Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, January 03, 2022

प्रेमाची आसवे

जुनीच ती आसवे
प्रेमात तुझ्या वाहायलेली 
दुःख नव्हते रे ते फसवे
तुझ्या प्रेमात झालेले
कधीच समजून घेतलेच नाही
कधीच उमजून घेतलेच नाही.
प्रेम होते रे खरे फसवे ते नव्हते.
तुझ्या प्रेमातील जुनी आसवे
आठवून दुःख नव्याने होते.
नविन जुन्या आसवांची
गंगा मग वाहते‌.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आसवं

जुनीच तुझी ती आसवे
मला माहित आहे
ऐकत नाही म्हटलं की
तुझ नेहमीच अश्रूच हत्यार
बाहेर काढायचं.
त्या तुझ्या आसवांत 
मी चिंब भिजून जातो.
तुझी आसवे बघणे
मला सहन होत नाही.
मी माझ मन बदलतो.
तुझ्या दुःखाचे हे रुप
फसवे आहे माहित असून
तुझ्या प्रेमापोटी मी तुझं 
म्हणण मान्य करतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time