Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, January 14, 2022

पुस्तक मित्र

पुस्तक असे जवळचा मित्र
प्रत्येक टप्प्यावर पुस्तक बदलत जाते.
अंकलिपी अ आ इ ई पासून 
सुरुवात करून
कथा कविता मुक्तछंद कादंबरी 
ललित लेख इत्यादी वाचत जातो.
अशा ह्या पुस्तक मित्राला कोणत्याही
वयात मित्र बनवता येते.
त्याचा सारखा चांगला
मित्र भेटणे अवघड आहे.
पुस्तकांत रमणारा माणूस कधीच
एकटा नसतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


पुस्तक आपला मित्र

पुस्तक एक चांगला मित्र असतो
पुस्तकासारखा सच्चा मित्र नाही.
ना त्यांची कसलीच अपेक्षा नसते.
ना त्याला राग रूसवा येतो
त्यांची सोबत कुठे ही चालते.
चांगल्या मोठमोठ्या लेखकांची
पुस्तके वाचावी त्यातून प्रेरणा मिळते.
खडतर आयुष्यातून मार्ग कसा काढला
हे त्यातून शिकता येते.
जेवढं वाचन जास्त तेवढा
माणूस चांगला विचारी होत जातो
व आपला मार्ग चांगला बनत जातो.
पुस्तक आपल्याला योग्य मार्ग दाखवतो.
पण त्यासाठी पुस्तकाला आपला चांगला
जवळचा मित्र बनवा.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time