Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, December 20, 2021

एकांत

तुझ्या जाण्याने एकांत मला छळतो रे
शांत अशा घरात मन रमत नाही.
तुझी ती पहाटेपासूनची लगबग
माझ्या मध्ये लुडबुड करणे.
तो दिवसभर रेडिओचा आवाज
झोपाळ्यावर तुझं झुळत बसणे.
तुझ्या जाण्याने सगळं सगळं शांत झालं
एकटीच बसते विचारांच्या चक्रात
स्वतःशी संवाद साधत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


संवाद

एकांत मला नकोसा वाटतो.
तुझ्या आठवणीत स्वतःशी संवाद साधतो
तू गेल्यावर निद्रादेवी ही रुसून गेली.
त्यामुळे तुझ्या आठवणीत रात्र रात्र घालवतो.
रातकिड्यांची किरकिर असते.
दूर कोठे तरी कुत्र्याचे केकाटणे चालू असते.
सोबतीला रातराणीचा सुगंध दरवळत असतो.
शशी ही माझी मजा बघत हसत असतो.
चांदण्या लुकलुक करून पाहत असतात.
चाफा उमलण्याची वाट पाहत असतो.
पहाटेच्या रवीला हाक देत असतो.
कोवळी सूर्यकिरणे सोबतीला घेतो.
स्वतःशी संवाद साधत एकटाच फिरत असतो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time