Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, January 24, 2022

किमान अपेक्षा

सख्या अपेक्षा काहीच नाही
प्रेमात मला समजून घे
जीवाला जीव दे.
नकोत मजला महागड्या भेटवस्तू
नकोत मजला पाणीपुरी भेळ पुरी
माझ्या भावना समजून घे.
दुःख माझं जाणून घे.
भेट जरी नाही झाली
उगीच चिडचिड करू नकोस.
फोन रोजच बोलणं होईल
असं काही नाही.
एक मेसेज जरूर टाकू
तेवढीच माझी काळजी घे.
साडी ड्रेस काही नको घेऊ.
दुःखात साथ दे
सुखात सोबत राहा.
किमान एवढीच अपेक्षा आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


अपेक्षा काही नाही

तुझ्या प्रेमात काय पडलो
किमान अपेक्षा करू लागलो.
नको सखे रोज भेटू
एक फोन तर कर
फोन करायला नाही जमल
एक मेसेज तर कर
मेसेज करायला जमलं नाही 
माझ्या मेसेजला रिप्लाय तर दे.
जीव माझा तुटतो ग तुझ्या साठी
प्रेमात काय पडलो तुझ्या
सखे अपेक्षा करू लागलो.
मला नको काही देऊ 
माझ्या भेटीचा स्वीकार तर कर
तुझ्या साठीच जळतो जीव
त्या जीवाला समजून तर घे.
तू हसत खेळत सुखी राहावी
एवढीच अपेक्षा आहे. 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time