ्याच साठी जीव अडकला आहे.
तुला एकदा पाहण्यासाठी तळमळतो आहे.
तुझ्या विना घडत नाही काही वेगळे.
मला आता कळले आहे.
तुझ्याविना जगणे मी भोगले आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


तुझ्या विना

सखे तुझ्या विना शिकलो जगायला
समुद्रकिनारी एकटाच लाटा मोजत बसतो.
खिडकीतून चांदण्याची लुकलुक पाहतो.
चंद्र ला प्रेमाची कबुली देतो.
रवीच्या सोनेरी किरणांची अनुभूती घेतो. 
पावसाच्या सरी एकटाच अंगावर घेऊन
गरमागरम कांदाभजी चहा घेतो.
चाफ्याच्या फुलांची उधळण करतो.
बागेत जाऊन एकटाच छान फेरफटका मारतो.
तुझ्या आवडीच मस्त आईस्क्रीम खातो.
गणपती मंदिरात जाऊन एकटाच ध्यानधारणा करतो.
गॅलरीत झोपाळ्यावर एकटाच
हळूवार झोके घेत वाचण्याचा आनंद लुटतो.
हे झुळझुळ वाऱ्या हळूच मंजूळ शीळ घालून
जाऊन सांग तिच्या कानी सगळे 
तुझ्याविना घडत नाही काही वेगळे
जगतो आहे तसाच पूर्वी सारखा
एकटाच तुझ्या आठवणीत.
तू ये लवकर सहन होत नाही हा दुरावा
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time