Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, December 30, 2021

संकल्प

नविन वर्षाचे नविन संकल्प
नवे नवे चालतात आठवडाभर
जोश जरा उतरला की
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
मग चालू होतात करणे
जमलंच नाही, जमतं नाही,
किती ही प्रयत्न करा 
वेळच मिळत नाही
हे जमेल असं वाटतं नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, December 29, 2021

ऋण

छंद मला समाजसेवेचा
आनंद मिळतो भरून पावते.
सुख दुःख वाटून घेते.
दुःखात साथ देते.
सल मनातील समजून घेते.
प्रेमानी विचारपूस करते.
प्रेमाचे दोन शब्द बोलून 
आधार देते.
मनाला त्यांच्या धीर देते.
भावना समजून सल्ला देते.
छंद हा आयुष्यभर जपायचा आहे.
समाज सेवेलाच वाहून घ्यायचे आहे.
मरणोत्तर पण अवयव दान करून
समाजच ऋण फेडायचे आहे.
हिच सदसंस्काची शिदोरी
पुढच्या पिढीला पण द्यायची आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time