Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, December 26, 2021

खेळ

जीवन एक सारीपाट 
आपण खेळ मांडायचा
आपल्या मांडलेल्या खेळांचे
नियम ठरवणारी नियती असते.
किती ही जिंकलो किती ही हरलो
तरी शेवटी नियती ठरवते.
कोण जिंकले कोण हरले.
कधी जिंकून ही हरतो.
कधी हरुण ही जिंकतो.
हा नियतीचा खेळ असतो.
शेवटी रिमोट कंट्रोल नियतीच्या
हातात असतो.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Saturday, December 25, 2021

उमेद

प्रेयसी ये ग परत आपल्या
त्या जुन्या वळणावरती
तुझी वाट पाहतो आहे.
उमेद नवी घेऊन
पुन्हा नव्या उमेदीने जगायला
पुन्हा एकदा नव्याने डाव मांडायला
झालं गेलं सोडून दे.
प्रेमाच आपलं गणित अधिक करू
राहिलेले हातचे मिळवून टाकू.
आपुलकी ही जुनी ठेवू.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time