Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, January 10, 2022

कवडसा

पुन्हा पुन्हा का तुझे अस्तित्व
खुणावत आहे.
मला आता या अंधाराची 
सवय झाली आहे.
कोण कोठून येतो
तो रवीचा बारीक कवडसा 
पुन्हा आठवण करून देतो.
खुणावतो तो जरासा
या अंधाराच्या मार्गावर
तुझ्या शिवाय जगण्याची
या रवीच्या कवडसाची
रात्रीच्या चंद्राच्या चांदण्याची
पहाटेच्या चाफ्याच्या सुवासाची
या अंधाराच्या मार्गावर सवय झाली आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सवय

सखी तू मला त्या वाटेवर
एकटच सोडून गेली.
मी मात्र त्याच वाटेवर
पुन्हा पुन्हा जाऊन
तुझ्या अस्तित्वाचा खूणा
शोधत आहे.
त्या वाटेची मला सवय झाली ग
दिवस असो रात्र असो
मला आपल्या शेवटच्या भेटीच्या
खुणा खुणावत असतात.
या वाटेला पण आता
मी एकटाच येऊन जायची
सवय झाली आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time