Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 22, 2022

तिचं नात

खूप प्रयत्न केले रे
तुझ्याशी समजून घ्यायचे
खूपदा प्रेमाने समजावून सांगितले
तुला कधी समजलेच नाही.
तू कायम तुझाच हेका चालवायचा
तरी ती नात टिकवण्यासाठी
सर्व सहन करायची 
तुला कधी तिचं मन 
समजून घेता आलंच नाही.
तरी ती नात प्रेमानं
प्रयत्न करून टिकून आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


आपलं नातं

नातं तुझं माझं प्रेमाचं
आपण जपून या ना रे
दोन पावलं तू मागे ये
दोन पावलं मी पुढे येते
कशाला हवं अंहकार
प्रेमाच नातं आपलं
प्रेमानच जपू या.
थोडे प्रयत्न तू कर 
थोडे प्रयत्न मी करते.
आपल्या नात्यात हवं कशाला
तू तू मैं मैं चा हट्ट ऱ्हास
प्रेमाच नातं आपलं
असंच फुलवत राहू
आपल्या प्रेमाचा सुगंध 
चाहूकडे दरवळून ठेवू.
नातं आपलं असंच घट्ट ठेवू
किती ही घाव झाले
तरी अमर होऊन जाऊ.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time