Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 29, 2022

नजारा

अरे वेड्या तुझ्या सोबती शिवाय काय
ती समुद्र किनाऱ्याची मजा
फेसाळेल्या ती पाण्याची लाट
हळूच पायाला स्पर्श करून
तुझीच आठवण करून देते.
ते ताऱ्यांनी भरलेले आकाश 
त्या चांदण्या लुकलुक करत
जणू माझ्या कडे हसत हसत पाहत
तुझीच आठवण करून देतात.
शशी ही हळूच डोकावून
तुझ्या स्वप्नांची आठवण करून जातो.
अपूर्ण आहे रे तुझ्या शिवाय
हा सगळा सुंदर नजारा.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


राणी तू पहिलं प्रेम

राणी तू तर माझ पहिलं प्रेम होती
नजरेने चोरलेले पहिली भेट होती.
नजरेच्या टप्प्यातील तू सुवर्ण काळ होती.
तुला कसा विसरू सांग ना
तुझ्या भावना कशा मिटवू बोल ना
मनाच्या कोपऱ्यात तुझंच राज्य आहे.
स्वप्नी तुझेच भास आहेत.
माझ्या आयुष्यातील तू सुंदर काळ होती.
माझ्या डोळ्यातील तू माझी स्वप्नं होती.
तुझा तो हसरा चेहरा सतत मला समोर दिसतो ग
कसं विसरु ते पहिलं प्रेम
कशा विसरू  त्या प्रेमाच्या भावना
त्या कधी मिटणार नाही.
किती खपली धरली तरी
ती भावनांची जखम ठसठसत राहणार.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time