Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, January 11, 2022

सौंदर्यांची राणी

सखे तुझ काय ते सौंदर्य पाहिल
रुपाच्या या राणी वर फिदा मी झालो.
आणि माझा प्रेमाचा शोध संपला
ती तुझी नितळ काया
तुझे ते गोड गुलाबी ओठ
तुझे ते टपोरे डोळे
तुझे ते सफरचंद सारखे 
गुबरे गुबरे लाल लाल गाल
त्या गालावरची सुंदर खळी
ते काळेभोर लांब कुंतल
त्यात चाफ्याची फुले
किती ग वर्णू तुझ सौंदर्य
तुझा तो खोडकर स्वभाव
सर्वांना समजावून घेऊन चालणे.
तू शांत सोज्वळ दिव्यांची वात
हळव्या मनाची तू माझी राणी
हृदयात वसली तुझीच छबी
तुझ्या सोबतचा माझा प्रवास 
मरेपर्यंत अखंड सुरू राहिल
मी मेल्यावर पण हृदयात 
तुझीच छबी दिसेल.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


सौंदर्य

राणी तुला पाहिलं आणि सौंदर्य
काय मला उमगले
हृदयात तुझीच छबी दिसू लागली.
तुला पाहून माझ्या मनाचा 
एक सुंदर प्रवास सुरू झाला. 
सौंदर्यांची भाषा मी काय करू
फुलासारख्या तुझ्या रुपावर
मी किती भाळू 
जेवढी तू दिसायला गोड
तेवढाच तुझा स्वभाव ही गोड
तुझ्या त्या रुपा वर गुणांवर 
मी फिदा झालो. आणि
मैत्री ते प्रेयसीचा  शोध थांबला.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time