Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, January 09, 2022

चढ उतार

आयुष्य हे असंच आहे.
आयुष्यात कित्येक चढ उतार आहेत.
चढावर चढताना गर्व करायचा नाही.
उतारावर वरून उतरताना घाबरायच नाही.
आयुष्याच्या वळणावर हळूच वळण घ्यायचं
वळताना वळणावर लक्ष नीट ठेवायचं.
आयुष्यात येऊ दे कित्येक चढ उतार वळण
बिंधास्त आपण जगायचं.
वळणावरती वळताना मात्र आपल्याच माणसांना साथ सोबत करायची.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Saturday, January 08, 2022

माणूस म्हणून जग

माणसा रे जरा माणसा सारखे वागून बघ.
माणूस नावाच्या जातीला काळीमा फासू
नकोस.
देवाने बुध्दी दिली, शक्ती दिली
तिचा चांगला उपयोग कर.
क्षणभराच्या सुखासाठी आयुष्य वाया 
नको घालवू.
चोरी, लबाडी, व्यसनाधिनता, वाईट विचार,
वाईट नजर, बलात्कार, जरा चांगल्या वाईटाची जाण ठेव.
अंहकार बाजूला ठेवून स्वतःचा विचार कर चांगलं काय आहे, वाईट काय आहे बघून 
चांगल्याचा स्वीकार कर वाईट ते सर्व सोडून दे.
चांगली कर्मे करायला देवाने माणसाच्या जन्माला घातले. त्या उपकाराची जाणीव ठेवून चांगले वागून परत फेड कर.
चांगली कर्मे कर आणि थोडंफार समाजाची उतराई कर.
हसून जग हसवून जग डोळे जरी भरले तरी
ओठांवरती हसू ठेव.
माणसा माणूस म्हणून जगून बघ.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time